आजच्या आर्टिकल मध्ये आपण Instagram Reels Information Marathi विषयी माहिती जाणून घेत आहोत.
- Instagram Reels Information Marathi
- Instagram Reels काय आहे? (What is Instagram Reels in Marathi)
- Instagram Reels कसे बनवावे? (How to Create Instagram Reels in Marathi)
Instagram Reels Information Marathi
Instagram Reels हे एक फेसबुकच प्लॅटफॉर्म आहे ज्यावर तुम्ही तुमचे व्हिडिओ शेअर करू शकता.
वर्ष 2019 मध्ये भारत सरकारने शंभरपेक्षा अधिक Chinese App Ban केले होते, त्यामध्ये Musicaly म्हणजेच “TikTok” चा सुद्धा समावेश होता, या ॲप वर बंदी आणल्यानंतर TikTok प्रेमी साठी फेसबुक ने इंस्टाग्राम चा वापर करून इंस्टाग्राम वर “Instagram Reels” नावाची सर्व्हिस सुरू केलेली आहे.
यामध्ये तुम्ही TikTok सारखेच व्हिडिओ बनवू शकता. सध्या Instagram Reels हे मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे, तसेच मोठे सेलिब्रिटी Marathi Actor Actress याचा वापर मोठ्या प्रमाणे करताना दिसतात. (उदाहरणार्थ : मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय करणारा आपला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि त्यांची पत्नी जेनेलिया डिसूझा देशमुख यांचे Instagram Reels वरचे व्हिडीओ खूप लोकप्रिय होताना दिसत आहे)
TikTok ला पर्यायी entertainment app म्हणून Instagram Reels ची सुरुवात झालेली आहे, चला तर जाणून घेऊया Instagram Reels नक्की आहे तरी काय आणि त्याचा वापर कसा केला जातो?
Instagram Reels काय आहे? (What is Instagram Reels in Marathi)
Instagram Reels हे छोटे व्हिडिओ बनवण्याचे social media platform आहे ज्यामध्ये user 15 second किंवा 1:00 मिनिटं पर्यंतचे video बनवू शकतो.
तसेच या App मध्ये तुम्ही free background music वापरून तुमचे स्वतःचे व्हिडिओ सुद्धा बनू शकता. हा App सुद्धा TikTok सारखाच आहे, तसेच या App मध्ये टिक टोक पेक्षा खूप जास्त फीचर्स दिलेले आहेत त्यामुळे Instagram Reels युज करणाऱ्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे.
TikTok, Instagram Reels ला कॉम्पिटिशन देण्यासाठी युट्युब ने सुद्धा YouTube Shorts ची निर्मिती केलेली आहे, YouTube Shorts नक्की आहे तरी काय जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
Instagram Reels कसे बनवावे? (How to Create Instagram Reels in Marathi)
- सर्वात पहिले तुम्ही तुमच्या स्मार्ट फोन मध्ये इंस्टाग्राम ओपन करा.
- ॲप ओपन केल्यावर प्लस + या आयकॉनवर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर तुम्हाला Post Story Reels Live यासारखे ऑप्शन दिसतील.
- Reels या ऑप्शन वर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर तुमच्या गॅलरी मधील तुम्ही बनवलेला व्हिडिओ अपलोड करा.
- व्हिडिओ अपलोड केल्यानंतर व्हिडिओला टायटल आणि डिस्क्रिप्शन द्या.
- डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी #reels चा वापर करा.
- डिस्क्रिप्शन लिहिताना नेहमी trending #tags चा वापर करा.
- जर तुम्हाला live reels बनवायचे असेल तर तुम्ही डायरेक्ट फोनचा कॅमेरा चालू करून युज करू शकता.
- यामध्ये तुम्ही (0.3x, 0.5x, 1x, 2x, 3x) व्हिडिओ रेकॉर्डिंग स्पीड सेट करू शकता.
इंस्टाग्रामचे (Instagram) काय फायदे आहेत?
सध्या इंस्टाग्राम आहे सेलिब्रिटींचे आवडते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म झालेले आहे यावर मोठमोठे सेलिब्रिटीज आपले फोटो शेअर करताना आपल्याला दिसतात तसेच यामध्ये व्हिडिओ सुद्धा पाहिला आपल्याला मिळतात. वर्ष 2019 मध्ये भारत सरकारने चायनीज ॲप वर लावलेल्या बंधनामुळे (टिक टॉक) सारखे एप्लीकेशन भारतातून काढून टाकलेले आहे आणि याचा फायदा इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ने घेतलेला आहे. टिक टॉक मध्ये एक मिनिटाच्या आत मधले व्हिडिओ खूपच लोकप्रिय होत आहे हे पाहताच इंस्टाग्राम ने सुद्धा आपल्या ॲप्लिकेशन मध्ये नवीन फिचर ऍड केलेले आहे आणि हे फीचर्स “इंस्टाग्राम रिल्स” या नावाने सध्या लोकप्रिय होताना आपल्याला दिसत आहे. सध्या इंस्टाग्राम हे सोशल मीडिया मार्केटिंग चे व्यासपीठ झालेले आहे यामध्ये मोठे ब्रँड आपले प्रमोशन करण्यासाठी इंस्टाग्राम सोशल मीडियाचा आधार घेताना आपल्याला दिसत आहे. इंस्टाग्रामच्या आधारे आता क्रियेटर पैसे सुद्धा कमवू लागलेले आहेत. मोठमोठे brands क्रियेटरला पैसे देऊन आपली जाहिरात त्यांना करायला सांगतात अशाप्रकारे क्रियेटर brands कडून पैसे कमवतात सध्या हा ट्रेड खूपच जोरात चालू आहेत लोग इन्स्टाग्राम वरून लाखो लाखो रुपये कमवत आहेत. Instagram हे आता फक्त एण्टरटेन्मेण्ट चे साधन राहिलेले नसून आता ते एक पैसे कमवण्याचे एक साधन सुद्धा झालेले आहे आणि हाच इंस्टाग्राम चा खूप मोठा फायदा आहे.
आज आपण काय शिकलो?
Instagram Reels नक्की काय आहे आणि याचा वापर कसा करतात, याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे, आशा आहे की तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तरी तुम्हाला याबद्दल काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला सांगू शकता.
Conclusion,
Instagram Reels Information Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.
4 thoughts on “Instagram Reels Information Marathi”