रक्षाबंधन हा दिवस का साजरा केला जातो | Raksha Bandhan Information In Marathi

Raksha Bandhan Information In Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण रक्षाबंधन हा दिवस का साजरा केला जातो याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. रक्षा बंधन हा भारतातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय सण आहे तसेच या दिवसाचे महत्त्व खूपच आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते. या राखीचा अर्थ असा होतो की भावाने नेहमी आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी सतर्क राहिले पाहिजे त्यामुळे हा दिवस भारतामध्ये खूप मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. तसे पाहायला गेले तर रक्षाबंधना बद्दल खूप सार्‍या कथा आपल्याला ऐकायला किंवा वाचायला मिळतात.

Raksha Bandhan Information In Marathi

  • जसे की रक्षाबंधनची सुरुवात सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी झाली होती.
  • दुसरे उदाहरण आहे अलेक्झांडर आणि पुरु यांच्यामध्ये झालेल्या युद्धामुळे अलेक्झांडर आणि पुरु यांच्यात झालेल्या युद्धामुळे अलेक्झांडर हा खूप तनाव मध्ये आला होता त्यानंतर अलेक्झांडरच्या पत्नीने भारतीय राजा पुरु यांना राखी देऊन हे युद्ध थांबवले होते.

रक्षाबंधन दिवस कशाप्रकारे साजरा केला जातो? (How To Celebrate Raksha Bandhan in Marathi)

रक्षाबंधन बद्दल खूप पारंपारिक, पौराणिक आणि ऐतिहासिक गोष्टी आहेत. महाभारतामध्ये द्रोपदी (पांडवांची पत्नी) ने आपल्या साडीचा पदर फाडून “भगवान श्रीकृष्ण” यांच्या बोटाला बांधला होता. ज्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या बोटांमधून रक्त येण्याचे थांबले होते. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्यामध्ये भावा-बहिणीचे नाते निर्माण झाले आणि श्री कृष्णाने द्रौपदीला असे वचन दिले की जेव्हा ती संकटामध्ये सापडेल तेव्हा ते तिच्या रक्षणासाठी धावून येतील.

दुसरी गोष्ट अशी की भारतीय राजा पूर्व आणि जगज्जेता सिकंदर म्हणजेच अलेक्झांडर यांच्यामध्ये युद्ध झाले. या युद्धामध्ये भारतीय राजा पुरुने “अलेक्झांडर दि ग्रेट” याचा पराभव केला. जेव्हा अलेक्झांडर दि ग्रेट यांच्या पत्नीला त्यांच्या नवऱ्याचा पराभव झालाय हे कळताच त्यांनी भारतीय राजा पूरला राखी पाठवली आणि उपहार मध्ये आपल्या पतीला जीवन दान मागितले.

तिसरी गोष्ट अशी आहे की चितोडची राणी कर्णावती यांनी हुमायुला राखी पाठवून मदत मागितली होती. जेव्हा बहादूरशहाने त्यांच्या राज्यावर आक्रमण केले होते. तेव्हा राणी कर्णावती विधवा होती आणि आपल्या राज्याच्या रक्षणसाठी असमर्थ होती त्यामुळे राणी कर्णावती यांनी हुमायुला राखी पाठवून आपल्या राज्याची मदत करावी असे सांगितले होते. हुमायुला हा एक मुस्लिम राजा होता आणि हिंदू राणी कडून राखी पाठवल्याबद्दल त्यांनी त्या राखीचा स्वीकार केला. पण हुमायुला तेथे पोहोचण्यास उशीर झाला आणि तोपर्यंत राणी कर्णावती आपल्या दासी सोबत जोहर (आगीत उडी मारून आत्मदहन) केले होते.

रक्षाबंधनाचा अर्थ काय होतो? (Raksha Bandhan Meaning in Marathi)

आपल्या भारतामध्ये खूप सारे सण साजरे केले जातात आणि त्यामागचे महत्त्व सुद्धा तितकेच अर्थपूर्ण आहे. जसे की दिवाळी-दसरा, गणेश उत्सव, 15 ऑगस्ट, नवरात्र यासारख्या विविध सणांमध्ये आपली भारतीय संस्कृती लपलेली आहे. त्यामध्येच एक आहे “रक्षाबंधन” या नावामध्येच या शब्दाचा अर्थ लपलेला आहे. रक्षाबंधन म्हणजे सुरक्षिततेचे बंधन असा याचा अर्थ होतो. या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते. याचा अर्थ असा असतो की जेव्हा बहीण संघटनांमध्ये असेल तेव्हा भावाने तिच्या मदतीसाठी धावून यायला पाहिजेल.

या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातामध्ये राखी बांधण्यास सोबतच आपल्या भावाला सर्व वाईट परिस्थितीतून वाचवावे अशी देवाजवळ प्रार्थना करते. हा दिवस श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. हा दिवस ऑगस्ट महिन्यामध्ये येत असतो.

रक्षाबंधन भारतातील सर्वात मोठा सण का आहे?

आपल्या भारत देशा प्रमाणेच आपल्या भारतातील संस्कृती आणि त्यामध्ये केले जाणारे सण हे सुद्धा खूप मोठे आहे कारण की आपल्या भारतीयांचे हृदयच खूप मोठे आहे त्यामुळे आपण सगळे सण साजरे करतो. (उदाहरणार्थ आपला भारत हा विविधतेने नटलेला आहे तसेच आपल्या भारत देशामध्ये हिंदू, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन या सारखे लोक एकत्र मिळून हातात) आणि आपण भारतीय हे सर्व सण एकत्र मिळून साजरे करतो. जगामध्ये असा कुठलाही देश नाही भारतासारखी संस्कृती आणि विविधता आपल्यामध्ये सामावून घेतो. आपल्या भारत देशामध्ये हिंदू-मुस्लीम आणि ख्रिश्चन हे एकमेकांचे सण साजरे करताना दिसतात. जसे की “बकरी ईद” या दिवशी मुसलमान भाई आपल्या हिंदू मित्रांना आपल्या घरी जेवायला बोलावतात तसेच हिंदू लोक दिवाळीच्या दिवशी आपल्या घरात बनवलेले “दिवाळीचे फराळ” मुसलमान भाईंना देतात. आपण नाताळ म्हणजे क्रिसमस सुद्धा साजरा करतो आणि ही विविधता फक्त आपल्या भारत देशात आढळून येते इतर कुठल्याही देशांमध्ये अशा प्रकारचे वातावरण तुम्हाला पाहायला मिळणार नाही. त्यामुळे आपली भारतीय संस्कृती किती महान आहे याचे दाखले आता पाश्चिमात्य संस्कृती सुद्धा घेत आहे. होळीसारख्या सणाच्या दिवशी बाहेरून विदेशी म्हणजेच फॉरेनर भारत देशामध्ये होळी खेळण्यासाठी येतात. रक्षाबंधन हा दिवस कोणताही धर्म, जात, पात पाहत नाही हा एक “भावा बहिणीचा दिवस आहे.” आणि हा दिवस हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, जैन, बौद्ध यासारख्या धर्माचे लोकसुद्धा साजरे करतात तसेच आता रक्षाबंधन हा सण पाश्चिमात्य देशांमध्ये सुद्धा साजरा केला जात आहे. त्यामुळे भारतामध्ये साजरा होणारा रक्षाबंधन सर्वात मोठा सण आहे कारण की यामध्ये कोणत्याही प्रकारची जात-पात केली जात नाही.

भगवान इंद्र आणि इंद्राणी यांचा रक्षाबंधनाशी काय संबंध आहे?

राखीचा सण कधी सुरू झाला याचे ठोस पुरावे नाहीत. परंतु भविष्य पुराणानुसार याची सुरुवात देव-दानव युद्धापासून झाली. त्या युद्धात देवांचा पराभव होऊ लागला. भगवान इंद्र घाबरले आणि देवगुरू बृहस्पतीजवळ आले. तिथे बसून इंद्राणीची पत्नी इंद्राणी सगळं ऐकत होती. तिने मंत्रांच्या सामर्थ्याने रेशीम धागा पवित्र केला आणि पतीच्या हातावर बांधला. योगायोगाने तो श्रावण पौर्णिमेचा दिवस होता. त्या उत्साही धाग्याच्या बळावर देवराज इंद्राने असुरांचा पराभव केला. जरी हा धागा पत्नीने पतीला बांधला होता, परंतु तो धाग्याची शक्ती असल्याचे सिद्ध झाले आणि नंतर बहिणींनी भावाला संरक्षण बांधायला सुरुवात केली.

राक्षस राजा बळी आणि लक्ष्मी यांच्याशी रक्षाबंधनाचा काय संबंध आहे?

रक्षाबंधनाची कथा राक्षसांच्या राजा बलिशी देखील जोडलेली आहे. राजा बलीला 100 यज्ञ पूर्ण करून स्वर्ग ताब्यात घ्यायचा होता. यामुळे देवराज इंद्र भयभीत झाला आणि त्याने भगवान विष्णूला प्रार्थना केली. मग भगवान वामन एका ब्राह्मणाच्या वेशात अवतारित झाले आणि राजा बली कडून भिक्षा मागायला आले. गुरु शुक्राचार्यांनी नकार देऊनही, राजा बळीने भगवान विष्णूला तीन पायऱ्या जमीन दान करण्याचे वचन दिले. देवाने संपूर्ण आकाश, पाताळ आणि पृथ्वी तीन टप्प्यांत मोजले आणि राजा बालीला पाताळात पाठवले. या देणगीच्या बदल्यात, राजा बालीने देवाकडून वचन घेतले की ते नेहमी त्याच्या समोर असतील. नारदजींनी लक्ष्मीजींना एक उपाय सांगितला, देवाच्या घरी न परतल्याने अस्वस्थ झाले. त्या उपायानंतर लक्ष्मी जी राजा बलीकडे गेली आणि रक्षाबंधन बांधून राजा तिचा भाऊ बनवले आणि पती भगवान विष्णूला तिच्यासोबत आणले. त्या दिवशी श्रावण महिन्याची पौर्णिमा तिथी होती. ही घटना देखील रक्षाबंधन साजरी करण्याचे कारण बनली.

रक्षाबंधन भाषण मराठीमध्ये (Raksha Bandhan Speech in Marathi)

तसे पाहायला गेले तर शाळेमध्ये खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी करून घेतल्या जातात त्यामध्येच भाषण सुद्धा एक आहे. रक्षाबंधन बद्दल दरवर्षी शाळेमध्ये भाषणे केले जातात. यामध्ये प्रामुख्याने रक्षाबंधन का साजरा केला जातो याची माहिती मुले आपल्या शाळेमध्ये देताना दिसतात. हा एक सामाजिक उपक्रम आहे. ज्यामुळे आपल्याला आपल्या भारतातील संस्कृती आणि सणांचे महत्व कळते. त्यामुळे दर वर्षी शाळेमध्ये रक्षाबंधन वर भाषणे दिले जातात. उद्या covid-19 सारख्या आजारामुळे आता सर्व लेक्चर ऑनलाईन होतात त्यामुळे आता ऑनलाईन मुले आपल्या वर्गशिक्षकांना भाषणे ऐकून दाखवतात.

रक्षाबंधन निबंध मराठी मध्ये (Raksha Bandhan Essay in Marathi)

रक्षाबंधन या दिवशी सर्व शाळांना सुट्टी असते आणि शाळेच्या आदल्या दिवशी शाळेमध्ये वर्गशिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना रक्षाबंधन या विषयावर भाषण लिहिण्यास सांगतात या दिवशी रक्षाबंधन का साजरा केला जातो? रक्षाबंधनाची सुरुवात कोणी केली होती? रक्षाबंधन कशाप्रकारे साजरा केला जातो? रक्षाबंधनची माहिती? भावा-बहिणीची माहिती? यासारख्या गोष्टींवर शिक्षक मुलांना गृहपाठ करायला सांगतात. तसेच रक्षाबंधन या सणावर 10 ओळी निबंध सुद्धा लिहायला लावतात यामध्ये विद्यार्थी त्यांचा रक्षाबंधन दिवस कशाप्रकारे साजरा केला गेला याबद्दल माहिती देतात या आर्टिकलचा उपयोग तुम्ही रक्षाबंधन निबंध म्हणून सुद्धा करू शकता.

रक्षाबंधन ब्रेसलेट (Raksha Bandhan Bracelet)

सध्या आधुनिक काळाप्रमाणे रक्षाबंधनचे सुद्धा महत्त्व आधुनिक बनत चाललेले आहे. जसे की पूर्वी राजे-महाराजे लोक आपल्या बहिणीकडून सोन्याची राखी बांधून घेत असे त्यानंतर राखी ही रेशमी वस्त्राच्या धाग्याने बनवली जात असे सध्या राखीचे रूप सुद्धा बदलत आहे. आता डिजिटल राखी किंवा बँड यासारख्या रूपामध्ये राखी आता बाजारात येऊ लागलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ब्रेसलेट राखी (Bracelet Rakhi) सध्या बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळते यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्स वेगवेगळे शेड्स असतात. आता राखीचे रूप सुद्धा मॉडन झालेले आहे. पण त्यामागची भावना मात्र तीच आहे. “राखीचे रूप बदलले असेल, पण त्यामागचे महत्त्व नाही.

रक्षाबंधन केक (Raksha Bandhan Cake)

जसे की आपण म्हणलो की बदलत्या काळानुसार सणांमध्ये सुद्धा आधुनिक बदल होत आहे. त्यामध्ये राखी सुद्धा हा एक सण आहे. सध्या रक्षाबंधन हा दिवस खुप मोठ्या उत्सवामध्ये भारतामध्ये साजरा केला जातो. या दिवशी बहीण फक्त भावाच्या हातावर राखी बांधत नाही तर त्याचे तोंड गोड करण्यासाठी केक सुद्धा आणते. आपली भारतीय संस्कृती इतकी महान आहे की, आपण पाश्चिमात्य देशांची संस्कृती सुद्धा आपल्या मध्ये सामील करून घेतो. केक कापणे हा खर तर पाश्चिमात्य संस्कृतीचा एक भाग आहेत, पण आपण सर्वांची संस्कृती जपतो त्यामुळे भारतीय संस्कृती बद्दल सर्वच लोकांना हेवा वाटतो. रक्षाबंधन या दिवशी बाजारामध्ये वेगवेगळे “रक्षाबंधन स्पेशल केक बनवले जातात.” आणि लोक खूपच आवडीने हे केक खरेदी करतात आणि खातात. अशाप्रकारे काही ठिकाणी रक्षाबंधन हा दिवस केक कापून साजरा केला जातो.

रक्षाबंधन चॉकलेट (Raksha Bandhan Chocolate)

पूर्वी रक्षाबंधन या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधल्यानंतर साखर ठेवत असे. सध्या या गोष्टीत पण आता आधुनिकरण झालेले आहे. साखरेच्या जागी आता चॉकलेट देण्याची सुरुवात झालेली आहे. आणि ही सुरुवात केली आहे प्रसिद्ध नामांकित कंपनी “Dairy Milk” ने जेव्हा रक्षाबंधन हा सण जवळ येतो तेव्हा डेरीमिल्क सारख्या कंपन्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या चॉकलेटचा ब्रँडिंग करताना दिसते. यासाठी ते विशेष करून रक्षा बंधन स्पेशल एड्स (Raksha Bandhan Special Ads) बनवतात. डेरी मिल्क कंपनी ही द ग्रेट बिटनची (United Kingdom) कंपनी आहे जी पूर्वी फक्त श्रीमंत लोकांसाठीच चॉकलेटे बनवत असे नंतर dairy milk ची वाढती लोकप्रियता पाहून ही कंपनी सर्वसामान्य लोकांसाठी चॉकलेटे बनवण्यास सुरुवात केली. सध्या रक्षाबंधन या सणामध्ये पारंपारिक मिठाई सोबतच चॉकलेट देण्याची सुद्धा प्रथा पडली आहे.

रक्षाबंधन ट्रॅडिशनल ड्रेस (Raksha Bandhan Traditional Dress)

आपल्या हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधन या दिवशी भाऊ आपल्या डोक्यावर रुमाल किंवा टोपी ठेवून हातावर राखी बांधत असे, आजही ही प्रथा चालू आहे. पण सध्याच्या आधुनिक काळामध्ये प्रत्येक ब्रँड आपले माल विकण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे ॲडव्हर्टायझिंग करतांना आपल्याला दिसत आहे. जसे की दिवाळीच्या दिवशी दिवाळी स्पेशल ड्रेस, होळीच्या दिवशी होळी स्पेशल ड्रेस तसेच रक्षाबंधन या दिवशी सुद्धा आता ट्रॅडिशनल ड्रेसेस (traditional dress) मार्केटमध्ये आलेले आहे. आता आपल्या प्रत्येक सणांना आधुनिक प्रकारची जोड दिली जात आहे. Amazon and Flipkart यासारख्या वेबसाईटवर तुम्हाला रक्षाबंधन पेशल ड्रेस पाहायला मिळतील अशाप्रकारे रक्षाबंधन या दिवसाचे महत्त्व आणखी वाढले आहे.

रक्षाबंधन बेस्ट गिफ्ट फोर सिस्टर (Raksha Bandhan Best Gifts For Sister)

पूर्वी रक्षाबंधन या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला तिचे रक्षण करेल असे वचन देत असे, तिला पैसे आणि साडी देत असे. आता रक्षाबंधन या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू म्हणून ज्वेलरी बॉक्स, घड्याळ, ट्रॅडिशनल ड्रेस, कॉफी मग, टेडी बियर, ब्रेसलेट आणि ग्रीटिंग कार्ड गिफ्ट म्हणून देतो. आता सध्या या गोष्टी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये बाजारांमध्ये सहजतेने उपलब्ध होतात. त्यामुळे आपल्या बहिणीला खुश करण्यासाठी तुम्ही यापैकी कोणतेही गिफ्ट देऊ शकता.

रक्षाबंधन गिफ्ट कार्ड फोर सिस्टर ॲमेझॉन (Raksha Bandhan Gift Card For Sister Amazon)

Amazon.in या वेबसाईटवर तुम्हाला खूपच सहजतेने आणि कमी किमतीमध्ये आपल्या बहिणीसाठी ग्रीटिंग कार्ड विकत घेता येतील. यामध्ये लेटेस्ट भावा-बहिणीच्या नात्याविषयी माहिती असलेले ग्रीटिंग कार्ड्स तुम्हाला पाहायला मिळतील.

रक्षाबंधन अड्स कशी करावी (Raksha Bandhan Ads In Marathi)

जर तुमचा स्वतःचा मालिकेचा व्यवसाय असेल आणि जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग द्वारे तुमच्या व्यवसायाची ब्रँडिंग किंवा एडवर्टाइजमेंट करायची असेल तर तुम्ही फेसबुक युट्युब सर्च सोशल मीडियाच्या आधारे तुमची ब्रँडिंग किंवा ॲडव्हर्टायझिंग करू शकता. तसेच तुम्ही इन्स्टाग्राम या सोशल मीडियाचा देखील उपयोग करू शकता. तुम्ही तुमची स्वतःची पर्सनल वेबसाइट सुरू करून किंवा ब्लॉग सुरू करून तुमचा व्यवसाय पुढे नेऊ शकता. यामध्ये गूगल स्वतः तुमची मदत करेल. गुगल काही पैशांमध्ये तुमचा ब्रँड संपूर्ण जगासमोर नेईल तुम्हाला हव्या त्या ठिकाणी आणि हव्या त्या लोकांना तुमचे प्रोडक्ट विकता येईल. या सारख्या सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही तुमचा व्यवसाय डिजिटल पद्धतीने लोकांसमोर नेऊ शकता.

रक्षाबंधन डेकोरेशन आयडिया (Raksha Bandhan Decoration Ideas In Marathi)

रक्षाबंधन या दिवशी जर तुम्ही तुमच्या घराला सजवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही खूपच सहजतेने तुमच्या घराचा मेकोवर करू शकता. या दिवशी तुम्ही आपल्या भावा बहिणीचे चित्र भिंतीला लावू शकता तसेच तुम्ही पोस्टर बनवू शकता. या फोटोचे फेम बनवू शकता. अशा अनेक प्रकारे तुम्ही तुमच्या घराला रक्षाबंधन स्पेशल फील देऊ शकता.

रक्षाबंधन कोट्स इन मराठी (Raksha Bandhan Quotes In Marathi)

“ताई तू फक्त माझी आहेस आणि माझी राहशील. तुझी राखी मला माझी कायम आठवण करून देत राहील.”
“आई बहीण मुलगी सगळे रूप आहे तुझ्यात तुझ्यात सामावलेले आहे माझे विश्व आणि तुझ्यावरच माझा सगळ्या विश्वासहे बंद स्नेहाचे, हे बंद रक्षणाचे.”
“सगळा आनंद सगळं सौख्य सगळ्या स्वप्नांची पूर्तता यशाची सगळी शिखर सगळे ऐश्वर्या तुला मिळू दे. रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे.”
“राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे राखी एक विश्वास आहे तुझ्या रक्षणास मी सदैव सज्ज असेल हाच विश्वास.”
“तुझ्या माझ्या नात्याला एक विलक्षण गोडवा आहे कितीही भांडलो, रुसलो, फुगलो, तरी त्यात जिव्हाळा आहे, हे नाते वर्षानुवर्षे टिकवायचे यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे.”

रक्षाबंधन 2021 मध्ये कशाप्रकारे साजरा केला जाणार आहे?

यावर्षी म्हणजे 2021 मध्ये रक्षाबंधन हा दिवस 22 ऑगस्ट रविवारी साजरा केला जाणार आहे. हा दिवस दरवर्षी नारळी पौर्णिमेला साजरा केला जातो. यादिवशी भारतामध्ये समुद्रामध्ये सोन्याचा नारळ कोळी बांधवांना द्वारे समुद्राला वाहला जातो. कारण की, ऑगस्ट महिन्याचा कालावधी हा माशांचा प्रजनन शाळा साठी ओळखला जातो. त्यामुळे ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये मासेमारी केली जात नाही.

रक्षाबंधन 2021: रक्षाबंधनच्या दिवशी बनावट मिठाईपासून सावध रहा! मावा खरा की खोटा हे कसे ओळखावे

रक्षाबंधनाचा सण आला आहे. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेले रक्षाबंधन या वर्षी रविवार, 22 ऑगस्ट रोजी साजरे केले जाईल. रक्षाबंधनाला मिठाईची खरेदी लक्षणीय वाढते. पण तुम्हाला माहीत आहे का की सणासुदीच्या काळात बनावट मिठाई किंवा बनावट मावाचा व्यवसायही वेगाने होतो. म्हणून, ते खरेदी करताना समज दाखवणे खूप महत्वाचे होते. खऱ्या आणि बनावट मधील फरक कसा शोधायचा ते आम्ही तुम्हाला सांगू.

1) खव्याचा छोटा तुकडा हाताच्या अंगठ्यावर थोडावेळ घासून घ्या. जर त्यात उपस्थित असलेल्या तुपाचा वास अंगठ्यावर बराच काळ राहिला तर समजून घ्या की मावा पूर्णपणे शुद्ध आहे.

2) तळहातावर मावाचा गोळा बनवा आणि दोन्ही तळव्यामध्ये बराच वेळ फिरवत राहा. जर या गोळ्या फुटू लागल्या तर मावा बनावट आहे की भेसळ आहे हे समजून घ्या.

3) सुमारे 3 ग्रॅम खवा 5 मिली गरम पाण्यात घाला. थोडा वेळ थंड झाल्यावर त्यात आयोडीन द्रावण घाला. यानंतर तुम्हाला दिसेल की बनावट खोयाचा रंग हळूहळू निळा होईल.

4) तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मावा खाऊन खरी आणि बनावट चाचणी करू शकता. जर मावामध्ये चिकटपणाची भावना असेल तर ते खराब झाले आहे हे समजून घ्या. खरा मावा खाल्ल्यावर त्याची चव कच्च्या दुधासारखी असेल.

5) जर पाण्यात मावा मिसळल्यानंतर त्याचे लहान तुकडे झाले तर ते खराब होण्याचे लक्षण आहे. दोन दिवसांपेक्षा जास्त जुना मावा खरेदी करणे टाळा. ते खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.

6) जर तुम्ही घरी मावा मिठाई बनवत असाल तर कच्चा मावा ऐवजी शिजवलेला मावा खरेदी करा. यापासून बनवलेल्या मिठाईची चवही चांगली असेल आणि ती लवकर खराब होण्याची शक्यता कमी आहे.

7) डॉक्टरांचे म्हणणे आहे की बनावट कोरड्या फळांपासून बनवलेली मिठाई खाल्ल्याने अन्नातून विषबाधा, उलट्या होणे, पोटदुखी होऊ शकते.

8) बनावट मावापासून बनवलेली मिठाई किडनी आणि यकृतासाठी ही मोठा धोका बनू शकते.

9) बनावट मावा तुमच्या पाचन तंत्रात अडथळा आणतो, ज्यामुळे पोटाशी संबंधित इतर आजार होऊ शकतात.

10) बनावट मावा तुमच्या आरोग्यासाठी खूप हानीकारक आहे.

FAQ

Q: रक्षाबंधन 2021 कधी येतो?
Ans: 22 ऑगस्ट.

Q: रक्षा बंधन 2021 तिथी?
Ans:

Q: रक्षाबंधन इतिहास?
Ans: रक्षाबंधनाचा इतिहास सुमारे सहा हजार वर्षांपूर्वीचा आहे.

Q: रक्षाबंधना चा अर्थ काय होतो?
Ans: रक्षाबंधनाचा अर्थ म्हणजे भावाने बहिणीची रक्षा करणे असा होतो.

Q: रक्षाबंधन वर चित्रपट कोणते आहेत?
Ans: वर्ष 1976 मध्ये हिंदी चित्रपट रक्षाबंधन प्रदर्शित झाला होता.

Final Word:-
Raksha Bandhan Information In Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Raksha Bandhan Information In Marathi

1 thought on “रक्षाबंधन हा दिवस का साजरा केला जातो | Raksha Bandhan Information In Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा