जागतिक नैसर्गिक संवर्धन दिन – World Nature Conservation Day Information Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण “जागतिक नैसर्गिक संवर्धन दिन” विषयी माहिती जाणून घेणार आहोत. याला इंग्लिशमध्ये “world nature conservation day” म्हणून सुद्धा ओळखले जाते. हा दिवस का साजरा केला जातो? आणि या दिवसाचे काय महत्त्व आहे? या बद्दल आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.

जागतिक नैसर्गिक संवर्धन दिन – World Nature Conservation Day Information Marathi

दरवर्षी 28 जुलै हा दिवस ‘जागतिक नैसर्गिक संवर्धन दिन‘ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचे कारण म्हणजे आधुनिक जगामध्ये होत असलेली ही निसर्गाची हानी आणि वाढते प्रदूषण त्यामुळे वाढते ग्लोबल वॉर्मिंग सारखी समस्या दिवसेंदिवस आपल्याला सतवत आहे. जसे की 2021 मध्ये मानसून ऋतु सुरू होताच प्रत्येक ठिकाणी पूर सारखीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामध्ये अशिया, युरेशिया म्हणजे युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिकेतील काही देश यामध्ये पूर सारख्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. यामध्ये आपल्या महाराष्ट्र मध्ये सुद्धा या वर्षी पूर सारखी नैसर्गिक परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही वर्षांपूर्वी मान्सून ऋतूंमध्ये महाराष्ट्रातील धरणे चार महिन्यांमध्ये १००% भरत असे पण सध्या वाढत्या ग्लोबल वार्मिंगमुळे चार दिवसाच्या पावसातच महाराष्ट्रातील धरणे तुडुंब पणे वाहत आहेत. याचे कारण म्हणजे निसर्गाचा होत असलेला हास आणि ग्रीन हाऊस म्हणजे कार्बन गॅसचे होणारे अती उत्सर्जन याला कारणीभूत आहे.

जागतिक नैसर्गिक संवर्धन दिन का साजरा केला जातो?

संध्या 2021 मध्ये मान्सून सुरू होण्यापूर्वीच जगामध्ये पूर सारख्या स्थिती निर्माण झालेली आहे. (उदाहरणार्थ चीन, भारत आणि युरोपातील काही देश याचे उदाहरण आहे.) वर्ष 2021 च्या मान्सून ऋतू सुरू होण्यापूर्वीच पावसाने निसर्गाची खूप मोठी हानी केली आहे. त्यामध्ये मानवी जीवन खूप मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेले आहे. याचे कारण म्हणजे निसर्गाचा होत असलेला दिवसेंदिवस हास वाढते औद्योगिकरण सोबतच बेसुमार होत असलेली झाडांची कत्तल त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग सतत तापत आहे. ग्रीन हाऊसचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासोबतच मानव निर्मित कारखाने, गाड्यांचा धूर आणि जल प्रदूषण, नदी प्रदूषण या सर्वांचा प्रभाव आपल्या मानवी जीवनावर होत आहे. त्यामुळे पृथ्वीचे समतोल संतुलन ठेवण्यासाठी काही नियम सरकारने जारी केलेले आहे. जसे की कार्बन गॅसेस उत्सर्जित करणारे पदार्थ सरकारने कमी केलेले आहे. (उदाहरणार्थ पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांवर सरकारने पर्याय म्हणून इलेक्ट्रॉनिक गाड्या बनवणे यावर आणि चालवण्यावर जास्त भर दिलेला आहे.) वर्ष 2050 मधील भारतातून पेट्रोल आणि डिझेलची वाहने भारतातून नष्ट केले जातील आणि याला पर्याय म्हणून इलेक्ट्रॉनिक गाड्यांना जास्त महत्त्व दिले जाईल. या गोष्टीचे महत्त्व लक्षात घेऊन यूएसए मध्ये इलेक्ट्रॉनिक्स गाडी उत्पादन करणारी कंपनी Tesla या कंपनीने भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक वाहने बनवण्यास सुरुवात केली आहे. ही कंपनी खास करून इलेक्ट्रॉनिक्स वाहने बनवण्यामध्ये महिर आहे. भारताचे केंद्रीय मंत्री माननीय. श्री. नितिन गडकरी यांनी एका मुलाखतीमध्ये असे सांगितले होते की वर्ष 2050 मध्ये पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांना पर्याय म्हणून इलेक्ट्रॉनिक गाड्या असतील ज्यामुळे आपल्या पर्यावरणाचे संतुलन टिकून राहण्यास मदत मिळेल. अशाप्रकारे भारत सरकार भारतामध्ये नैसर्गिक संवर्धन करण्याचे प्रयत्न करत आहे. मानवाने केलेल्या बेसुमार जंगलतोडीमुळे आणि औद्योगिकरणामुळे पृथ्वीचे तापमान दिवसान दिवस वाढत आहे आणि याच गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन दरवर्षी 28 जुलै हा दिवस जागतिक नैसर्गिक संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो.

जागतिक नैसर्गिक संवर्धन दिनचे महत्व? (Importance Of National Nature Conservation Day In Marathi)

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, जगामध्ये आता ग्लोबल वार्मिंगची समस्या निर्माण झालेली आहे आणि या समस्येपासून वाचण्यासाठी प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे निसर्गाचे कायदे करण्यात आलेले आहे जेणेकरून आपल्या देशाचे नैसर्गिक संतुलन कायम राहील. ज्या देशाचे नैसर्गिक संतुलन बिघडलेल्या आहे. त्या देशांमध्ये रोग-राई सारख्या गंभीर आजार त्या देशातील व्यक्तींना भेडसावत राहते. ज्या देशाचे नेसर्गिक पर्यावरण असंतुलन आहे अशा ठिकाणी लोकांना अस्थमा, श्वास न घेता येणे, हार्ट अटॅक, डिप्रेशन मानसिक तणाव यासारखे गंभीर आजार त्या व्यक्तींना सहन करावे लागते आणि अशा परिस्थितीमध्ये त्याठिकाणी सरकारचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि या गोष्टीचा प्रभाव त्या त्या सरकारच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा होतो. त्यामुळे नैसर्गिक संवर्धन किती महत्त्वाचे आहे? हे आपल्याला यावरून समजते. द्वितीय विश्व युद्ध संपल्यानंतर मानवाने खूप मोठी प्रगती केलेली आहे. जसे की अंतराळ शोध मोहीम, विज्ञानामध्ये होत असलेले नवीन नवीन बदल, माणसाच्या आवडीनिवडी त्याचे राहणीमान या सर्वच गोष्टींचा ताण पृथ्वीवर पडत आहे. कारण की मानव हा आपल्या उपभोगासाठी निसर्गाचा हवा तसा वापर करत आहे. त्यामुळे पृथ्वीचे संतुलन बिघडत आहे. सध्याच्या घडीला ऋतू हे दोन दोन महिन्यांनी पुढे सरकले असल्याचे आपल्याला दिसत आहे. जसे की उन्हाळा हा फेब्रुवारी ते मार्च पर्यंत असतो पण तो दोन महिन्यांनी पुढे जाऊन एप्रिल ते जून पर्यंत सरकत चाललेला आहे. तसेच पाऊस सुद्धा केव्हाही कोणत्याही महिन्यांमध्ये अनपेक्षितपणे पडतो. या सर्वांचे कारण म्हणजे निसर्गाचे बिघडत असलेले संतुलन आणि हे संतुलन पुन्हा नव्याने करण्यासाठी जागतिक नैसर्गिक संवर्धनाची खूप मोठी गरज आहे.

पॅरिस करार काय आहे?

वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगभरातील सर्व सरकारांनी ग्लोबल वॉर्मिंग आळा घालण्यासाठी पॅरिस करारावर सह्या केल्या होत्या. हा करार 2015 मध्ये लागू करण्यात आला होता. याचे कारण म्हणजे पृथ्वीवर वाढते ग्लोबल वॉर्मिंग आणि निसर्गाचा होत असलेला हास या सर्व गोष्टींना आळा बसवण्यासाठी निसर्गाचे संवर्धन करण्याची गरज लक्षात घेऊन हा करार करण्यात आला होता. यामध्ये ग्रीन हाऊसचे उत्सर्जन करणाऱ्या पदार्थांवर आळा घालण्यात आला होता तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर दिला होता. पॅरिस करार 2015 मध्ये लागू करण्यात आला होता आणि या करारामध्ये आपल्या पृथ्वीचे तापमान 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत ठेवणे लक्ष होते. या परिस करारामध्ये 195 देशांनी सहभाग घेतला होता. हे सर्व देश वाढते ग्लोबल वॉर्मिंगमुळे त्रस्त झाले होते आणि त्यामुळेच निसर्गाचे संवर्धन टिकून ठेवण्यासाठी पॅरिस एग्रीमेंट नावाचा करार करण्यात आलेला आहे.

पॅरिस कराराचे मुख्य तत्व

  • ग्रीन हाऊस वायुचे प्रमाण कमी करणे.
  • पृथ्वीचे तापमान 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत ठेवणे.
  • कार्बन उत्सर्जन कमी करणे.
  • इको-फ्रेंडली वस्तूंचा वापर जास्त करणे.
  • पर्यावरणाचे संतुलन राखणे.

पॅरिस करार का महत्वाचा आहे?

वाढत्या ग्लोबल वॉर्निंगमुळे प्रत्येक देशामध्ये पूर सारखी स्थिती निर्माण होत आहे. जर आपण 1980 ते 2011 पर्यंतचा निसर्गाचा सर्वे पाहिला तर या वर्षांमध्ये पुर सारखी स्थिती दर वर्षे निर्माण होत होती. त्यामुळे निसर्गाची खूप मोठी हानी होत होती त्यामुळे मनुष्य आणि इतर प्राणी याने खूप मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले होते. त्यामुळे उपासमार सरकारचे आर्थिक नुकसान यासारख्या गोष्टी त्या त्या स्थानिक सरकारला समोर येत होत्या. निसर्गामध्ये होत असलेला हा बदल येणाऱ्या काळामध्ये आणखीनच गंभीर परिस्थिती समोर घेऊन येईल या कारणामुळे पॅरिस करार केला गेला आहे. या करारानुसार ग्रींहाऊस वायूचे उत्सर्जन वाढवणाऱ्या वस्तूंवर आळा घालणे. कार्बन डाय-ऑक्साइड, नाइट्रेट ऑक्साईड आणि मिथेन गॅस यासारखे पृथ्वीचे तापमानामध्ये वाढ करणाऱ्या गोष्टींचा वापर कमी करणे यावर भर दिला जातो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्या पृथ्वीवर नैसर्गिक चक्रीवादळे पूर सारखी स्थिती निर्माण होतात. त्यामुळे पृथ्वीचे संतुलन कायम राखायचे असेल तर नैसर्गिक संवर्धन महत्त्वाचे आहे असे या करारामध्ये स्पष्ट केले गेले होते.

निसर्गाचे संवर्धन केले नाही तर काय होईल?

काही वर्षांपूर्वी Hollywood Movie Interstellar हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटांमध्ये खूपच छान प्रकारे आपल्याला पर्यावरणाची माहिती दिलेली आहे. हा एक सायन्स फिक्शन मूव्ही आहे. त्यामध्ये असे दाखवले होते की माणसाने पृथ्वीचा हास केलेला आहे. त्यामुळे आता पृथ्वी राहण्यायोग्य राहिले नाही. पृथ्वीवर आता अन्नधान्य सुद्धा पिकवता येत नाही. पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. त्यामुळे आता मानवाला पृथ्वीसारख्या नवीन ग्रहांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. पृथ्वीवर आता सगळीकडेच वाळवंटाचे वादळ उभे राहत आहे आणि पृथ्वीवर आता सायन्स सारख्या गोष्टीवर बंदी आणलेली आहे म्हणजेच आता पृथ्वीवर इंजिनीयर, डॉक्टर यासारख्या गोष्टी शिकवल्या जात नाही तर तेथे शेती कशी करावी आणि पृथ्वीचे संवर्धन कसे करावे यासारख्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले जात आहे. अशाप्रकारे खूपच भावनिक गोष्ट या चित्रपटांमध्ये दाखवलेली आहे. जर आपण निसर्गाचे संवर्धन केले नाही तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये सुद्धा या चित्रपटात सारखेच आपल्या पृथ्वीची हालत होईल.

FAQ

Q: जागतिक नैसर्गिक संवर्धन दिन कधी साजरा केला जातो?
Ans: दरवर्षी जुलै महिन्याच्या 28 तारखेला जागतिक नैसर्गिक संवर्धन दिन साजरा केला जातो.

Q: जागतिक नैसर्गिक संवर्धन दिनाची व्याख्या?
Ans: “झाडे लावा, पृथ्वी वाचवा.”

Q: जागतिक नैसर्गिक दिन कशा प्रकारे साजरा केला जातो?
Ans: प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा करण्यात येतो पण विशेष करून या दिवशी झाडे लावण्याचे कार्यक्रम केले जातात.

Q: जागतिक नेसर्गिक संवर्धन दिन कोणी सुरू केला?
Ans: N/A

Q: जागतिक नैसर्गिक संवर्धन दिनाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात?
Ans: World Nature Conservation Day.

Final Word:-
जागतिक नैसर्गिक संवर्धन दिन” हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

जागतिक नैसर्गिक संवर्धन दिन

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon