अभिनेत्री प्रिया बापट यांनी शेअर केली लहानपणाची आठवण
मराठी अभिनेत्री प्रिया बापट यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून लहानपणीची आठवण शेअर केलेली आहे.
पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की “Who Remembered this Marathi Serial?” आणि या फोटोमध्ये तुम्ही मला ओळखू शकता का?
असा प्रश्न अभिनेत्री प्रिया बापट यांनी आपल्या चहात्यांना विचारलेला आहे.
ही सिरीयल “दे धमाल” नावाने अल्फा मराठी या चॅनलवर प्रसारित होत होती. ही मराठी मालिका लहान मुलांच्या जीवनावर आधारित मालिका होती. या मालिकेमध्ये लहान मुलांच्या मनामध्ये पडलेले प्रश्न आणि त्यांची खोडकर वृत्ती या मालिकेमध्ये दाखवली जात होती.
अल्फा मराठी वरील सर्वात लोकप्रिय ही मालिका होती.
सध्या या पोस्टवर फॅन्स भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहे.