गुंतवणूक न करता ऑनलाइन व्यवसाय कसा सुरु करावा?

आजच्या आर्टिकल मध्ये आपण कोणत्याही प्रकारची गुंतवणूक न करता ऑनलाइन व्यवसाय (without investment online business ideas in Marathi) कसा सुरू करावा याविषयी माहिती जाणून घेत आहोत.

आपल्या भारत देशामध्ये बिझनेस करणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे कारण की आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये बिझनेस रिलेटेड कोणतेही मार्गदर्शन दिले जात नाही त्यामुळेच भारतामध्ये बिझनेस करणारे खूपच कमी लोक आहेत सध्या डिजिटल इंडिया मुळे लोक आता बिझनेस या क्षेत्रांमध्ये उतरत चाललेली आहेत. पण कोणता बिजनेस करावा हे त्यांना कळत नाही आणि बिजनेस करायचं झालं तर खूप सारे भांडवल लागते आणि या सर्वांना घाबरून सामान्य माणूस बिझनेस करू शकत नाही.

गुंतवणूक न करता ऑनलाइन व्यवसाय कसा सुरु करावा?

तर मित्रांनो घाबरू नका आज आपण या आर्टिकल मध्ये असे अशा काही व्यवसाय विषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये कोणत्याही प्रकारे तुम्हाला कोणतीही गुंतवणूक न करता महिन्याला 50 ते 1 लाख रुपये इन्कम मिळू शकतो.

डिजिटल इंडिया मुळे असे व्यापार करणे खूपच सोपे झाले असल्यामुळे हे बिझनेस तुम्ही घरच्या घरी देखील करू शकता चला तर जाणून घेऊया कोणतीही गुंतवणूक न करता व्यापार कसे करावे याविषयी माहिती कसा करता येईल याविषयी थोडीशी माहिती.

ब्लॉगिंग:

ब्लॉगिंग हे नाव तुम्ही युट्युब वर खूप वेळा ऐकले असेल ब्लॉगिंग हे खूपच चांगले माध्यम आहे ऑनलाइन पैसे कमवण्यासाठी. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारे पैसे देण्याची गरज नाही. ब्लॉगिंग हे गुगलचे एक प्रॉडक्ट आहे जे तुम्हाला पैसे देते.

Blogspot.com हे गुगलचे फ्री ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या मदतीने तुम्ही महिन्याला वीस ते एक लाख रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवू शकता लक्षात ठेवा फक्त Blogspot.com हेच तुम्हाला फ्री मध्ये मिळू शकते जर तुम्हाला ऑफिसर वेबसाईट बनवायची असेल तर तुम्हाला (domain name) विकत घ्यावा लागतो आणि त्यासाठी (hosting) देखील विकत घ्यावी लागते. ज्याच्यामध्ये त्यांनी तुम्ही वेबसाईटला ऑफिशियल वेबसाईट बनू शकता जे युजरला खूपच अट्रॅक्टीव्ह बनू शकते पण यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील जर तुम्ही beginner आहात म्हणजेच ब्लॉगिंग मध्ये नवीन आहात आणि ब्लॉगिंग करायची इच्छा आहे तर तुम्ही गुगलच्या Blogspot.com वर काम करू शकता यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे चार्जेस किंवा कोणत्याही प्रकारचे शुक्ल द्यावे लागत नाही. 100 डॉलर होताच गुगल तुम्हाला पेमेंट पाठवत असते. ब्लॉगिंग हा सर्वात फायदेशीर ऑनलाइन बिजनेस आहे ज्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक न करता पैसे कमवू शकता.

युट्युब:

आज युट्युब चे नाव कुणी नाही ऐकले नाही. युट्युब सर्वच फास्ट पैसे कमवून देण्याचे माध्यम बनलेले आहे यामध्ये तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचे असतात जे तुम्ही कोणतीही युट्युब वरील ट्विटोरियल पाहून माहिती मिळवू शकता.

युट्युब चॅनेल चालू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही शुल्क द्यावे लागत नाही. युट्युब हे फ्री ऑफ कॉस्ट प्लॅटफॉर्म आहे जी गुगलची निर्मिती आहे. युट्युब वर पैसे कमावणाऱ्यांची संख्या आज भारतामध्ये सर्वात जास्त आहे. तसेच युट्युब मधून किती तरी मोठे स्टार निर्माण झालेले आहे. आज त्यांचा इन्कम एक कोटीच्या घरामध्ये आहे. युट्युब सुरू करण्यासाठी कोणतेही प्रकारचे चार्जेस आपल्याला द्यावे लागत नाही फक्त तुमच्या मध्ये किती क्रिएटिव्हिटी आहे आणि तुम्ही कशा प्रकारे व्हिडिओ बनवता यावर ते अवलंबून असते.

युट्युब वर पैसे कमवण्यासाठी काही युट्युब चे नियम आहेत.

  • 1000 सबस्क्रायबर असणे आवश्यक आहे.
  • 4000 वॉच टाईम असणे आवश्यक आहे.
  • तुमच्या चैनल वर कोणत्याही प्रकारची कॉपीराईट स्ट्राइक नसावी.
  • तुम्ही युज करणारे व्हिडिओ युनिक असावे किंवा कॉपीराईट फ्री असावे.
  • जर तुम्ही कोणत्याही पिक्चर चे व्हिडिओ उचलले तर ते 30 सेकंदाचे असावे.

युट्युब शॉर्ट्स:

जेव्हा भारतामध्ये tiktok बंद झाले आणि भारतामध्ये tiktok मुळे एक गॅप निर्माण झाला तो भरून काढण्यासाठी गुगलने युट्युब शॉटची निर्मिती केली. ज्याच्या मदतीने तुम्ही एक मिनिटाचे व्हिडिओ शेअर करू शकता आणि त्याद्वारे पैसे कमवू शकता.

युट्युब शॉर्ट मधून पैसे कमवण्यासाठी देखील काही नियम आहेत.

युट्युब शॉट्स मधून पैसे कमवण्यासाठी तुमच्या चैनल वर “10 मिलियन व्ह्यूज” येणे आवश्यक आहे.

अफिलिएट मार्केटिंग:

पैसे कमावण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे अफलेट मार्केटिंग. अफिलिएट मार्केटिंग हे असे क्षेत्र आहे ज्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे पैसे न देता मोठमोठ्या कंपन्यांकडून पैसे कमवू शकता जसे की (उदाहरणार्थ: ॲमेझॉन च्या वेबसाईटवरून तुम्ही एखादे घड्याळ तुमच्या मित्राला सजेस्ट केले आणि त्यांनी तुम्ही पाठवलेल्या लिंक वरून ते घड्याळ विकत घेतले तर ॲमेझॉन तुम्हाला त्या घड्याळातील मिळालेल्या नफ्यातून काही टक्के तुम्हाला देते) यालाच अफलेट मार्केटिंग असे म्हणतात. मार्केटिंग मधून खूप चांगले कमिशन मिळत असल्याने मोठमोठे ब्लोगर आणि युट्युब वर देखील एक मार्केटिंगचा वापर करताना आपल्याला दिसतात.

अॅफलेट मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला ॲमेझॉनच्या ऑफिशियल वेबसाईटवर अॅफलेट मार्केटिंग प्रोग्राम नावाने तुमचे अकाउंट बनवावे लागते आणि त्या अकाउंट मधून तुम्ही जनरेट केलेल्या लिंक तुमच्या प्रियजनांना किंवा तुम्ही ब्लॉगिंग किंवा युट्युब करत असाल तर त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणे आवश्यक असते. ज्यामुळे जास्तीत जास्त ग्राहक या अॅफलेट लिंक वर येऊन वस्तू खरेदी करतात आणि ज्यामुळे तुम्हाला अॅफलेट मार्केटिंग मुळे नफा होतो.

अॅफलेट मार्केटिंग प्रोग्राम अकाउंट चालु करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही. हे देखील फ्री ऑफ कॉस्ट आहे.

वेब होस्टिंग:

वेब होस्टिंग सध्याची गरज बनलेली आहे. सध्या डिजिटल मार्केटिंगमुळे वेब होस्टिंगला चांगली मागणी आहे. वेब पोस्टिंग देखील तुम्हाला अॅफलेट मार्केटिंग सारखेच काही टक्के कमिशन देते पण यामध्ये ॲफिलेट मार्केटिंग पेक्षा जास्त कमिशन तुम्हाला मिळते कारण की होस्टिंग महाग असल्यामुळे यामध्ये तुम्हाला नफा देखील चांगला मिळू शकतो.

भारतामध्ये खूप साऱ्या वेब होस्टिंग कंपन्या आहेत. ज्या अफिलेट प्रोग्रॅम चालवतात. तुम्ही या कंपन्यांचे वेब होस्टिंग विकून खूप सारा पैसा कमवू शकता.

इंस्टाग्राम:

हो इंस्टाग्राम देखील पैसे कमवण्याचे एक माध्यम आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचे व्हिडिओ, फोटो शेअर करून इंस्टाग्राम द्वारे पैसे कमवू शकता. इंस्टाग्राम द्वारे पैसे कसे कमवावे याविषयी आम्ही नवीन पोस्ट घेऊन येणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला डिटेल मध्ये कळेल की इंस्टाग्राम द्वारे पैसे कसे कमवावे?

फेसबुक:

फेसबुकच्या माध्यमातून देखील तुम्ही पैसे कमवू शकता फेसबुक वर तुम्ही तुमच्या ब्लॉग पोस्ट शेअर करून फेसबुकच्या माध्यमातून पैसे कमवू शकता यावर देखील आम्ही नवीन पोस्ट घेऊन येणार आहोत त्यामुळे जर तुम्ही आमच्या वेबसाईटवर नवीन असाल तर आजच आमच्या वेबसाईटला सबस्क्राईब करा.

कोणतीही गुंतवणूक न करता ऑनलाइन बिझनेस कसा सुरु करावा?

जर तुम्ही कोणतेही गुंतवणूक न करता ऑनलाईन बिझनेस करण्याचा विचार करत असाल तर हा आर्टिकल संपूर्ण वाचा.

गुंतवणूक न करता ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणते मार्ग आहेत?

गुंतवणूक न करता ऑनलाइन व्यवसाय सुरू करण्यासारखे अनेक व्यवसाय आहेत. ज्याची माहिती आम्ही सविस्तरपणे या आर्टिकल मध्ये दिलेली आहे त्यामुळे आर्टिकल संपूर्ण वाचा.

निष्कर्ष:
गुंतवणूक न करता ऑनलाइन व्यवसाय 
करणे खूपच सोपे झालेले आहे, कारण की डिजिटल इंडिया मुळे या सर्वच गोष्टी एका क्लिकमुळे आपल्यासमोर आहेत. ऑनलाइन पैसे कमवण्यासाठी कोणत्याही प्रकारची साधने किंवा उपकरणे घेण्याची गरज नाही. एकही पैसा न लावता तुम्ही महिना आला पन्नास ते एक लाख रुपये कमवू शकता किंवा त्याच्यापेक्षाही जास्त कमवू शकता हा आर्टिकल अशा व्यक्तींसाठी होता ज्यांना डिजिटल मार्केटिंग मध्ये व्यवसाय सुरू करण्याचा आहे.

आशा आहे मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल आणि जर तुम्हाला असेच आर्टिकल वाचायचे असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा