शनि ग्रहाची माहिती (Shani Graha chi Mahiti)

आजच्या आर्टिकल मध्ये आपण शनि ग्रहाची माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या सौरमंडल मध्ये शनि ग्रह हा दुसरा नंबर चा सर्वात मोठा ग्रह आहे यादी आपण गुरु ग्रहाची माहिती जाणून घेतली होती आज आपण शनि ग्रहाची रचना कशी झाली याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

  • शनि ग्रहाचे वलय किती आहेत?
  • वर्तमान मध्ये शनि ग्रहाला किती उपग्रह आहेत?
  • शनि ग्रहाचा रंग कसा आहे?
  • शनि या ग्रहाला एकूण चंद्र किती आहेत?
  • शनि या ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र कोणता आहे?
  • शनि ग्रहाची निर्मिती कशी झाली?,
  • सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह कोणता?
  • शनि ग्रहाचा व्यास किती आहे?
  • शनिची साडेसाती म्हणजे काय?

शनि ग्रहाची माहिती (Shani Graha chi Mahiti)

आपल्या सौरमंडल मध्ये सूर्यापासून सहाव्या क्रमांकावर असणारा शनि ग्रह आपल्या सूर्यमालिकेतील दुसरा हा सर्वात मोठा ग्रह आहे. हा ग्रह पृथ्वीपेक्षा नऊ पटीने मोठा आहे आणि याचे घनत्व पृथ्वीपेक्षा 8 टक्क्यांनी जास्त आहे शनि ग्रह पृथ्वीपेक्षा 95 पटीने मोठा आहे.

शनि ग्रह हा वायुरूपनी बनलेला ग्रह आहे तसेच याला हिंदी मध्ये गॅस दानव असेसुद्धा म्हटले जाते शनि ग्रहाचे खगोलीय चिन्ह h आहे.

शनि ग्रहाचा फोटो “कॅसिनी उपग्रह” द्वारे घेतला गेलेला आहे. विकिपीडिया वर असलेला हा फोटो शनि ग्रहाची खरी माहिती देतो या फोटोमध्ये शनि ग्रहाची वास्तविकता कशी आहे आणि शनि ग्रहाचा रंग कोणता आहे याचे वर्णन केले गेलेले आहे.

शनी ग्रहाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? What is Saturn called in English

शनी या ग्रहाला इंग्लिश मध्ये Saturn या नावाने ओळखले जाते.

शनि ग्रहाची रचना (Shani Graha Chi Rachana)

शनि हा ग्रह मुख्यता लोखंड निकेल आणि (सिलिकॉन आणि ऑक्सिजन मिश्रित) दगडा पासून बनलेला आहे. शनि ग्रहा एक वायू रुपी असलेला ग्रह आहे या ग्रहावर हायड्रोजन आणि हेलिअमच्या चे प्रमाण खूप आहे.

शनी ग्रहावर अमोनिया क्रिस्टल चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ग्रहाला थोडासा पिवळा रंग प्राप्त झालेला आहे. विकिपीडियाच्या ऑफिशिअल वेबसाईट वर तुम्हाला शनि ग्रहाची ओरिजनल इमेज पाहिला मिळेल ही इमेज कैसिनो उपग्रहाद्वारे घेतली गेलेली आहे.

शनि ग्रहाबद्दल असे म्हटले जाते की शनी ग्रहावर हायड्रोजन असल्यामुळे तेथील विद्युत धारा शनि ग्रहाचे चुंबकीय क्षेत्र वाढवण्यास मदत करते पण हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीच्या मानाने खूप कमी आहे हे चुंबकीय क्षेत्र गुरु ग्रहाच्या जवळ-जवळ असल्यासारखे आहे असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे.

शनि ग्रहावर हवेची गती एक 1800 km किलोमीटर प्रतितास पर्यंत आहे. जी गुरु ग्रह पेक्षा खूपच जास्त आहे पण नेपच्यून या ग्रह पेक्षा खूपच कमी आहे आपल्या सौरमालेतील मध्ये नेपच्यून या ग्रहावर हवेची गती सर्वात जास्त आहे असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे.

शनि ग्रहाचे कडे (Shani Graha che Kade)

शनि ग्रहाला आपली एक विशिष्ट विलय प्रणाली आहे जी 9 मुख्य काड्यांनी बनलेली आहे आणि हे 9 कडे एकत्र मिळून चार कडे बनतात हे कडे हायड्रोजन हेलियम यासारख्या वायू पासून बनलेली आहे.

शनि ग्रहाच्या कड्यांमध्ये धूलिकण आणि दगडांचे तुकडे राग आणि meteorite यासारख्या गोष्टींचे प्रमाण मोठे आहे. त्यासोबत शनि ग्रहाच्या आकड्यांमध्ये बर्फाचे छोटे कण सुद्धा असलेले पहिला मिळालेले आहे.

शनि ग्रहाचे उपग्रह / शनी ग्रहाचे चंद्र Saturn’s Satellite / Saturn’s Moon

शनि या ग्रहाचे एकूण 62 चंद्र आहेत. त्यामध्ये सर्वात मोठा टायटन हा चंद्र आहे.

शनि ग्रहाच्या 62 चंद्रा पैकी टायटन हा शनि ग्रहाचा सर्वात मोठा वर चंद्र किंवा उपग्रह आहे. टायटन हा उपग्रह बुद्ध ग्रहापेक्षा थोडासा मोठा आहे.

नासा शनीच्या चंद्र टायटनवर मोहीम पाठवणार आहे जाणून घ्या का आहे ते विशेष?

नासाने शनीच्या चंद्र टायटनला ड्रॅगन फ्लाई मोहीम पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. नासाने या मोहिमेची वैज्ञानिक उद्दिष्टे जाहीर केली आहेत. आपल्या सूर्यमालेतील ग्रहांपैकी शनीला सर्वाधिक चंद्र आहेत. सौर मंडळाच्या सर्व चंद्रांमध्ये शनीचे टायटन हे सर्वात वेगळे आहे. हा एकमेव चंद्र आहे ज्याला वातावरण आहे आणि त्याच्या पृष्ठभागावर तरलता देखील आढळते. इथले हवामान सुद्धा पृथ्वीसारखे आहे असे म्हटले जाते. इथे पाण्याऐवजी मिथेन पाऊस पडतो. परंतु शास्त्रज्ञांना हे जाणून घ्यायचे आहे की येथे जीवन आहे का. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी, नासाने टायटनला ड्रॅगनफ्लाय मिशन पाठवण्याचे ठरवले आहे, ज्याचे ध्येय त्याने नुकतेच जाहीर केले.

1) नासाच्या ड्रॅगनफ्लाय मिशनमध्ये, 2030 पर्यंत एक रोटोक्राफ्ट पाठवले जाईल जे टायटनच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करेल. नासाने प्लॅनेटरी सायन्स जर्नलमध्ये ‘ड्रॅगनफ्लाय टायटन रोटोक्राफ्ट रिलोकेटेबल लँडरसाठी सायन्स गोल आणि ऑब्जेक्टिव्हज’ नावाचा पेपर प्रकाशित केला आहे. त्याच्या ध्येयांमध्ये रासायनिक जैव हस्ताक्षरांचे संशोधन, टायटनच्या मिथेन चक्राचा अभ्यास, तेथील वातावरण आणि जीवनाच्या सुरुवातीच्या रसायनशास्त्राचा समावेश आहे.

2) या अभ्यासाचे सह-लेखक अॅलेक्स हेस म्हणतात की उत्तर शोधले जाणारे प्रश्न खूप विस्तृत आहेत. कारण टायटनच्या पृष्ठभागावर काय घडत आहे याची आपल्याला कल्पना नाही. नासाची कॅसिनी 13 वर्षांपासून शनीला प्रदक्षिणा घालत आहे, पण टायटनच्या मिथेनच्या जाड वातावरणामुळे त्याच्या पृष्ठभागाच्या पदार्थांविषयी माहिती मिळवणे शक्य झाले नाही. कॅसिनीच्या रडारने तेथील काही आकृत्यांविषयी माहिती दिली आहे, परंतु त्यांच्या रचनेबद्दल काहीही माहिती नाही.

3) हेस यांनी सांगितले आहे की टायटनच्या पृष्ठभागावर पसरलेले द्रव महासागर हे मिथेन किंवा इथेन किंवा बर्फाच्या घन पृष्ठभागाचे आणि कोणतेही सेंद्रिय घन पदार्थ आहेत की नाही हे आधी माहित नव्हते. 2005 मध्ये टायटनच्या पृष्ठभागावर उतरलेल्या ह्युजेन्सची रचना अशा प्रकारे करण्यात आली होती की ती त्याच्या घन पृष्ठभागावर तरंगू शकते आणि तेथे द्रव मिथेन किंवा इथेन महासागरातही तरंगू शकते. तिचे प्रयोग तेथील वातावरणासाठी अधिक होते कारण नंतर ते पृष्ठभागावर उतरण्यास सक्षम होईल की नाही याची खात्री नव्हती. पण ड्रॅगनफ्लाय मिशन पृष्ठभागाचा शोध घेईल.

4) संपूर्ण कारकीर्दीत केवळ टायटनवर काम केलेले हेस म्हणतात, मिशनमुळे टायटनच्या पृष्ठभागावर होणाऱ्या प्रक्रिया समजून घेण्यात मदत होईल. ड्रॅगनफ्लाय मिशनची चित्रे आतापर्यंत टायटनच्या पृष्ठभागाबद्दलच्या सर्व अनुमानांची पुष्टी करतील. त्यांना विशेषतः कॅसिनीच्या निरीक्षणांमधून उद्भवणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात रस आहे, ज्यात तेथील पृष्ठभागाच्या प्रक्रिया आणि पृष्ठभागाच्या वातावरणातील परस्परसंवादाचा समावेश आहे.

5) ड्रॅगनफ्लाय संपूर्ण दिवस टायटनच्या एका ठिकाणी राहतील जे पृथ्वीच्या 16 दिवसांच्या बरोबरीचे आहे. या दरम्यान तो वैज्ञानिक प्रयोग आणि निरीक्षणे करेल आणि नंतर नवीन ठिकाणी उड्डाण करेल. मागील ठिकाणांच्या निरीक्षणाच्या आधारे, शास्त्रज्ञांचे पथक पुढील फ्लाइटमध्ये काय करेल हे ठरवेल. मंगळावर पाठवलेले रोव्हरही त्याच पद्धतीने काम करत आहे. टायटनचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या सप्तमांश आहे पण जाड वातावरण चारपट दाट आहे. यामुळे येथील परिस्थिती विमानांसाठी आदर्श बनते. येथील शांत वातावरण आणि पृथ्वीवरून हलके वारे ड्रॅगनफ्लायसाठी अधिक अनुकूल होतात.

6) नासाच्या या पेपरमध्ये प्रीबायोटिक केमिस्ट्रीशी संबंधित प्रश्नांवर अधिक भर देण्यात आला आहे. पृथ्वीच्या निर्मितीनंतर सुरुवातीला सापडलेल्या अनेक प्रीबायोटिक रासायनिक संयुगे टायटन्सच्या वातावरणात दर्शविली गेली आहेत. टेस पृथ्वीच्या दिशेने किती पुढे सरकली आहे हे हेसला जाणून घ्यायचे आहे. कारण टिनेटच्या वातावरणात पृथ्वीच्या प्रारंभीसारखे वातावरण होते. ड्रॅगनफ्लाय मिशनच्या रासायनिक बायोसिग्नेचरचा शोध बर्‍यापैकी व्यापक असेल. त्याच्या राहण्यायोग्यतेसह, जल-आधारित जीवनासह हायड्रोकार्बनच्या द्रव मोठ्या शरीरात जीवनाची चिन्हे देखील शोधली जातील.

शनि ची साडेसाती म्हणजे काय? Shani Sadesati

शनि या ग्रहाला हिंदू संस्कृतीमध्ये आणि परंपरेमध्ये खूप मोठे स्थान आहे त्यामुळे शनि या ग्रहाचा मनुष्य जीवनावर खूप मोठा प्रभाव पडतो.

समुद्र शास्त्र आणि लाल किताब यासारख्या धार्मिक पुस्तकांमध्ये शनि ग्रहाचा उल्लेख केला गेलेला आहे. तसेच शनि या ग्रहाला देवाची उपमा दिली गेलेली आहे तसेच शनि हा सूर्य देवतेचा पुत्र आहे अशी काही वर्णने धर्मग्रंथांमध्ये लिहिलेली आहेत.

जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनि विराजमान होतो तेव्हापासून त्याच्या आयुष्यामध्ये उथल-पुथल व्हायला सुरुवात होते त्याचे मानसिक शारीरिक आणि आर्थिक नुकसान होण्यास सुरुवात होते तेव्हा आपण म्हणतो की शनिची साडेसाती चालू झालेली आहे.

शनिची वक्रदृष्टी?

जेव्हा शनि एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये विराजमान होतो तेव्हा शनिची साडेसाती चालू झाली असा निष्कर्ष ज्योतिष काढतात. शनिची साडेसाती ही साडे सात वर्षांपर्यंत चालत असते त्यामुळे शनिची साडेसाती असे आपण म्हणतो. शनि जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आपली वक्रदृष्टी टाकतो तेव्हा त्याचे नुकसान होण्यास सुरुवात होते असा त्यामागचा उद्देश आहे किंवा कल्पना आहे.

शनी या ग्रहाचे हिंदू धर्मामध्ये असलेले महत्त्व

शनि ग्रहाला देवाची उपमा दिली गेलेली आहे किंवा शनि ग्रहाला देवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. हिंदू धर्मामध्ये शनि हा सूर्य देवाचा मुलगा आहे तसेच शनिची वक्रदृष्टी ज्या व्यक्तीवर पडते किंवा शनि ज्या व्यक्तीवर कोप करतो तेव्हा त्याचे नुकसान होईल सुरुवात होते. भारतामध्ये शनिदेवाला अशुभ मानले जाते किंवा शनिची वक्रदृष्टी आपल्यावर पडू नये म्हणून शनिदेवाला शांत करण्यासाठी पूजा केली जाते. म्हणूनच आतापर्यंत भारतामध्ये फक्त एकच शनि देवाचे मंदिर आहे. हे मंदिर शनि शिंगणापूर या नावाने ओळखले जाते.

शनि शिंगणापूर मंदिराची माहिती

शनिशिंगणापूर या मंदिराला स्वतःचेच एक वेगळे महत्त्व आणि इतिहास आहे. शनिशिंगणापूर येथे राहणाऱ्या लोकांचे असे मत आहे की हे मंदिर भगवान शनि देवाचे आहे आणि हे मंदिर जगामध्ये एकच आहे कारण की शनिदेव हा कोप करणारा देव आहे त्यामुळे शनि देवा पासून जितके लांब राहता येईल तेवढे चांगले आहे. तसेच शनि शिंगणापूर या गावामध्ये शनिची भक्ती खूप मनापासून केली जाते या गावाचे वैशिष्ट्य असे की या गावाला एकही दार किंवा खिडकी नाही याचे कारण असे की या गावांमध्ये कधीच चोरी होत नाही.

एकदा काही गावकऱ्यांनी शनि मंदिरामध्ये चोरी करून गावातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता पण ते फिरून फिरून पुन्हा त्याच गावात आले त्यामुळे कोणीही या गावांमध्ये चोरीचा प्रयत्न केला तरी त्यांना यामध्ये यश मिळत नाही ते पुन्हा त्याच ठिकाणी येतात त्यामुळे या गावांमध्ये एकही घराला दार किंवा खिडक्या नाहीत या गावाचे रक्षण स्वतः शनि देव करत असल्याने या गावकऱ्यांवर शनि देवाची कृपा आहे असा येथील लोकांचा विश्वास आहे.

शनिशिंगणापूर हे गाव महाराष्ट्र मधील अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात आहे त्याचे क्षेत्रफळ 82.36 km (31.80 sq mi) आहे.

हनुमान आणि शनि देवाचे युद्ध

आपल्या हिंदू मायथॉलॉजी नुसार एकदा हनुमान राम नाम जप करीत बसले होते तेव्हा शनि देव हनुमाना समोर आले पण हनुमान हे एवढे राम नाम जप करण्यामध्ये गुंग होते की शनिदेव त्यांच्यासमोर आले याचे त्यांना भान राहिले नाही आणि हीच गोष्ट शनिदेवांना आवडली नाही त्यामुळे त्यांनी आपली वक्रदृष्टी राम भक्त हनुमानवर टाकली पण हनुमान वर याचा काहीही परिणाम झाला नाही त्यामुळे शनी दैवाला अजून क्रोध आला त्यामुळे ते हनुमान यांच्या डोक्यावर जाऊन बसले आणि हनुमान यांची साधना भंग करू लागले तरीसुद्धा हनुमानवर याचा काहीही परिणाम झाला नाही ते राम नाम जप करतच बसले होते शेवटी शनिदेव हनुमान यांना बोलले की जोपर्यंत तुम्ही राम नाम जप बंद करत नाही तोपर्यंत मी तुमच्या डोक्यावरून उतरणार नाही, त्यावर हनुमान असे म्हणाले की जशी तुमची इच्छा शनिदेव आणि हे बोलून हनुमान नि समोर असलेला डोंगर उचलून आपल्या डोक्यावर घेतला त्या डोंगराच्या वजनाने शनिदेव वेदनेने तडफडू लागले आणि ते म्हणाले की माझी चुकी झाली प्रभू मला माफ करा अशी काही हिंदू धर्मामध्ये शनिदेव आणि हनुमानजी बद्दल गोष्टी आहेत जी मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेली आहे.

शनिदेव आणि रावण यांचे युद्ध

लंकेश पती रावण हा भगवान शंकराचा परम भक्त होता त्यामुळे शंकर भगवान कडून वरदान घेऊन त्यांनी त्री लोकांमध्ये आपले साम्राज्य विस्तार करण्याची इच्छा मनामध्ये धरली त्यासोबतच लंकेश पती रावण यांनी स्वर्गावर आक्रमण करून देव-देवतांना आपले गुलाम बनवले आणि त्यामध्ये शनिदेवांचा ही समावेश होता.

लंकेश पती रावण यांना पुत्र प्राप्त होणार होता आणि त्यांची अशी इच्छा होती कि त्यांचा पुत्र हा त्यांच्यापेक्षाही बलवान असावा त्यामुळे त्यांनी सर्व देवदेवतांना कडून तेजस्वी पुत्र प्राप्त करून घेण्यासाठी ग्रहांची दिशा नक्षत्र आपल्या मनाप्रमाणे करून घेतले होते पण शनिदेवांना हे आवडले नाही त्यामुळे जेव्हा मेघनाथ याचा जन्म झाला तेव्हा शनी देवाने आपली जागा बदलली त्यामुळे मेघनाथ बलवान तर झाला पण आपल्या पिता सारखा बनू शकला नाही जेव्हा लंकेश पती रावण यांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी शनि ला आपल्या सिंहासनाच्या पायथ्याला बसवले जेव्हा लंकेश पती रावण हे आपल्या सिंहासनावरून उठून उभे राहत असे तेव्हा ते एक पाय शनि देवाच्या डोक्यावर ठेवत असे, याचे कारण असे की शनि देवा वर लंकेश पती रावणाचा विशेष राग होता आणि ते त्याला त्याची जागा नेहमी दाखवून देत असे, आपल्यात हिंदू धर्मामध्ये लंकेश पती रावण आणि शनि देवाची अशी माहिती लिहून ठेवलेली आहे.

Shani Graha Question & Answer

Q. शनि ग्रहाचे वलय किती आहेत How many rings does Saturn have?
A. शनि या ग्रहाला एकूण 268 वलय आहेत.

Q. वर्तमान मध्ये शनि ग्रहाला किती उपग्रह आहेत?
A. 8 ऑक्टोंबर 2019 मध्ये शास्त्रज्ञांनी असे सांगितले की शनि या ग्रहाला वर्तमान मध्ये 82 उपग्रह आहेत आणि हे सर्व उपग्रह शनि ग्रहाची परिक्रमा करतात. या उपग्रहांनी मधील 53 उपग्रहांचे नामकरण केले गेलेले आहेत. यापुढे शास्त्रज्ञांनी असेही सांगितले की शनिचे सर्वात मोठे सर्वात शक्तिशाली चंद्र आहेत जे आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे संपूर्णपणे गोल झालेले आहेत.

Q. शनि ग्रहाचा रंग कसा आहे?
A. शनि ग्रहाचा रंग हलकासा पिवळ्या रंगाचा आहे कारण की हा रंग त्याला अमोनिया वायू मुळे प्राप्त झालेला आहे शनि या ग्रहावर अमोनिया हा वायू प्रचंड प्रमाणात आहे त्यामुळे शनि या ग्रहाला हलकासा पिवळा रंग प्राप्त झालेला आहे.

Q. शनि या ग्रहाला किती वलय आहेत?
A. शनि या ग्रहाला 268 वलय आहेत वर्ष 2019 मध्ये शनी या ग्रहाचे पुन्हा अध्ययन केले गेले होते. आणि या अध्यायानामध्ये असा निष्कर्ष निघाला की, शनि या ग्रहाला 268 वलय आहेत.

Q. शनि या ग्रहाला एकूण चंद्र किती आहेत?
A. आतापर्यंत शनि या ग्रहाला 62 चंद्र आहेत असा निष्कर्ष निघत होता पण 2019च्या रिसर्च मध्ये असे आढळले की, चंद्राला 62 उपग्रह नसून त्यांची संख्या 82 आहे म्हणजेच शनी या ग्रहाला 82 चंद्र आहेत.

Q. शनि या ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र कोणता आहे?
A. चंद्राच्या 82 चंद्रा पैकी टायटन हा सर्वात मोठा शनी या ग्रहाचा चंद्र आहे.

Q. शनि ग्रहाची निर्मिती कशी झाली?
A. शनी ग्रहाची निर्मिती इतर ग्रहांप्रमाणे झालेली आहे. फरक फक्त एवढाच आहे की या ग्रहावर हायड्रोजन आणि हेलिअम सोबतच या ग्रहावर अमोनिया नावाचा वायू सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे.

Q. सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह कोणता?
A. आपल्या सौर्य मंडलामध्ये एकूण आठ ग्रह आहेत त्यामध्ये शनि हा दुसऱ्या नंबर चा सर्वात मोठा ग्रह आहे आणि याच ग्रहाला एकूण 82 चंद्र आहेत त्यामुळे सर्वात जास्त चंद्र असलेला ग्रह हा शनी आहे.

Q. शनि ग्रहाचा व्यास किती आहे?
A. शनि ग्रहाचा व्यास हा 116,460 km पर्यंत आहे.

Q. Q. शनि या ग्रहाला सूर्याची परिक्रमा करण्यासाठी किती दिवस लागतात How many days does it take Saturn to orbit the Sun.
A. शनि आणि सूर्य मधील अंतर हे 1.4 अरब प्रकाशवर्ष किलोमीटर आहे. त्यामुळे शनि या ग्रहाला सूर्याची परिक्रमा करण्यासाठी 29 वर्ष आणि पाच महिने चा कालावधी लागतो.

Conclusion,
शनि ग्रहाची माहिती (Shani Graha chi Mahiti) हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

शनि ग्रहाची माहिती (Shani Graha chi Mahiti)

1 thought on “शनि ग्रहाची माहिती (Shani Graha chi Mahiti)”

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा