रॉकी और रानी की प्रेम कहानी बॉक्स ऑफिस कलेक्शन

रॉकी और रानी की प्रेम कहानी बॉक्स ऑफिस कलेक्शन

रॉकी और रानी की प्रेम कहानी” हा चित्रपट रिलीज होताच चार दिवसात या चित्रपटाने जवळजवळ 50 कोटीचा टप्पा पार केलेला आहे.

Telegram Group Join Now

या चित्रपटामध्ये आलिया आणि रणवीरची मुख्य भूमिका असून हा चित्रपट फॅमिली ड्रामा वर आधारित चित्रपट आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून वीकेंडला चांगली कमाई केलेली आहे. या चित्रपटाने चार दिवसाच्या आत 50 कोटीचा टप्पा पार केलेला आहे.

एका रोपटनुसार ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी‘ या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशीच म्हणजेच ओपनिंग डे ला 11.1 कोटी ची कमाई केली आहे, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 16.05 कोटी तर तिसऱ्या दिवशी 18.75 कोटी आणि चौथ्या दिवशी 7.50 कोटीची कमाई केलेली आहे.

हॉलीवुड चित्रपट ‘ओपनहाइमर‘ चित्रपटाला बॉलीवूड चित्रपट चांगली टक्कर देताना दिसत आहे. तसेच एका सूत्राच्या अनुसार 2023 मध्ये सर्वाधिक ओपनिंग कलेक्शन करणारा 2023 मधला हा चित्रपट ठरणार आहे.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटांमध्ये आलिया भट आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहेत तर धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आजमी, अमीर शब्बीर, तोता राय चौधरी, क्षिति जोग आणि अंजली आनंद यांची सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. करण जोहर दिग्दर्शित हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. कारण ने सात वर्षांनी या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत कमबॅक केलेले आहे.

रॉकी और रानी की प्रेम कहानी स्टोरी

पंजाबी मुलगा रॉकी आणि बंगाली मुलगी राणी यांची गोष्ट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमात दाखवण्यात आलेली आहे. 178 कोटीचा बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती झालेली आहे. या सिनेमातील कलाकार आलिया आणि रणवीरचा अभिनय अशा सर्वांचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. चित्रपट 28 जुलैला सिनेमा ग्रहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.

1 thought on “रॉकी और रानी की प्रेम कहानी बॉक्स ऑफिस कलेक्शन”

Leave a Comment