लवकर स्टार प्रवाह वाहिनीवरील ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार - Information Marathi

लवकर स्टार प्रवाह वाहिनीवरील ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार

लवकर स्टार प्रवाह वाहिनीवरील ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार

Telegram Group Join Now

स्टार प्रवाह वाहिनीवरील बहुतेक सर्वच मालिका टीआरपीच्या रेसमध्ये पुढे दिसत आहे. या वाहिनीने झी मराठी आणि कलर्स मराठी वाहिनीला मागे टाकले होते गेल्या काही दोन वर्षे होऊन अधिक काळापासून स्टार प्रवाह मालिकांचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

मात्र आता इतके वर्ष चालू असलेल्या या मालिकेला आता प्रेक्षक कंटाळलेले आहेत त्यामुळे वाढीव कथानकाला कंटाळून लोकांनी त्यावर टीका करण्यास सुरुवात केलेली आहे. लवकरच स्टार प्रवाह वरील मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेचे अखेरचे शूटिंग नुसतेच पार पडले आहे मालिकेचे शेवटचा सीन असे म्हणत कलाकारांनी आपल्या पात्राला निरोप दिलेला आहे.

स्टार प्रवाह वरील “सहकुटुंब सहपरिवार” हि मालिका 24 फेब्रुवारी 2020 रोजी सुरू झाली होती. या मालिकेची कथा अशी होती की कितीही संकट आली तरी मोरे कुटुंब नेहमीच एकमेकांची साथ देत असत. कुटुंबात काही मतभेद असल्याचे वाद-विवाद झाले तरीही मंडळी पुन्हा एकत्र याने नांदू लागत. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या खूपच पसंती उतरली. काही काळासाठी ही मालिका टीआरपी मध्ये टॉप वर होती. पण काही कारणामुळे ही मालिका भरकटत गेली त्यामुळे प्रेक्षकांनी या मालिका वर टीका करण्यास सुरुवात केली शेवटी कंटाळून प्रेक्षकांनी या मालिकेकडे पाठ ठरवलेली आहे.

Bigg Boss OTT Season 2: पूजा भट्टने या कारणामुळे शो सोडला?

सहकुटुंब सहपरिवार या मालिकेला तीन वर्ष होऊन गेली आहेत. गेल्या वर्षभरापासून ही मालिका बंद करावी अशी प्रेक्षकांची मागणी होती मधल्या काळात या मालिकेच्या कलाकारांवर मासिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला होता. आता अखेर टीआरपी कमी झाल्यामुळे ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेने 1000 भागांचा टप्पा पूर्ण केलेला आहे.

Leave a Comment