Sara Kahi Tichyasathi: Serial Story & Cast

लवकर झी मराठी या वाहिनीवर “सारं काही तिच्यासाठी” (Sara Kahi Tichyasathi) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

Sara Kahi Tichyasathi Serial Story

ही मालिका 21 ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार सायंकाळी 7 वाजता ‘झी मराठी‘ या वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. या मालिकेमध्ये दोन सख्या बहिणींच्या गोष्टीबद्दल सांगितले आहे. मालिका 20 वर्षे एकमेकींना न भेटलेल्या दोन सख्ख्या बहिणींची असणार आहे. झी मराठी वाहिनी असेच वेगवेगळे विषय प्रेक्षकांच्या भेटीत घेऊन येत असते.

सख्या बहिणींच्या जीवनावर आधारित एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे या मालिकेचे नाव ‘सारं काही तिच्यासाठी‘ असे आहे. या मालिकेची कथा अशी असणार आहे दोन सख्ख्या बहिणी ज्या गेल्या 20 वर्ष एकमेकांना भेटल्या नाहीत. मोठी बहीण उमा तळकोकणात आपल्या सासरी सुखाने नांदते आणि लहान बहिणी संध्या तिच्या मुलीसोबत गेली 20 वर्षे लंडनमध्ये स्थायिक आहे. दोघींच्या आयुष्यात 20 वर्षांपूर्वी एक अशी घटना घडली त्यामुळे त्या एकमेकांना कायमच्या दुरावल्या. आजचा एकही दिवस नाही ज्यात उमाला आणि संध्याला एकमेकींची आठवण येत नसेल. यामध्ये उमाचा नवरा ‘रघुनाथ खोत‘ हे गावातील मोठे प्रस्थ आहे. रघुनाथ राव हे स्वदेशीचे खंदे पुरस्कार आहेत.

20 वर्षांपूर्वी रघुनाथ रावांना दिलेल्या वचनाखातर उमाने आपल्या लहान बहिणीशी असलेले सगळे नाते तोडून टाकले. स्वदेशीचा पुरस्कार आणि परदेशी गोष्टीचा विरोध करणारे रघुनाथ राव लंडनमध्ये वाढलेल्या संध्याच्या मुलीला स्वीकारतील का? दोन बहिणींमध्ये असे काही घडले ज्यामुळे दोघे एकमेकांशी कायमच्या दुरावल्या. अशाच दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जवळ आणण्यासाठी उमा उचललेले पाऊल सारं काही तिच्यासाठी ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकून घेईल का नाही यावर वाहिनीचे लक्ष आहे.

मालिकेतील कलाकारांची खरी नावे (Sara Kahi Tichyasathi Serial Cast)

रघुनाथराव (अशोक शिंदे)
उमा (खुशबू तावडे)
संध्या (शर्मिष्ठा राऊत)

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group