इंजीनियर्स डे मराठी भाषण 2022: Engineers Day Marathi Speech 2022 (Bhashan) #marathibhashan
इंजीनियर्स डे मराठी भाषण 2022: Engineers Day Marathi Speech 2022 (Bhashan)
भारतात दरवर्षी 15 सप्टेंबर हा दिवस ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारतात ते महान अभियंता ‘मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या’ यांचा जन्म दिन म्हणून साजरा केला जातो. ते भारताचे पहिले अभियंता होते त्यांनी आपल्या महान कार्याने भारताच्या अर्थव्यवस्थेत योगदान दिले.
इंजीनियर्स डे 2022 भाषणाची सुरुवात कशी करावी
आदरणीय प्राचार्य, प्रियजन गुरु आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो.
सर्व प्रथम तुम्हा सर्वांना माझा नमस्कार!
तुम्हा सर्वांच्या लक्षात असलेले की दरवर्षी 15 सप्टेंबरला ‘अभियंता दिन’ भारतामध्ये साजरा केला जातो. आजही हा दिवस साजरा करण्यासाठी आपण सर्वजण येथे जमलो आहोत.
15 सप्टेंबरला अभियंता दिन का साजरा केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? तिथे उपस्थित असलेल्या बहुतेक लोकांना याविषयी नक्कीच माहिती असेल! परंतु, ज्यांना याबद्दल माहिती नाही त्यांना मी सांगू इच्छितो की अभियंता दिन हा महान अभियंता ‘मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या’ यांचा जन्म दिन म्हणून साजरा केला जातो.
मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी त्यांच्या अभियांत्रिकी काळात देशाच्या अर्थव्यवस्थेत अमूल्य योगदान दिले आजवर भारत देशात त्यांच्या पेक्षा मोठा अभियंता क्वचितच झाला असेल.
मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 रोजी कर्नाटकातील मुदनहल्ली या छोट्याशा गावामध्ये झाला. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना Sir MV म्हणून देखील ओळखले जाते.
देशाच्या विकासातील योगदानाबद्दल त्यांना 1955 मध्ये भारतातील सर्वोच्च पुरस्कार ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला.
भारतामध्ये पिण्याचे पाणी आणि सिंचन व्यवस्था लागू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता अनेक पूल आणि धरणांची रचना त्यांनी केली.
जलस्त्रोतांचा उपयोग, अनेक नंदी बंधारे, पूल यांचे यशस्वी डिझाईन आणि बांधकाम आणि सिंचन पिण्याचे पाणी या योजना भारतभर त्यांनी राबवल्या त्यांच्या या कौशल्यासाठी ते अंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले गेले.
राष्ट्रीय अभियंता दिन जगामध्ये वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जात असला तरी भारतामध्ये 15 सप्टेंबर 1968 पासून राष्ट्रीय अभियंता दिन साजरा केला जातो. हा दिवस भारतातील महान अभियंता मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो.
“मी इंजिनियर झालो तर १०० ओळी निबंध”
आज आपल्या भारत देशाला मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या सारख्या अभियंत्यांची खूप गरज आहे कारण की देशाच्या विकासाला अभियंत्यांची खूपच गरज असते त्यामुळेच आपला देश विकास करू शकतो.
जगातील कोणते ही राष्ट्राची प्रगती आणि विकास हे अभियंताच्या प्रतिभावान बुद्धी शिवाय कधीही शक्य होणार नाही. हे अभियंत्यांचे महत्व आणि मानवतेसाठी त्याच्या योगदानाची नोंद करण्यासाठी अभियंता दिन साजरा केला जातो.
आज आपण 21 व्या शतकामध्ये राहतो आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट अभियंत्याच्या ज्ञानाच्या मदतीने बनलेली आहे यावरून आपल्या दिसून येते की आपल्या जीवनात आणि समाजात अभियांत्रिकीचे किती महत्त्व आहे.
मला सिव्हिल इंजिनिअर व्हायचे आहे कारण मी नेहमीच प्रचंड इमारती आणि संरचनांच्या बांधकामाचा भाग होण्याचे स्वप्न पाहिले आहे. भूकंप आणि इतर नैसर्गिक आपत्तींपासून सुरक्षित इमारती बांधण्यात मला समुदायाला मदत करायची होती. माझे वडील देखील सिव्हिल इंजिनिअर आहेत, आणि आम्ही ज्या वसाहतीत राहतो तिथे ते मुख्य अभियंता होते. मी माझ्या वडिलांकडून प्रेरणा घेतली. माझ्या वडिलांनी केलेल्या कामासाठी समाज त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांच्या खूप आदर हि करतो. मलाही तेच स्थान कधीतरी प्राप्त करायचे आहे.
एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.
जय हिंद, जय भारत…
Treading Post: Engineers Day Speech in Marathi 2023
1 thought on “इंजीनियर्स डे मराठी भाषण 2022: Engineers Day Marathi Speech 2022 (Bhashan)”