Friendship Day Information In Marathi

Friendship Day Information In Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण फ्रेंडशिप डे हा दिवस का साजरा केला जातो. याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा करण्याची प्रथा आहे. चला तर जाणून घेऊया Friendship Day या दिवसाचे महत्त्व.

Friendship Day Information In Marathi

मैत्री या शब्दांमध्ये खूप मोठी ताकद आहे. आपुलकी, त्याग, समर्पण या सारख्या अनेक गोष्टींचे मिश्रण म्हणजे मैत्री आहे. मैत्रीचे विश्व खोल व्यापक आणि अफाट असते त्यामुळेच आपण आपल्या मनातील भावना आपल्या हक्काच्या माणसं जवळ सांगतो. कधी रुसवा, कधी हाणामारी करावी अशी व्यक्ती म्हणजे मित्र.

मैत्रीला कोणतेही बंधन नसते, तसेच वयाची मर्यादा ही नसते, जगात ज्या काही गोष्टी मोजक्याच विषयावर लिहिण्यासाठी व बोलण्यासाठी अपुरे पडतील त्यातीलच एक आघाडीचा विषय म्हणजे मैत्री आयुष्यातील मित्र नसतील तर जीवन व्यर्थ आहे. असे म्हटले जाते चिमुकला वयात आल्यापासून असते अगदी देह सरणावर जाईपर्यंत मित्रत्व टिकलेली अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मैत्री बदलत जात असते, सध्या सोशल मीडियामुळे आभासी जगात का होईना मैत्री टिकाऊने आणि वाढवणे एका अर्थाने सोपे झालेले आहे. महाविद्यालयीन जीवनामध्ये सळसळता उत्साह आणि फ्रेंडशिप डे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने यावर अधिकच कळस चढतो चला तर जाणून घेऊ या फ्रेंडशिप डे ची सुरुवात कोठे आणि कधी झाली.

मैत्रीचे नाते हे जगातील सर्वात खास ना त्यापैकी लेक आहे. जर का तुमच्या आयुष्यात मित्र नसेल तर तुमचे आयुष्य व्यर्थ जाते. त्यामुळेच संपूर्ण जगाने फ्रेंडशिप डे साजरा करण्याची प्रथा सुरू केलेली आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा करण्यात येतो, पण हा दिवस का साजरा करण्यात येतो या विषयी खूपच रंजक कथा आहे.

जगामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या देशांमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. 27 एप्रिल 2011 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेमध्ये 30 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला होता. फ्रेंडशिप डे चा एकंदरीत आता व्हॅलेंटाईन डे, फादर्स डे, मदर्स डे, चॉकलेट डे यासारखे दिवसाप्रमाणेच फ्रेंडशिप डे चा पाया सुद्धा पाश्चिमात्य देशाने रुजवला आहे. ग्रीटिंग कार्ड, सोशल मीडिया आणि एसएमएसच्या माध्यमातून अनेक जण शुभेच्छा देतात आणि आयुष्यभर मैत्री निभवण्याची वचन देतात.

Friendship day history in Marathi

फ्रेंडशिप डे चा इतिहास हा जगातील सर्वात मोठ्या युद्धात दडलेला आहे. पहिल्या महायुद्धानंतर अनेक देशांमध्ये आपसात मध्ये शत्रुत्व आणि असंतोषाची भावना होते आणि ही भावना संपुष्टात आणण्यासाठी 1935 मध्ये अमेरिकन सरकारने फ्रेंडशिप डे ची सुरुवात केली. त्यावेळी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जाईल असे ठरवण्यात आले. यामागचे प्रमुख कारण म्हणजे रविवारी बहुतांशी लोकांना सुट्टी असते त्यामुळे लोक एकत्र येऊन हा दिवस मोठ्या उत्सवाने साजरा करतील.

अमेरिकेमध्ये 1935 मध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी अमेरिकन सरकारने एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा दिली होती, त्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या मित्राने त्याच्या आठवणीत आत्महत्या केली होती. या नंतर दक्षिण आफ्रिकेतील लोकांनी हा दिवस आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव अमेरीकन सरकार समोर ठेवला. त्या निर्दोष व्यक्तीचा जीव घेतल्याने जनता संतापली होती त्यामुळे अमेरिकन सरकारने तब्बल 21 वर्षांनी 1958 मध्ये तो प्रस्ताव मंजूर केला होता. अशीसुद्धा एक गोष्ट फ्रेंडशिप डे बद्दल सांगितली जाते. आणखी एक गोष्ट म्हणजे सन 1930 मध्ये एका व्यापाऱ्याने फ्रेंडशिप डे साजरा करण्याची सुरुवात केली. जगभरातील सर्वच लोकांप्रमाणे मित्रासाठी एक खास दिवस असावा या उद्देशाने व्यापारी ने फ्रेंडशिप डे ची संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. त्यानंतर युरोप आणि आशिया खंडातील बहुतांश देशांमध्ये ही परंपरा पुढे नेऊन फ्रेंडशिप डे साजरा केला जाऊ लागला तर अमेरिकेतील पेराग्वे डॉक्टर रमण अर्टीमियो यांनी 20 जुलै 1958 रोजी दिवस असावा अशी घोषणा केली त्यांच्या या घोषणेनंतर फ्रेंडशिप डे साजरा केला जाऊ लागला.

Friendship Day In India

भारतामध्ये तसेच दक्षिण आशियाई देशांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे हा साजरा केला जातो ओहायोमधील ओबर्लिनमध्ये 8 एप्रिलला फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.

Friendship Day Quote In Marathi

“जेव्हा तुम्हाला एखादा चांगला मित्र मिळेल तेव्हा गोष्टी कधीच भीतीदायक नसतात”.
“लोक म्हणतात की त्यांनी कधी देवदूत पाहिले नाही पण मी असे म्हणतो की त्यांनी कधीही खरे मित्र पाहिले नाहीत.”
“मलाही कृष्ण सारखा मित्र हवा आहे.”
“सुदामा मला तुझ्यासारखे कौशल्य शिकव, मलाही कृष्ण सारखा मित्र मिळेल.”

FAQ Friendship Day In Marathi

Q: फ्रेंडशिप डे हा दिवस का साजरा केला जातो?
Ans: मैत्रीतील नाते घट्ट करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.

Q: फ्रेंडशिप डे 2021 मध्ये कधी आहे?
Ans: वर्ष 2021 मध्ये फ्रेंडशिप डे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी म्हणजेच दोन तारखेला येणार आहे.

Q: भारतामध्ये फ्रेंडशिप डे कधी साजरा केला जातो?
Ans: भारत तसेच आशियाई देशांमध्ये हा दिवस ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा करण्यात येतो.

Final Word:-
Friendship Day Information In Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला. आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Friendship Day Information In Marathi

3 thoughts on “Friendship Day Information In Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon