World Animal Welfare Day 2022: Marathi

World Animal Welfare Day 2022: Marathi (जागतिक प्राणी दिवस, Theme, History, Celebrated, Significance, Importance, Quotes) #worldanimalday2022

World Animal Day 2022:आजच्या आर्टिकल मध्ये आपण ‘जागतिक प्राणी दिवस 2022’ विषयी माहिती जाणून घेणार आहोत. दरवर्षी 4ऑक्टोंबर हा दिवस जगभरातील प्राण्यांच्या भल्यासाठी अधिकारासाठी साजरा केला जातो. जागतिक प्राणी दिनाचे ध्येय जगभरातील प्राण्यांसाठी कल्याणाचा दर्जा सुधारणे आणि जगाला सर्व प्राण्यांविषयी एक चांगले स्थान बनवणे हे आहे.

World Animal Welfare Day 2022: Marathi

जागतिक प्राणी दिन का साजरा केला जातो?
Jagtik Prani Diwas:
प्राण्यांवरील क्रूरता आणि अत्याचार रोखण्यासाठी आणि प्राण्यांविषयी हक्क आणि कल्याणी याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हे दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर 4 ऑक्टोंबर हा दिवस जागतिक प्राणी दिन म्हणून साजरा केला जातो.

पहिला जागतिक प्राणी दिन कधी साजरा करण्यात आला होता?
जागतिक प्राणी दिन सर्वात प्रथम चार ऑक्टोंबर 1929 रोजी साजरा करण्यात आला होता. जर्मन लेखक आणि प्रकाशक हेन्रिक झीमरान यांनी प्राण्यांच्या कल्याण विषयी जागरुकता वाढविण्याचा उद्देशाने हा दिवस सुरू केला.

World Animal Day: History

जागतिक प्राणी दिनाचा इतिहास
24 मार्च 1925 रोजी जागतिक प्राणी दिनाचे आयोजन हेनरिक झिमरमन नावाचे जर्मन लेखक आणि प्रकाशक यांनी सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. ‘मॅन अँड डॉग’ या नावाने त्यांनी मासिके सुरु केली. प्राण्यांच्या कल्याण याविषयी त्यांच्या विचारांना चालना देण्यासाठी आणि जागात प्राण्यांविषयी आपुलकी निर्माण करण्याच्या उद्देशाने जागतिक प्राणी दिन समिती स्थापन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.

24 मार्च 1945 रोजी त्यांच्या समितीने जागतिक प्राणी दिनाचे आयोजन केले. जर्मनीतील बर्लिन येथे स्पोर्ट्स पॅलेसमध्ये त्यांनी त्यावेळच्या प्राणी कल्याणा विषयक समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांचे आयोजन केले आणि पहिल्याच कार्यक्रमात सुमारे पाच हजार लोकांनी भाग घेतला.

World Animal Day 2022: Objectives

जागतिक प्राणी दिनाची उद्दिष्टे
जागतिक प्राणी संरक्षण दिन हा प्राणी वाचवण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो.

  • प्राण्यांवरील मानवी क्रूरता रोखणे.
  • निसर्गाने प्राण्यांसाठी निर्माण केलेल्या जंगलाचे जतन करणे.
  • प्राण्यांच्या भावनांचा आधार करणे, प्राण्यांची स्थिती सुधारणे.
  • पशुवैद्यकीय औषध आणि संवर्धनाचा प्रसार करणे.
  • नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या प्रजातींना वाचवणे.
  • वन्य-जीवन वर नियंत्रण ठेवणाऱ्या प्राण्यांनाही मानवासारखे जीवन असते, त्यामुळे तेही आदरास पात्र असते याची जाणीव करुन देणे .

World Animal Day 2022: Theme in Marathi

जागतिक प्राणी दिन 2022 थीम
दरवर्षी जागतिक प्राणी दिन एक विशिष्ट थीम वर आधारित असतो, आणि या थीम द्वारे लोकांना एखाद्या विशिष्ट विषयावर जागरूक किंवा लक्ष केंद्रित करावे असा या थीमचा उद्दिष्ट असतो.

जागतिक प्राणी दिन 2022 थीम: या वर्षाची जागतिक प्राणी दिनाची थीम “परिसंस्थेच्या पुनर्रचना यासाठी मुख्य प्रजाती पुनर्प्राप्त करणे” ही आहे. जागतिक प्राणी दिन 2020 ची थीम ‘माणुस आणि कुत्रा’ होती.

World Animal Day 2022 Theme: “Recovering key species for ecosystem restoration”

World Animal Day 2022: Celebrated

जागतिक प्राणी दिवस कशाप्रकारे साजरा केला जातो?
जागतिक पाणी दिन जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. या दिवशी अनेक कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले जातात. या दिवशी अनेक प्राणी प्राण्यांविषयी जनजागृती केली जाते तसेच मॅरेथॉन इत्यादी आयोजित केल्या जातात. पाळीव प्राणी दत्तक घेणे, बेघर प्राण्यांना आश्रय देणे प्राण्यांसाठी काहीतरी मदत करणे तसेच प्राणी संघटना बनवणे, प्राण्यांबद्दल कायदे करणे यासारखे आयोजन केले जाते.

World Animal Day 2022: Significance

जागतिक प्राणी दिनाचे महत्त्व
माणूस हा अगदी सुरुवातीपासूनच अतिशय स्वार्थी प्राणी आहे, ज्याने सर्व मर्यादा ओलांडून पृथ्वीचे शोषण केले आहे. आज मानवाने पृथ्वीवर असलेले अनेक प्राणी आणि नैसर्गिक घटक तसेच अनेक झाडे आणि वनस्पती नष्ट केले आहेत. अनेक प्रजाती नामशेष झालेले आहेत तर काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या सर्वांबद्दल ठोस पावले उचलली नाही तर लवकरच पृथ्वीवरील मानवाचे जीवनही संपुष्टात येईल. अशा परिस्थितीत पृथ्वीवरील संतुलन राखण्यासाठी प्राणी, वनस्पती यांचे संतुलन राखणे आवश्यक आहे त्यामुळे जागतिक प्राणी दिन हा किती महत्त्वाचा आहे याविषयी आपल्याला कल्पना येते.

World Animal Day 2022: Quotes in Marathi

“मूक प्राण्यांना जीवन जितके प्रिय आहे, तितकेच ते माणसाला ही प्रिय आहे.”

“प्राण्यांच्या डोळ्यांमध्ये भाषा बोलण्याची मोठी शक्ती असते.”

“जरा आत्म्याचा अर्थ प्रेम, निष्ठा आणि कृतज्ञता अनुभवण्यास सक्षम असेल तरच प्राणी मानवापेक्षा चांगले आहेत.”

“प्राणी हे काही नसून जिवंत प्राणी आहेत ते आपल्याला करुणा, आदर, मैत्री आणि समर्थन पात्र आहेत.”

“मनुष्य आणि कुत्रा यांच्यातील मुख्य फरक हा आहे की जर तुम्ही भोगलेल्या कुत्र्याला खायला दिले आणि त्याला समृद्ध केले तर तो तुम्हाला कधीही चावणार नाही.”

जागतिक प्राणी दिन कधी साजरा केला जातो?

जागतिक प्राणी दिन दरवर्षी 4 ऑक्टोंबर रोजी साजरा केला जातो.

सर्वप्रथम जागतिक प्राणी दिवस कधी साजरा केला गेला होता?

जागतिक प्राणी दिवस पहिल्यांदा ‘4 ऑक्टोंबर 1929’ रोजी साजरा केला गेला होता.

World Animal Welfare Day 2022: Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon