Anna Mani Marathi: Google Doodle Celebrate 104th Birthday

Anna Mani Marathi: Google Doodle Celebrate 104th Birthday (Biography, Story, Scientist, Inventions, Discovery, Contributions) #googledoodle #AnnaMani

Anna Mani Marathi: Google Doodle Celebrate 104th Birthday

आजच्या आर्टिकल मध्ये आपण अण्णा मणी कोण होत्या (Who is Anna Mani) याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. अण्णा मणी या ‘भारताच्या हवामान स्त्री’ होत्या यांच्या बद्दल माहिती असणे तुम्हाला आवश्यक आहे? आज Google Doodle ने अण्णा मणी यांच्या 104 जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. अण्णा मणी ह्या अग्रगण्य शास्त्रज्ञ पैकी एक आहे ज्यांच्या योगदानाला भारत कधीही विसरणार नाही. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय विज्ञान संस्थांकडून आज अण्णा मणी यांना आदरांजली वाहिली आहे. चला तर जाणून घेऊ या कोण होत्या अण्णा मनी?

Anna Mani: Biography in Marathi

केरळमधील एका विनम्र सिरीयन ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या अण्णा मणी भौतिक आणि हवामानशास्त्र क्षेत्रातील त्यांच्या विलक्षण योगदानासाठी सन्मानित केले जाते. या त्यांच्या क्षेत्रातील अग्रगण्य पैकी एक शास्त्रज्ञ होत्या त्यांनी भारताला स्वतंत्र हवामान उपकरणांमध्ये सक्षम केले.

सौर किरणोत्सर्ग, ओझंन आणि पवन ऊर्जा साधनांबद्दलच्या त्यांचा समर्पित अभ्यास आणि समज याने राष्ट्राला त्यांच्या अक्षय ऊर्जा वर उभारण्यासाठी एक पायाभूत काम केले आहे. या तेजस्वी भारतीय भौतिकशास्त्रज्याला जगाने आज आदरांजली वाहिली आहे.

The Weather Woman of India: द वेदर वुमन ऑफ इंडिया

शास्त्रात बीएस्सी पदवी प्राप्त केली. पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना त्यांनी प्रोफेसर सी.व्ही रमण यांच्या अंतर्गत जवळून काम केले. रुबी आणि हिऱ्याच्या ऑप्टिकल गुणधर्मावर संशोधन केले या सुमारास त्यांनी पाच शोधनिबंध लिहिले. त्यांच्याकडे भौतिक शास्त्रात पदवी नसल्यामुळे त्यांच्या या कामासाठी त्यांना मान्यता मिळाली नाही किंवा त्यांना पीएचडी देण्यात आली नाही. 1945 मध्ये त्या मास्टर करण्यासाठी ब्रिटनला रवाना झाल्या.

इंग्लंडमध्ये त्यांनी हवामान यंत्राचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यांनी लंडनच्या इंपिरियल कॉलेजमध्ये आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. 1948 ला भारतात परत आल्यानंतर त्यांनी पुण्यातील हवामान खात्यात काम करण्यास सुरुवात केली येथे काम करत असताना त्यांनी हवामान शास्त्राच्या उपकरणावर असंख्य शोधनिबंध प्रकाशित केले त्यांच्या या कामामुळे काही वर्षातच देशासाठी हवामानाचा अचूक अंदाज बांधण्यात आला.

Anna Mani: Information in Marathi

हवामान उपकरणात भारताला स्वतंत्र करण्याच्या इच्छा त्यांचा मनात होती. टाइम्स ऑफ इंडिया वरील एका लेखानुसार त्यांना हवामान विभागाचे प्रमुख बनवण्यात आले जे 100 पेक्षा जास्त पुरूषांच्या टीमसह पुरुषप्रधान समजले जाणाऱ्या स्थान होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली 100 हून अधिक सरलीकृत आणि प्रमाणित हवामान साधने आणि इतर स्वदेशी पायाभूत सुविधा तयार करू शकले.

वर्ष 1957 आणि 58 मध्ये त्यांनी रेडिएशन, मोजमाप करण्यासाठी स्टेशनचे जाळे तयार केले आणि पवन गती आणि सौर ऊर्जा मोजण्यासाठी उपकरणे तयार करण्यासाठी बंगळुरूमध्ये एका लहान कार्यशाळा स्थापन करून तिचा विस्तार केला.

निवृत्तीनंतरही त्यांनी देशात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी अथकपणे काम केले आणि युनायटेड नेशन वर्ल्ड मेटिओरोलॉजिकल ऑर्गानिझेशन, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, अमेरिकन मेटिओरोलॉजिकल इंटरनॅशनल असोसिएशन, इंटरनॅशनल सोलर एनर्जी सोसायटी या संस्थांमध्ये मुख्य पदे भूषवली.

16 ऑगस्ट 2001 रोजी त्यांचे निधन झाले.

Anna Mani: Inventions

हवामानशास्त्रीय उपकरणे संशोधनाच्या क्षेत्रात योगदान दिले

  • सौर विकिरण
  • ओझोन
  • पवन ऊर्जा

मोजण्याचे मोजमाप त्यांनी बनवले यावर त्यांनी असंख्य शोधनिबंध प्रकाशित केले.

Anna Mani: Contributions

भारताला हवामान क्षेत्रांमध्ये सशक्त बनवण्याचे काम अण्णा मनी यांनी केले त्यांच्या या कार्याला आज गुगल डालने सन्मानित केलेले आहे.

Anna Mani: Awards

वर्ष 1987 मध्ये अण्णा मणी यांना “INSA KR Ramanathan Medal ” सन्मानित केले गेले.

अन्ना मणी कशासाठी प्रसिद्ध आहे?

अण्णा मणी हे भारतीय शास्त्रज्ञ होते. तिने हवामानशास्त्रीय उपकरणांच्या क्षेत्रात योगदान दिले, संशोधन केले आणि सौर विकिरण, ओझोन आणि पवन ऊर्जा मोजमापांवर असंख्य पेपर प्रकाशित केले.

अण्णा मनी यांचे संपूर्ण नाव काय आहे?

अण्णा मोडायली मणी (Anna Modayil Mani) असे आहे.

Anna Mani Marathi: Google Doodle Celebrate 104th Birthday

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा