वर्डप्रेस मध्ये मराठी ब्लॉग तयार करा | WordPress Marathi Blog Create

वर्डप्रेस मध्ये मराठी ब्लॉग तयार करा “WordPress Marathi Blog” Create (meaning, account, tutorial, course, cost)

वर्डप्रेस मध्ये मराठी ब्लॉग तयार करा: WordPress Marathi Blog Create

आजच्या आर्टिकल मध्ये आपण WordPress म्हणजे काय? याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. काही लोकांचे म्हणणे आहे की WordPress हा एक ब्लॉग बनवायचा प्लॅटफॉर्म आहे पण ही गोष्ट पूर्णपणे सत्य नाही WordPress ची सुरुवात 2003 मध्ये Blogging Tools म्हणून केली गेली होती. वर्डप्रेस आता फक्त Blogging Tools म्हणून काम करत नाही तर आज इंटरनेटवर ७ करोड वेबसाईट हाताळण्याचे काम देखील करते.

वर्डप्रेस म्हणजे काय? – WordPress Meaning in Marathi

WordPress Meaning in Marathi: वर्डप्रेस म्हणजे काय? वर्डप्रेस सामग्री व्यवस्थापन प्रणाली आहे म्हणजे CMS आहे ज्याचा उपयोग वेबसाईट तयार करण्यासाठी केला जातो हा एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे जो PHP आणि MySQL ने बनला आहे.

वर्डप्रेस हे इंटरनेटच्या माध्यमातून फ्री मध्ये डाउनलोड केले जाऊ शकते आणि आपल्या वेब सर्वर वर स्थापित करून सहजपणे वेबसाईट बनवता येऊ शकते. हा खूपच सोप्पा इंटरफेस प्रदान करतो ज्यामुळे आपण आपली वेबसाईट, कन्टेन्ट आणि व्हिडिओ सहजपणे गुगल सारख्या वेबसाईट वर अपलोड करू शकतो. वर्डप्रेस मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची कोडींग करण्याची आवश्यकता नसते. पुर्वी वेबसाईट बनवण्यासाठी कोडींग ची आवश्यकता असणे आवश्यक होते. आता वर्डप्रेस ने हे खूपच सुलभ आणि सोपे झाले आहे.

वर्डप्रेस हाताळणे खुपच सोपे माध्यम आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार Theme देखील ठेवू शकता किंवा बदलू शकता. तसेच वर्डप्रेस मध्ये काही Plugin असे असतात जे तुमचे SEO साठी मदत करतात उदारणार्थ Rank Math आणि Yeost SEO यासारख्या Plugins तुम्हाला Google Search Engine मध्ये तुमची वेबसाईट कशा प्रकारे Rank करावी याचे मार्गदर्शन करते.

वर्डप्रेस हा जगातील सर्वात लोकप्रिय CMS आहे जगामधील 80 टक्के वेबसाईट वर्डप्रेस चा वापर करताना दिसतात.

Marathi WordPress for Beginners

wordpress.com आणि wordpress.org मध्ये काय फरक आहे वर्डप्रेस आपल्याला वेबसाईट तयार करण्यासाठी दोन प्लॅटफॉर्म देतो एक wordpress.com आणि दुसरी wordpress.org

wordpress.org: हे एक open source system management software आहे याचा कोणीही मोफत वापर करू शकतो त्यासाठी तुम्हाला एक Domain Name आणि Hosting ची गरज असते.

वर्डप्रेस मध्ये आपल्याकडे आपल्या वेबसाइट चे संपूर्ण कंट्रोल असते यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार थिम आणि प्लगइन वापरू शकता.

WordPress सारख्या open source platform वर आपण काय काय तयार करू शकतो?

WordPress सारख्या ओपन सोर्स प्लॅटफॉर्मवर आपण आपला स्वतःचा Personal Blog, Affiliate Marketing Website असे इतर काहीही वेबसाइट बनवू शकतो ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार video, images सारख्या गोष्टी करता येतात.

वैयक्तिक वेबसाइट, ब्लॉग, सांख्यिकी वेबसाइट, बातम्या वेबसाइट, जॉब पोर्टल, पोर्टफोलिओ, व्यवसाय वेबसाइट, शाळा कॉलेज वेबसाइट, शब्दकोश, निर्देशिका, ई-कॉमर्स वेबसाइट, प्रश्न उत्तर वेबसाइट, कूपन वेबसाइट, विक्रीसाठी ऑनलाइन वेबसाइट, सोशल नेटवक, विकी साइट.

  • personal website
  • blog
  • statistic website
  • news website
  • job portal
  • portfolio
  • business website
  • school college website
  • business directory
  • E-commerce website
  • question answer website
  • coupon website
  • online for selling website
  • social network
  • Wiki site
  • affiliate website

याचा अर्थ असा की वर्डप्रेसच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला हव्या तशा वेबसाइट बनवू शकता.

वर्डप्रेस वर अकाउंट कसे तयार करावे? (How to create an account on WordPress)

WordPress वेबसाईट वर Account तयार करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक Domain Name ची गरज असेल त्यासोबतच एक Hosting ची सुद्धा गरज असेल होस्टिंग घेतल्यानंतर तुम्हाला तुमचे डोमेन नेम त्यामध्ये ऍड करावे लागेल डोमेन नेम ऍड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या होस्टिंग वेबसाइटमध्ये WordPress Install करावे लागेल. वर्डप्रेस इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला त्याचा Username आणि Password द्यावा लागेल हे केल्यानंतर लगेच तुमची वेबसाईट काही क्षणातच क्रियेट होते.

वर्डप्रेस मध्ये वेबसाईट बनवण्याचा खर्च येतो? (WordPress Cost)

तसे पाहायला गेले तर वर्डप्रेस मध्ये वेबसाइट बनविण्याचा खर्च खूपच कमी आहे यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही यामध्ये अनेक गोष्टी तुम्हाला फ्री मध्ये दिल्या जातात. फक्त तुम्हाला होस्टिंग आणि डोमेन नेम ची गरज असते.

हे पण वाचा…

How To Start Blog in Marathi

वर्डप्रेस चा उपयोग काय आहे?

वर्डप्रेस उपयोग वेबसाईट बनवण्यासाठी केला जातो. यामध्ये तुम्हाला हव्या तशा प्रकारे तुम्ही वेबसाइट बनवू शकता. उदाहरणार्थ: अफिलॅटे वेबसाईट, न्युज वेबसाईट, जॉब वेबसाईट किंवा पर्सनल वेबसाईट सुद्धा बनू शकता.

वर्डप्रेस अकाउंट उघडण्यासाठी किती खर्च येतो?

वर्डप्रेस हा ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारे खर्च करावा लागत नाही.

वर्डप्रेस मध्ये मराठी ब्लॉग तयार करा: WordPress Marathi Blog Create

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon