About This Blog
आजच्या आर्टिकल मध्ये आपण YouTube Shorts Information Marathi या युट्युब प्लॅटफॉर्म विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
- YouTube Shorts का बनवले गेले?
- YouTube Shorts कसे बनवतात?
- YouTube Shorts मध्ये Title कसे लिहितात?
- YouTube Shorts Monitization कसे करावे?
- YouTube Shorts Download कसे करतात?
YouTube Shorts नक्की आहे तरी काय?
गेल्यावर्षी शंभर पेक्षा अधिक चायनीज ॲप्स वर भारत सरकारने बंदी आणली होती. याचे कारण म्हणजे चायनीज सरकार भारतीय लोकांची privacy आल्याचे सिद्ध झाले होते, आणि याच ॲप मध्ये चायनाचे लोकप्रिय social media app tiktok याचासुद्धा समावेश होता?
भारतामध्ये टिकटॉक वापरणाऱ्या लोकांची संख्या खूपच जास्त होती. दिवसेंदिवस हा ॲप लोकप्रिय होत होता, पण त्याचे काही दुष्परिणाम सुद्धा झाले होते लोकांमध्ये अश्लिलता खूप वाढलेली होती.
शाळेतील मुले अभ्यास करायचे सोडून टिक टोक वर व्हिडिओ बनवत असे, तसेच हा ॲप चायनीज सरकारला भारतातील लोकांची privacy त्यांच्या data service centre मध्ये सेव्ह करत असे.
या Chinese app यामुळे भारत सरकारचे मोठे नुकसान होऊ लागले होते तसेच तरुण पिढी ही tiktok ची मानसिक शिकार झाली होती.
भारत सरकारने tiktok वर बंदी आणण्याचा निर्णय घेतला, आणि हा app भारतामध्ये पूर्णपणे बंद करण्यात आला.
टिक टॉक वापरणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती, आणि यालाच alternative म्हणून YouTube ने YouTube Shorts ची निर्मिती केली.
YouTube Shots का बनवले गेले?
Tiktok App नंतर लोकांना 15 सेकंड 30 सेकंड व्हिडिओ बघण्याची सवय झाली होती, युट्युबने याच गोष्टीचा फायदा उचलून YouTube Shorts ची निर्मिती केली ज्यामध्ये creator स्वतःचे video बनवून लोकांसमोर येऊ शकतो.
सध्या YouTube Shorts युट्युब वर प्रचंड लोकप्रिय होताना आपल्याला दिसत आहे. यामागचे कारण म्हणजे कमी वेळेमध्ये भरपूर माहिती YouTube Shorts मुळे मिळते, आणि यामध्ये video खूपच कमी वेळेमध्ये viral होताना दिसत आहे.
YouTube Shorts लोकप्रिय होण्याचे आणखी एक कारण आहे ते म्हणजे YouTube Shorts मध्ये कोणत्याही प्रकारचे SEO (search engine optimisation) करावे लागत नाही, आणि shorts video uploade करणे सुद्धा खूप सोपे असते.
कोणताही creators सहज Shorts Video बनवू शकतो.
YouTube Shorts कसे वापरायचे?
YouTube Shorts वापरणे खूपच सोपे आहे. Creators यांना आपले एक मिनिटाचे व्हिडिओ बनवून shorts वर अपलोड करायचे!
Video upload करण्यासाठी तुम्हाला Shorts मध्ये दिलेले Ratio 9:16 हे निवडावे लागते, नंतर तुम्हाला तुमचा व्हिडीओ अपलोड करावा लागतो यामध्ये तुम्ही YouTube official music सुद्धा वापरू शकता.
YouTube Short Title कसे लिहावे?
Video upload केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे Title द्यावी लागते जेणेकरून तुमचे video shorts मध्ये येतील shorts video viral करण्यासाठी तुम्हाला तुमच्या Title मध्ये #shorts असे लिहावे लागते. (उदाहरणार्थ : एप्रिल फुल का साजरा केला जातो – #shorts)
एप्रिल फुल हा तुमचा Title झाला आणि त्याच्यापुढे #shorts लावल्याने युट्यूब ला मदत मिळते की तुमचा व्हिडिओ shorts category मधला आहे ज्यामुळे तुमचे व्हिडिओ लवकरात लवकर युट्युब शॉर्ट मध्ये वायरल होतात.
YouTube Shorts मधून कमाई केली जाऊ शकते का?
हो नक्कीच, YouTube Shorts मधून कमाई केली जाऊ शकते? पण हे त्याच creators शक्य आहे, ज्यांचे चैनल पहिल्यापासून monetization आहेत.
सध्या युट्युब वर प्रसिद्ध असलेले मोठमोठे क्रियेटरस उदाहरणार्थ “Technical Guruji” यांनी सुद्धा युट्युब वर ‘TG Shorts‘ नावाने YouTube Shorts Channel बनवलेला आहे.
येणाऱ्या काळामध्ये Shorts Video पाहणाऱ्या लोकांची संख्या वाढत जाणार आहे, आणि याच गोष्टी युट्युब हे लक्षात घेऊन YouTube Shorts ची निर्मिती केली आहे.
आज तुम्ही काय शिकलात?
YouTube Shorts काय आहे आणि ते कशाप्रकारे काम करते याबद्दल आपण माहिती जाणून घेतली आहे, आशा आहे की तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल, तरी तुम्हाला YouTube Shorts कसे बनवावे याबद्दल व्हिडिओ मध्ये माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच आमच्या ऑफिशियल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा. The Marathi Knowledge
Conclusion,
YouTube Shorts Information Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.
6 thoughts on “YouTube Shorts Information Marathi”