गुरु ग्रहाची माहिती

आजच्या आर्टिकल मध्ये आपण गुरु ग्रहाची माहिती (Guru Graha Chi Mahiti) जाणून घेत आहोत. गुरु ग्रह आपल्या सौर मंडळातील सर्वात मोठा ग्रह आहे. ज्याला मराठीमध्ये बृहस्पती या नावाने ओळखला जातो तसेच याला इंग्लिश मध्ये जुपिटर नावाने सुद्धा संबोधले जाते.

गुरु हा ग्रह आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे सूर्यमालेतील हा पाचवा ग्रह आहे. गुरू शनी युरेनस आणि नेपच्यून यासारख्या ग्रहांचे वर्गीकरण राक्षसी वायू ग्रह म्हणून केले जाते.

या चार ग्रहांना जोविअन प्लॅनेट्स या नावाने देखील संबोधतात. गुरू म्हणजेच ब्रहस्पती हा आपल्या सूर्यमालेतील अत्यंत महत्त्वाचा ग्रह आहे.

गुरु ग्रहाची माहिती – Guru Graha Chi Mahiti

गुरु या शब्दाचा अर्थ शिक्षक सुद्धा होतो. तसेच आपल्या हिंदू कॅलेंडर मध्ये गुरुवार नावाचा सुद्धा दिवस आहे जो गुरु या ग्रहावर वरूनच घेतलेला आहे.

आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये गुरु या ग्रहाचा खूप आधीपासून संबंध आहे तसेच धार्मिक कथांमध्ये सुद्धा गुरु ग्रहाचा उल्लेख केलेला आहे.

गुरु ग्रह याला प्राचीन रोम वासी ज्युपिटर या नावाने ओळखत असे कारण की रूम मध्ये जुपिटर नावाचा देव राहत असे त्याच्या नावावरूनच गुरु या ग्रहाला जुपिटर नाव पडलेले आहे.

आपल्या सौर मंडलामध्ये चंद्र आणि शुक्र ग्रहा नंतर गुरु हा प्रकाश मान ग्रह आहे.

गुरु ग्रहाची निर्मिती कशी झाली?

गुरु हा ग्रह मुख्यतः हायड्रोजन आणि हेलियम पासून बनलेला आहे. गुरु ग्रहाचा आकार पूर्णपणे गोल नाही तो विषुववृत्तावर थोडासा फुगलेला आहे.

गुरु या ग्रहाचे वातावरण वेगवेगळ्या अंतरावर वेगवेगळे असलेले आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे गुरु ग्रहावर कधी कधी वादळे निर्माण होतात. त्यामुळे गुरु ग्रहावर लाल डाग दिसून येतात हे लाल डाग गुरुवर निर्माण होणारे वादळामुळे बनतात.

गुरु ग्रहावर एक शक्तिशाली चुंबकीय बल आहे. गुरु या ग्रहाला 63 उपग्रह आहेत. यामधील चार मोठ्या उपग्रहांचा शोध गॅलेलियो गॅलिली यांनी वर्ष 1610 मध्ये लावला होता. त्यांच्या या शोधांमुळे या ग्रहांना गॅलेलियन उपग्रह म्हटले जाते.

गुरु ग्रहाच्या 63 उपग्रह पैकी गॅनिमिडी हा सर्वात मोठा उपग्रह असून त्याचा व्यास बुद्ध ग्रह पेक्षाही जास्त आहे.

गुरु ग्रहाचा आकार

गुरू ग्रह हा पृथ्वीवरून दिसणारा सर्वात मोठा ग्रह आहे पृथ्वीवरून दिसणारा हा चौथा ग्रह आहे. कधी गुरु हा मंगळ ग्रह पेक्षा सुद्धा जास्त स्पष्टपणे दिसतो. सूर्याचे वस्तुमान गुरु ग्रहाच्या हजारपट असले तरी सूर्यमालेतील इतर सर्व ग्रहांच्या एकूण वस्तुमानाच्या अडीच पट वस्तुमान केवळ एकट्या गुरु ग्रहाचे आहे.

गुरु ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या 318 पट असून त्याचा व्यास पृथ्वीच्या 11 पट आहे. गुरु ग्रहाचे एकूण आकारमान 1300 पट आहे.

गुरु ग्रहाचे परिभ्रमण?

Q. गुरू ग्रहाला सूर्याची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात?
A. गुरु हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे त्यामुळे गुरु या ग्रहाला सूर्याची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 4333 दिवस लागतात. गुरूछाया परिभ्रमण वेगामुळे त्याच्या विषुववृत्तावर फुगवटा निर्माण झालेला आहे आणि हा फुगवटा आपल्याला पृथ्वीवरून सुद्धा दिसू शकतो.

ग्रहांची निर्मिती कशी झाली?

साधारणपणे सूर्यमालेतील ग्रहांची निर्मिती ही हायड्रोजन आणि हेलिअमच्या पासून झालेली आहे. मागच्या आर्टिकल मध्ये आपण सूर्याची निर्मिती कशी झाली याबद्दल माहिती घेतली होती तसेच सूर्यमालेतील ग्रहांची निर्मिती ही सुर्यासारखे झालेली आहे.

गुरु ग्रहाची निर्मितीही हायड्रोजन आणि हेलिअमच्या पासून झालेली आहे. गुरु ग्रहावर अमोनिया वायूचे वास्तव्य आहे कधीकधी या वायूमुळे गुरु ग्रहावर वादळे निर्माण होतात त्यामुळे गुरु हा ग्रह लाल रंगाचा दिसतो.

आपल्याला गुरु ग्रह लाल रंगाचा का दिसतो?

साधारणपणे गुरु ग्रहाची निर्मिती हायड्रोजन आणि हेलिअमच्या पासून झालेली आहे. तसेच गुरु ग्रहावर अमोनिया वायूचे वातावरण आहे त्यामुळे गुरु ग्रहावर वादळे निर्माण होतात ही वादळे अमोनिया वायू मुळे निर्माण होतात असे शास्त्रज्ञांचे मत आहे या वादळामुळे गुरू ग्रहाला लाल रंग प्राप्त झालेला आहे असा निष्कर्ष काही रिसर्च इन्स्टिट्यूट मधून निघालेला आहे.

गुरु ग्रहाचे वातावरण कसे आहे?

गुरु ग्रहाचे वातावरण सुमारे 90 टक्के हायड्रोजन आणि 10 टक्के हेलियम पासून बनलेले आहे गुरु ग्रहाच्या वातावरणामध्ये प्रामुख्याने मिथेन पाण्याची वाफ अमोनिया व खडक असे मिश्र वातावरण आहे. याव्यतिरिक्त गुरु ग्रहावर कार्बन येथें हायड्रोजन सल्फाइड निऑन ऑक्सिजन आणि गंधक तेसुद्धा अंशत सापडलेले आहेत.

गुरु ग्रहाचे वातावरण हे शनी ग्रहाच्या वातावरणाशी खूप मिळतेजुळते आहे.

गुरु ग्रहाला कडे आहेत का?

गुरू ग्रहाला शनी ग्रह प्रमाणेच कडे आहेत. या कड्यांना हॅलो या नावाने शास्त्रज्ञ ओळखतात हे कडे मुख्यत आधुनिक ने बनलेले असतात त्यासोबतच गुरू ग्रहाला काही प्रकाश मान कडे सुद्धा आहेत ज्याला गाॅसॅमर मर या नावाने ओळखले जाते. इकडे धुली काना पासून बनलेले असतात तसेच आकाशातून येणाऱ्या उल्का पिंड गुरु ग्रहाच्या चुंबकीय क्षेत्रामुळे त्याच्याकडे आकर्षित केले जातात त्यामुळे गुरु ग्रहावर अशा प्रकारचे कडे निर्माण झालेली आहेत.

गुरू ग्रहाचे नैसर्गिक उपग्रह?

गुरु ग्रहाचे मुख्यतः 79 चंद्र आहेत त्यापैकी चार उपग्रह गॅलेलियो गॅलिली यांनी शोधून काढले होते.

  • गॅनिमिड
  • कॅलिस्टो
  • युरोपा
  • आयो

हे उपग्रह भौतिक शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांनी शोधून काढली होती.

वर्ष 1610 मध्ये गॅलिलिओने दुर्बिणीद्वारे या चार उपग्रहांचा शोध लावला होता.

इ.स. 1660 मध्ये कॅसिनीने नवीन दुर्बिणीच्या सहाय्याने गुरु ग्रहावरील डाग आणि रंगीत पट्टे पाहिले होते आणि त्यानेच असा निष्कर्ष काढला होता की गुरु हा ग्रह आपल्या ध्रुवाजवळ थोडासाच चपटा आहे.

सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?

सूर्यमालेतील आठ ग्रहांमधील सर्वात मोठा ग्रह गुरु आहे गुरु ग्रह नंतर शनी हा ग्रह येतो. गुरु हा लाल रंगाचा पृथ्वीवरून दिसणारा सर्वात मोठा ग्रह आहे. त्यासोबतच गुरु ग्रहाचे 79 नैसर्गिक उपग्रह आहेत.

Q. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे म्हणतात?
A. हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे जो पृथ्वीवरून सहज आपल्याला दिसतो. गुरु ग्रहावर अमोनिया वायू चे वातावरण असल्यामुळे गुरु ग्रहावर वादळे निर्माण होतात ही वादळे अमोनिया वायूमुळे बनलेली असल्यामुळे तिला रंगाची दिसतात गुरु ग्रहावर ही वादळे नेहमी बनतात त्यामुळे गुरु ग्रहाला लाल रंग प्राप्त झालेला आहे त्यामुळे गुरु या ग्रहाला लाल रंगाचा ग्रह असे म्हणतात?

गुरु ग्रहाचे महत्व

हिंदू संस्कृती मध्ये तसेच पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये विशिष्ट करून रोम साम्राज्य मध्ये गुरू ग्रहाला देवाचे स्थान दिले होते. इंग्लिश मध्ये गुरू ग्रहाला जुपिटर नावाने संबोधले जाते जुपिटर हे नाव प्राचीन रोमन देव जुपिटर याच्या नावावरून ठेवले गेलेले आहे.

भारतीय हिंदू साहित्यामध्ये तसेच पंचांगामध्ये गुरू ग्रहाला एक विशिष्ट स्थान दिले गेलेले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये नक्षत्राला खुपच मोठे स्थान आहे त्यामुळे आपल्या जन्माच्या वेळेस ग्रहांची स्थिती ही खूपच महत्त्वाची असते अशी मान्यता भारतीय लोकांची आहे.

गुरु ग्रह हा शुभ ग्रह मानला जातो ज्या व्यक्तीवर गुरुची कृपा दृष्टी असेल त्याला त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी भरभरून मिळते असा ज्योतिषांचा निष्कर्ष आहे.

गुरू ग्रहाला लाल किताब सारख्या धार्मिक पुस्तकांमध्ये सुद्धा महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे.

गुरु ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी या मध्ये काही तोटके दिलेले आहेत तसे पाहायला गेले तर गुरु ग्रह खूपच महत्वाचा केंद्रबिंदू आहे भारतीय पंचांग आणि नक्षत्र सुद्धा गुरु ग्रह वर आधारित आहे.

40 वर्षानंतर नासाने बृहस्पतिच्या या गुपितातून पडदा उचलला

जवळजवळ 40 वर्षांपासून नासाचे शास्त्रज्ञ ज्युपिटरच्या अरोरामधील एक्स-किरणांचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करीत होते, आता या कामात यश मिळाले आहे.

जर तुम्ही नॉर्वे किंवा स्वीडनसारख्या देशांच्या सहलीला गेलात तर तिथे तुम्हाला ऑरोराचे सौंदर्य पाहण्याची संधी मिळेल. हा चमत्कार पाहण्यासाठी हजारो पर्यटक तेथे जातात आणि निसर्गाच्या या अद्भुत दृश्याचा आनंद लुटतात.

क्ष किरणांचे रहस्ये

ज्युपिटर ग्रहाचे आणखी एक ऑरोरस देखील आहेत, ज्यासाठी नासाने एक नवीन शोध लावला आहे. या अरोरा सर्वात मोठ्या ग्रहाच्या दोन्ही ध्रुवावर आहेत. परंतु हे अरोरा एक्स-रे काढून टाकतात. नासाचे शास्त्रज्ञ गेल्या 40 वर्षांपासून अशा किरणांची कारणे शोधण्यात गुंतले होते, आता त्यांना याबद्दल माहिती मिळाली आहे.

नासाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात गुरू ग्रह बद्दल आणखी एक गूढ उघडकीस आले आहे. या फोटोमध्ये ग्रहाचे सौंदर्य दृश्यमान आहे, परंतु सर्वात महत्वाची गोष्ट जांभळ्या रंगाची अरोरा त्याच्या दोन्ही खांबावर दिसत आहे.

चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास

शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे की ग्रहाच्या वातावरणामध्ये आयनच्या टक्करमुळे ऑरोस तयार होतात, परंतु आता त्यांना हे देखील कळले आहे की हे आयन एक्स-किरणांद्वारे ग्रहांच्या वातावरणात कसे प्रवेश करतात.

नासाच्या अभ्यासानुसार हे उघड झाले की आकाराने खूप मोठे असल्याने, बृहस्पतिवर तयार झालेल्या अरोरा खूप शक्तिशाली आहेत, मग जेव्हा ग्रहाच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये मजबूत कंप आढळतो तेव्हा ते एक्स-रे सोडते. या स्पंदनामुळे, आयन गुरुच्या चुंबकीय क्षेत्रात पोहोचतात आणि तेथे ऊर्जा सोडतात. यामुळे, आम्ही ग्रहांच्या दोन्ही ध्रुवांवर रंगीबेरंगी अरोरा पाहतो.

Conclusion,
गुरु ग्रहाची माहिती हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

गुरु ग्रहाची माहिती

1 thought on “गुरु ग्रहाची माहिती”

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा