भारतीय क्रिकेट टीम मध्ये काही महान कॅप्टन झालेले आहे त्यामध्ये सौरव गांगुली हे नाव सगळ्यांना परिचित आहे लोकांना ‘दादा’ या नावाने बोलत असे. आज दादांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये त्यांनी लिहिले की “आप सबको अपना प्यार को सपोर्ट बनाए रखें, सब कुछ घंटों का इंतजार है।”
“The support & love keeps us going”
आज सौरव गांगुली यांचा 51 वा जन्मदिवस आहे. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून क्रिकेट फॅन्समध्ये आज उत्सुकतेचे वातावरण आहे.
सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे लोक तर्क लावताना दिसत आहे. तर काही लोकांनी सौरव गांगुली यांच्या करिअरच्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत.
सौरव गांगुली यांच्या क्रिकेट करिअर विषयी बोलायचं झाले तर त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 113 टेस्ट आणि 311 वनडे मॅच मध्ये भारताचे नेतृत्व केलेले आहे. त्यांनी टेस्ट मध्ये 16 शतके जोडलेली आहेत तसेच टेस्ट सिरीजमध्ये 7212 रन देखील बनवलेले आहेत.
वन डे करिअरमध्ये त्यांनी 22 शतके आणि 72 अर्धशतके आणि 11363 रन बनवले आहेत.
सौरव गांगुलीने कसोटीत 32 विकेट घेतल्या आहेत. त्याच बरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये दादाच्या नावावर 100 बळींची नोंद आहे. आयपीएलमध्ये त्याने 59 सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत. सौरव गांगुलीने नव्या भारतीय संघाचा पाया रचण्याची कामगिरी केली आहे. दादांनीच भारताला परदेशी भूमीवर सामने जिंकायला शिकवले. सौरभ गांगुलीने प्रतिस्पर्धी संघांच्या डोळ्यात बघून स्पर्धा करायला शिकवले.