WED IN INDIA मिशन काय आहे?

मोदी सरकारचे नवीन मिशन “WED IN INDIA” जम्मू कश्मीरमधील आर्टिकल 370 रद्द केल्यानंतर प्रथमच भारतातील “प्रंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी” यांनी जम्मू कश्मीर यांचा दौरा केलेला आहे. भारतातील तसेच पश्चिमोती देशातील देखील न्यूज मीडियाने यावर खूप जोर दिलेला आहे कारण की ही व्हिजिट खूपच पॉलिटिकल मानले जात आहे. (भारतातील वेडिंग इंडस्ट्री $75 बिलियन डॉलरचे आहे जी वर्षाला 7-8 टक्क्यांनी वाढत जाते) भारतामध्ये लग्न करणे हे आणि तेही थाटामाटात लग्न करणे संपत्तीचे आणि प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. त्यामुळे भारतातील सर्वच लोक लग्नासारख्या सोहळ्यावर भरपूर खर्च करताना दिसतात. त्यामुळे सरकारने आता “WED IN INDIA” ही नवीन पॉलिसी सुरू करणार आहे असे सांगण्यात येत आहे.

ही योजना सुरू करण्यामागचे कारण म्हणजे मागच्या काही वर्षांमध्ये बाहेरच्या देशांमध्ये जाऊन लग्न करण्याचे प्रमाण खूपच जास्त दिसत होते यालाच आळा घालण्यासाठी मोदी सरकारने आता “WED IN INDIA” नावाचे मिशन चालू केलेले आहे, या मिशन अंतर्गत बाहेर जाऊन लग्न करण्यापेक्षा भारतातल्या भारतात लग्न करून भारताच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणे हा हेतू आहे.

भारत हा एकटा देश सोडला तर भारताच्या आसपासचे जे जवळचे देश आहेत त्याच्यामध्ये लग्नाचे प्रमाण घटत चाललेत हे दिसत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे (आशियाई देश जसे की चीन, साऊथ कोरिया, जपान यासारख्या देशांमध्ये लग्नाचे प्रमाण खूपच कमी होत चालल्याचे दिसत आहे) पण भारत सारख्या देशांमध्ये लग्न करणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त दिसून येत आहे.

भारतामध्ये लग्न करणे हे प्रतिष्ठेचे मानले जाते त्यामुळे सामान्य वर्ग देखील लग्नासारख्या सोहळ्यावर भरपूर खर्च करताना आपल्याला दिसतो. भारतातील एक सामान्य छोटेसे लग्न देखील पाच लाखाच्या आसपास खर्च होताना दिसतो.

भारतामधील श्रीमंत लोक बाहेरच्या देशात जाऊन लग्न करणे हे प्रतिष्ठेचे मानतात त्यामध्ये ‘टर्की’ या देशांमध्ये जाऊन लग्न करणे आणखी प्रतिष्ठेचे मानले जाते, कारण की तेथील पर्यटन आणि तिथले मॅनेजमेंट यासारख्या गोष्टींना लोक भारावून जाऊन डेस्टिनेशन वेडिंग करण्यास बाहेरच्या देशात जात आहेत. या गोष्टीला थोडासा आळा घालण्यासाठी भारतातील टुरिझम ने देखील या गोष्टीला “India say I do” नावाचे कॅम्पेन सुरू केले होते. (यामध्ये मोठ मोठ्या श्रीमंत लोकांना सांगितले गेले होते की भारताबाहेर जाऊन लग्न करण्यापेक्षा भारतातल्या भारतात लग्न केल्याने भारतातला पैसा भारतामध्येच राहील आणि त्याचा फायदा भारतीय इकॉनोमीला होईल)

जम्मू कश्मीर मधले आर्टिकल 370 हटल्यानंतर प्रथमच माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरला भेट दिली. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जम्मू कश्मीर हा भारतातील सर्वात महत्वाचा पर्यटन केंद्र असल्याचे सांगितले जात आहे. भारतात वरील स्वर्ग म्हणून जम्मू कश्मीरची ओळख आहे. त्यामुळे मोदी सरकारने नवीन मिशन लागू केले आहे ज्याचे नाव आहे “WED IN INDIA” या मिशन ने भारतातील पैसा भारतातच राहील आणि त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल.

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा