जागतिक ओझोन दिवस: World Ozone Day 2022 Speech in Marathi (Bhashan)

जागतिक ओझोन दिवस: World Ozone Day 2022 Speech in Marathi (Bhashan, Theme, History, Significance, Quotes) #worldozenday2022

World Ozone Day Speech in Marathi (Bhashan)

जागतिक ओझोन दिवस भाषणाची सुरुवात कशी करावी?

आदरणीय प्राचार्य, गुरुजन आणि माझ्या मित्र-मैत्रिणीनो…

जागतिक ओझोन दिवस मराठी भाषण: आज आपण जागतिक ओझोन दिवस विषयी माहिती जाणून घेत आहोत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. समाजामध्ये ओझोन दिवसबद्दल जनजागृती घडवून आणण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

ओझोन हा थर आपल्या Stratosphere मध्ये आढळणारा थर असून काही काळापासून ओझोन थराला छिद्र पडले आहे. ओझोन थर सुरक्षित नाही. ओझोनचा थर सुरक्षित नसल्यामुळे पृथ्वीवर अनेक विपरीत परिणाम होत आहेत तसेच नैसर्गिक आपत्ती येत आहे त्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग एक कारण आहे.

ओझोन थराचा कमतरतेमुळे सूर्यप्रकाशतून येणारे अल्ट्रावायलेट किरणे थेट मानवांच्या संपर्कात येत आहे त्यामुळे त्वचेचे कर्करोग आणि त्वचेशी संबंधित आजार होत आहे.

तसेच मानवामध्ये मोतीबिंदूचा धोका देखील निर्माण झालेला आहे. कारण की सूर्यापासून येणारी अल्ट्राव्हायोलेट किरणे माणसांना प्रभावित करत आहे. ओझोन थर सुरक्षित न केल्यास मोतीबिंदूचा धोका ही वाढेल आणि बहुसंख्य लोक हळूहळू आंधळे होतील.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार ओझोनच्या थरातील छिद्रामुळे मानवांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे त्यामुळे किरकोळ आजारामुळे लोकांवर गंभीर परिणाम होत आहे.

अल्ट्राव्हायोलेट किरण यांचा थेट परिणाम वनस्पतीच्या वाढीवर होतो आणि ओझोन थरातील छिद्र वाढवून ते कृषी उत्पादकता कमी करतात असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

गेल्या काही दशकांमध्ये शास्त्रज्ञांनी ओझोनच्या थरातील क्षेत्राला गांभीर्याने घेतले आहे आणि त्यासाठी खूप संशोधन केले आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की ओझोन थरातील छिद्रांची अनेक कारणे आहेत ज्यामध्ये प्रदूषण एक मुख्य कारण आहे.

या जगात राहणाऱ्या सर्व मानवांना ओझोन विषयी जागरुकता करण्यासाठी जागतिक ओझोन दिवस साजरा केला जातो. आपल्या पृथ्वीला सुरक्षित ठेवायचे असेल तर यासारखे कार्यक्रम राबवायला हवे एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.

World Ozone Day: Information in Marathi

World Ozone Day 2022: आजच्या आर्टिकल मध्ये आपण जागतिक ओझोन दिवस विषयी माहिती जाणून घेणार आहोत. दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी जागतिक ओझन दिवस साजरा केला जातो याच दिवशी 1987 मध्ये प्रोटोकॉल स्वाक्षरी करण्यात आली होती.

ओझोन थराचा हास कशाप्रकारे रोखला जावा याविषयी समाजामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

World Ozone Day 2022: Theme

“Montreal Protocol@35: Global Cooperation Protecting Life and Earth”

पृथ्वीवरील जीवनाचे संरक्षण करणारे जागतिक सहकार्य ही जागतिक ओझोन दिन 2022 ची थीम आहे.

World Ozone Day 2022: History

1994 मध्ये UN जनरल असेंबली लीने 16 सप्टेंबर हा ओझोन थर संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस किंवा जागतिक ओझोन दिवस म्हणून घोषित केला. 16 सप्टेंबर 1987 रोजी स्वाक्षरी केलेल्या ओझोन थर कमी करण्याच्या पदार्थावरील Montreal Protocol स्वाक्षरी करण्यास करण्यात आली होती.

ओझोन म्हणजे काय?

ओझोन ला रासायनिक दृष्ट्या O3 म्हणून दर्शवले जाते. ऑक्सिजनच्या तीन आणुनी बनलेला हा वायू असतो. ओझोन हा फिकट निळा असलेला वायू आहे. जीवनासाठी हानिकारक दुर्गंधीयुक्त आणि अत्यंत प्रतिक्रियाशील वायू आहे. जो stratosphere उंचावर असतो. ओझोनचे उच्च स्थान आहे ज्यामुळे ते आपल्यासाठी हानिकारक होण्याऐवजी फायदेशीर ठरते. जर ते पृथ्वीच्या वातावरणाच्या जवळ आले असते तर त्याच्या हरितगृह परिणाम आपल्यासाठी हानिकारक ठरला असतात आणि त्यामुळे ग्लोबल वार्मिंग चे प्रमाण वाढले असते आणि नसर्गिक आपत्ती आली असती.

ओझोन थर कुठे आढळतो?

ओझोन थर हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 15 ते 35 किलोमीटर उंचावर आढळतो.

ओझोन थर महत्वाचा का आहे?

सूर्यापासून निघणारी हानी कारक किरणोत्सर्गी किरणे पृथ्वीवर येतात पृथ्वीवर किरणे अडवण्याचे काम ओझोन थर करते. ज्यामुळे सूर्यापासून निघालेले हानीकारक किरणे थेट पृथ्वीवर पोहोचू शकत नाही. जर असे झाले नसते तर पृथ्वीवर अल्ट्रावायलेट किरणांनी मनुष्यांना कर्करोग मोतीबिंदू यासारखे गंभीर आजार झाले असते आणि पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाली नसती. अल्ट्राव्हायोलेट किरणे खुपच घातक असल्यामुळे या किरणांना पृथ्वीच्या वरती अडवण्याचे काम ओझोन थर करते. ओझोन थरामुळे ग्लोबल वॉर्मिंग सुद्धा कमी होते.

World Ozone Day 2022: Quotes in Marathi

“जागतिक जागतिक ओझोन दिनाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा आणि मी तुम्हाला आठवण करून देतो की आपल्या सर्वांना आपल्या अस्तित्वासाठी ओझोन गरज आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्याचे संरक्षण केले पाहिजे.”

जागतिक ओझोन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

“जागतिक ओझोन दिनानिमित्त, आपण नेहमी लक्षात ठेवूया की त्याच्या नाशासाठी आपणच जबाबदार आहोत आणि आपणच त्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे.”

जागतिक ओझोन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

“जागतिक ओझोन दिनानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा… आपल्या एकत्रित प्रयत्नांनी ओझोन वाचवण्याच्या दिशेने काम करण्यासाठी आपण हातमिळवणी करूया.”

जागतिक ओझोन दिनाच्या खूप खूप शुभेच्छाhttps://www.youtube.com/watch?v=zKgcif6e_Aw

“आपण अधिकाधिक झाडे लावू या, हा ग्रह वाचवण्यासाठी ओझोन वाचवण्यासाठी इको-फ्रेंडली उत्पादने वापरून या.”

जागतिक ओझोन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

“आपल्या सर्वांचे संरक्षण करणारा थर सुरक्षित केला पाहिजेल आणि आपण एकत्रितपणे त्याचे संरक्षण केले पाहिजेल.”

जागतिक ओझोन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो?

जागतिक ओझोन दिन दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.

सर्वप्रथम जागतिक ओझोन दिवस केव्हा साजरा केला गेला होता?

सर्वप्रथम जागतिक ओझोन दिवस वर्ष 1994 मध्ये साजरा केला गेला होता.

जागतिक ओझोन दिवस: World Ozone Day 2022 Speech in Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon