फ्रेंडशिप डे मराठी निबंध: Friendship Day Essay Marathi

फ्रेंडशिप डे मराठी निबंध: Friendship Day Essay Marathi 2022 मैत्री वर निबंध मराठी #marathiessay #मराठीनिबंध

फ्रेंडशिप डे मराठी निबंध: Friendship Day Essay Marathi

Friendship Day Essay Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण “फ्रेंडशिप डे” म्हणजेच मित्रता दिवस बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. फ्रेंडशिप आपल्या आयुष्यामध्ये खूपच महत्त्वाचा भाग आहे मित्र नसेल तर आपले जगणेच अधुरे आहे त्यामुळे मित्रची मिसाल नेहमीच देत असतात. मैत्रीवर आजपर्यंत खूप सारे चित्रपट कथा-कविता बनलेले आहेत कारण की मैत्री हे असे नाते आहे जिस रक्ताच्या नात्यापेक्षा खूप जास्त आहे.

Friendship Day म्हणजेच मित्रता दिवस हा दिवस दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. हा दिवस मित्रता साठी समर्पित आहे या दिवसाबद्दल अशी एक गोष्ट आहे की अमेरिकेमध्ये एका व्यक्तीला अमेरिकन सरकारने मृत्यूची शिक्षा दिली होती त्याच्या मृत्यूच्या नंतर त्याचा मित्राने देखील आत्महत्या केली त्यांच्या मैत्रीला सन्मान देण्यासाठी 1935 मध्ये अमेरिका मध्ये फ्रेंडशिप डे साजरा करण्याची प्रथा पडली आणि ही प्रथा आजही चालू आहे.

आज Friendship Day संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो कारण की असा एकही व्यक्ती नाही ज्याला मित्र नाही. आपल्या सर्वांना आयुष्यामध्ये कमी-जास्त मित्र भेटतात. मित्रा बरोबर घालवलेला क्षण आयुष्यभर आठवणीत राहतो खास करून लहानपणाचे मित्र त्यांची मैत्री हे आपल्याला आयुष्यभर आठवते त्यांची आठवण आपल्या आयुष्यात मनामध्ये घर करून जाते.

मैत्री हे असे नाते आहे जे व्यक्ती स्वतःच्या मनाने बनवतो. लहानपणी कळत नकळत खूप सारे मित्र बनुन जातात यामधील काही मित्र शाळा-कॉलेज पर्यंत आपल्या सोबत असतात. दुःखाच्या वेळी मित्रच धावून येतात.

मित्र ते असतात ज्यांच्या सहवासात तुमच्या भविष्यावर प्रभाव पडत असतो. वाईट सवय असलेल्या मित्रांच्या सहवासात तुमचे भविष्य बिघडण्याची शक्यता जास्त असते आणि चांगले विचार आणि सवय असलेली मित्र तुमचे व्यक्तिमत्व आणि आयुष्य घडविण्यास मदत करतात.

Friendship Day का साजरा केला जातो?

फ्रेंडशिप डे मराठी निबंध: Friendship Day Essay Marathi

या जगामध्ये माता-पिता आणि गुरु नंतर सच्चा मित्र आयुष्यात असणे खूप मोठी गोष्ट आहे.

जेव्हा बाळ आईच्या पोटामध्ये असते तेव्हा पासून त्याचे नाते तयार होऊ लागते पण मैत्रीच्या बाबतीत अगदी उलट आहे. जवळच्या नातलगाला पेक्षा फक्त एक खरा मित्र जीवनातील अडचणी मध्ये नेहमीच पाठीशी उभा असतो. आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपल्याला कोणाची तरी आधाराची गरज असते पण कधी कधी रक्ताची नातीही पाठ फिरवतात पण अशा परिस्थितीत आणि आपत्तीच्या वेळी खरा मित्र आपल्या संकटावर मात करण्यासाठी हिम्मत देत असतो. खरे मैत्रीचे नाते जन्माने तयार होत नसले तरी खरे मित्र आयुष्यभर एकत्र राहतात जात धर्म, रंग, लिंग यांचे बंधन झुगारून मित्राची व्याख्या तयार होते.

मैत्री ही फक्त माणसाची झाली पाहिजे असे काही नाही मैत्री भावना आहे जी प्राण्याशी आणि निर्जीव गोष्टी सोबतही असू शकते.

मैत्रीच्या नात्यात खाली कधी कधी अशी माणसे भेटतात जी स्वतःच्या स्वार्थाचा विचार करण्यासाठी तुमच्याशी मैत्री करतात. आपल्या आकांक्षा आणि गरजा पूर्ण करण्यासाठी अशी व्यक्ती मैत्रीचा आव आणतात आणि आपली आवड संपताच आपल्या कामात व्यस्त होतात.

हे जगाचे वास्तव्य आहे की चांगले लोक किंवा चांगले मित्र अपवाद आहेत जे कोणतेही नाते मनापासून निभावतात मैत्रीचे अतूट बंधन लक्षात घेऊन विविध देशांमध्ये फ्रेंडशिप डे साजरा केला जातो फ्रेंडशिप डे च्या वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या वेळी साजरा केले जातात.

फ्रेंडशिप डे मराठी निबंध: Friendship Day Essay Marathi

मैत्री वर निबंध मराठी: मैत्री हे पवित्र बंधन आहे जी कोणत्याही प्रकारच्या अस्पृश्यतेपासून आणि श्रद्धा पासून मुक्त आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर वर्षी फ्रेंडशिप डे चे आयोजन मोठ्या थाटात केले जाते हा दिवस साजरा करण्यामागे अनेक तर्कवितर्क लावले जातात.

असे म्हटले जाते की 1958 मध्ये अमेरिकन सरकारने कोणतीही चूक नसताना एका व्यक्तीची हत्या केली होती मरण पावलेल्या व्यक्तीच्या एक मित्र होता व त्याच्या मित्रा वर खूप प्रेम करत होता या घटनेची माहिती त्या व्यक्तीला समजताच त्याला मोठा धक्का बसला. मित्राला अशाप्रकारे मारल्या दुःखातुन तो बाहेर पडू शकला नाही आणि त्यामुळे त्या व्यक्तीने सुद्धा आत्महत्या केली.

अमेरिकेमध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. या घटनेचे सर्वांचेच आश्चर्य आणि दुःख झाले त्यानंतर अमेरिकेने हा दिवस फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला.

२० जुलै 1958 रोजी जागतिक मैत्री दिन किंवा ‘World Friendship Day’ साजरा करण्याची कल्पना डॉ. रोमन अँटेमियो ब्रॅको यांनी मांडली होती यानंतर World Friendship Day ची स्थापना झाली ज्याचा उद्देश जगभरामध्ये मैत्री पसरवणे हा होता. 30 जुलै 1958 रोजी दक्षिण आफ्रिकेतील पॅराग्वे येथे आंतरराष्ट्रीय मैत्री दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला. आजही Friendship Day जगभरात कोणतेही भेदभाव न करता साजरा केला जातो

फ्रेंडशिप डे मराठी निबंध: Friendship Day Essay Marathi

1 thought on “फ्रेंडशिप डे मराठी निबंध: Friendship Day Essay Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा