Top 10 Village Business Ideas in Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण “ग्रामीण भागातील व्यवसाय” कोणकोणते आहेत याविषयी माहिती जाणून घेत आहोत. बऱ्याच लोकांना ग्रामीण भागामध्ये व्यवसाय करण्याची इच्छा असते पण त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न नेहमी असतो की कोणता बिजनेस करावा ज्यामुळे जास्त नफा होऊ शकतो चला तर जाणून घेऊया ग्रामीण भागामध्ये करण्याजोगे काही महत्त्वपूर्ण बिजनेस विषयी माहिती.
ग्रामीण भागातील व्यवसाय 2023
ग्रामीण भागामध्ये कोणत्याही प्रकारच्या रोजगार संधी उपलब्ध नसल्यामुळे गावामध्ये बिजनेस करणे हे फायद्याचे ठरू शकते. शेतीसोबत जोडधंदा असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये जास्त नफा मिळतो.
किराणा दुकान
मित्रांनो, सध्या ग्रामीण भागामध्ये किराणा मालाचे दुकान चालवणे खूपच सोपे झाले आहे. गावामध्ये आता पर्यटन विकास सुरू झाल्यामुळे गावाकडे किराणा मालाचे दुकान व्यवसाय सुरू करणे हा एक चांगला व्यवसाय ठरू शकतो. तसेच रस्ते वाहतूक चांगली झाल्यामुळे शहरातली मालगाव मध्ये सहज काही तासांमध्येच येऊ शकतो. (उदाहरणार्थ: मॅगी हा लोकांचा दैनंदिन जीवनाचा भाग बनलेला आहे)
तसेच चॉकलेट बिस्कीट यासारख्या गोष्टीची देखील मागणी जास्त असल्यामुळे हा व्यवसाय करणे फायद्याचे ठरू शकते तसेच या गोष्टींवर मार्जिन सुद्धा खूप कमी असल्यामुळे हा एक प्रॉफिटेबल बिझनेस ठरू शकतो.
डेरी फार्म
जर तुम्ही डेरी फार्म सुरू करण्याचा विचार करत असाल तर या आधी तुम्ही डेरी फार्म विषयी डिटेल्स मध्ये अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. डेरी फार्म व्यवसायामध्ये नफा खूप जास्त असतो. डेरी फार्म सारख्या व्यवसायाला सरकार देखील अनुदान देत असते. त्यामुळे गावामध्ये डेअरी फार्म व्यवसाय सुरू करणे हा एक फायद्याचा व्यवसाय ठरू शकतो.
दुधाचा व्यवसाय
गावातील प्रत्येक घरामध्ये एक किंवा दोन म्हशी असतात. तुम्ही स्वतःचा दूध व्यवसाय देखील चालू करू शकता. दूध व्यवसाय मध्ये मार्जिन जास्त असल्यामुळे हा एक प्रॉफिटेबल बिजनेस ठरू शकतो. पण या व्यवसायामध्ये जोखीम देखील असू शकते. हा व्यवसाय करणे थोडासा खर्चिक असल्यामुळे तुम्ही सरकारी अनुदानाचा लाभ घेऊ शकता.
बेकरी व्यवसाय
सध्या सोशल मीडिया सारख्या प्लॅटफॉर्म चा आधार घेऊन तुम्ही स्वतःचा बेकरी व्यवसाय देखील सुरू करू शकता. सोशल मीडियावर दाखवणारे केक्स बनवून तुम्ही ग्राहकांना विकू शकता. तसेच बेकरी व्यवसायाला सरकार देखील पाठिंबा देत आहे त्यामुळे हा व्यवसाय करणे खूप सोपे झालेले आहे.
बेकरी व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक घटक खालील प्रमाणे.
- जागेची निवड
- कच्चामाल खरेदी करणे
- केक बनवण्याचे मशीन
- मार्केटिंग करणे
हॉटेल सुरू करणे
हॉटेल व्यवसाय सुरू करणे हा देखील एक चांगला व्यवसाय ठरू शकतो. डिजिटल क्रांतीमुळे मोठमोठे ब्लोगर, युट्युबर आणि फुड ब्लोगर वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत असतात. त्यांना पाहून इतर लोक आकर्षित होतात. अशातच जर तुम्ही तुमच्या गावांमध्ये हॉटेल व्यवसाय सुरू केला तर तो तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. हॉटेल व्यवसायामध्ये मार्जिन भरपूर मिळते त्यामुळे ग्रामीण भागामध्ये हॉटेल व्यवसाय सुरू करणे फायद्याचे ठरू शकते.
वडापाव बिजनेस सुरू करणे
महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही जा वडापाव हा सर्वांचा आवडता आहे. वडापाव ही अशी गोष्ट आहे कोणतीही व्यक्ती ती आवडीने खाते. वडापाव बिजनेस सुरू करणे हा एक अत्यंत फायद्याचा व्यवसाय ठरू शकतो. या व्यवसायातून तुम्ही दिवसाला 800 ते 1000 रुपये कमवू शकता. हा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त वेगाने वाढत चाललेला बिजनेस आहे.
भाजीपाला विक्री
मित्रांनो, जर तुम्ही भाजीपाला विक्री व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कंट्री साईट सारख्या (तालुका) एसटी स्टँड यासारख्या ठिकाणी तुम्हाला हा बिजनेस सुरु करावा लागेल. कारण की ग्रामीण भागामध्ये सर्व शेती करत असल्यामुळे गावांमध्ये भाजीपाला विकणे थोडेसे कठीण जाऊ शकते. कंट्री साईड सारख्या ठिकाणी भाजीपाला विकणे हे अत्यंत फायद्याचे ठरू शकते. भाजीपाला व्यवसायातून शेतकरी आपल्या मनाप्रमाणे भाजीपाला ग्राहकांना विकू शकतो या व्यवसायामध्ये कोणत्याही मध्ये त्याची गरज भासत नाही. त्यामुळे सर्व प्रॉफिट हा तुमचा असतो.
ब्युटी पार्लर
भारतातील प्रत्येक गाव आता हे विकसित होत चाललेले आहे त्यामध्ये ब्युटी पार्लर हा व्यवसाय देखील गावांमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे. महिला ब्युटी पार्लरचा कोर्स करून हा व्यवसाय सुरू करू शकतात. सध्या ग्रामीण भागामध्ये ब्युटी पार्लर व्यवसाय ला खूप मागणी आहे. तसेच लग्न कार्यामध्ये ब्युटिशनची खूप मागणी असते. हा व्यवसाय तुम्हाला महिन्याला 30 ते 50 हजार रुपये कमवून देऊ शकतो.
आरो फिल्टर व्यवसाय
ग्रामीण भागामध्ये सध्या पाणी शुद्धीकरणाचे व्यवसाय जोर पकडताना दिसत आहे. हा व्यवसाय कंट्री साईड असलेल्या ठिकाणी खूप मागणीत असलेला दिसत आहे. वॉटर फिल्टर व्यवसाय मध्ये जास्त नफा मिळत असल्याने हा व्यवसाय सुरू करणे खूप फायद्याचे ठरू शकते. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला पाण्याची आवश्यकता असतेच त्यामुळे आरो फिल्टर बिजनेस सुरू करणे खूपच फायद्याचे ठरू शकते.
आईस्क्रीम पार्लर
आईस्क्रीम लहान किंवा मोठ्यांना सर्वांनाच आवडते उन्हाळ्यामध्ये तर या व्यवसायाला खूपच मागणी असते ग्रामीण भागामध्ये ऊन प्रचंड असल्यामुळे आईस्क्रीम पार्लर सारखे बिजनेस उन्हाळ्यासारख्या ऋतूमध्ये खूपच फायदेशीर ठरू शकते. आईस्क्रीम पार्लर बिजनेस मध्ये मार्जिन पण खूप जास्त असते.
आईस्क्रीम पार्लर सुरू करण्यासाठी आवश्यक घटक
- जागेची निवड
- कच्चा माल
- आईस्क्रीम बनवण्याचे उपकरण