पावसाला निबंध मराठी | Pavsala Nibandh Marathi

Pavsala Nibandh Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण “पावसाला निबंध मराठी” विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

पावसाला या ऋतूला भारतामध्ये वसंत ऋतू असे म्हटले जाते. पाऊस हा भारतामध्ये जून ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीमध्ये पडला जातो. पावसाळ्यात झाडांना बहार येतो सगळीकडे कसे हिरवे हिरवे दिसते. तस पाहायला गेले तर पाऊस आपल्या जीवन सृष्टी मध्ये खूप महत्त्वाचा ऋतू आहे. पाऊस नसता तर आपले काय झाले असते याची आपण कल्पनाच करू शकत नाही?

पावसाला निबंध मराठी | Pavsala Nibandh Marathi

पावसाळा सुरू होताच मोर आनंदाने नाचू लागतो असे काही लोकांचे म्हणणे आहे. असे म्हणतात कि मोर नाचू लागला की पावसाला लवकरच सुरुवात होणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये कावळ्या बद्दल असे म्हटले जाते की जेव्हा कावळा हा पक्षी आपले घरटे ज्या दिशेने बांधतो त्याच्या विरुद्ध दिशेने पाऊस येणार असण्याची दाट शक्यता असते. पाऊस सुरू होता सगळीकडे निसर्गरम्य वातावरण तयार होते.

समज जर पाऊस आपल्याशी बोलू लागला तर काय होईल?

मी शाळेत असताना आम्हाला चौथी च्या पुस्तका मध्ये एक धडा होता; त्या धड्याचे नाव होते; आणि पाऊस बोलू लागला? 90 च्या दशकामधील कोणी हा आर्टिकल वाचत असेल तर त्याला नक्कीच कळले असेल की मला काय म्हणायचे आहे ते!

या धड्यांमध्ये ढग सदू नावाच्या मुलाशी बोलत असतो आणि त्याला सांगत असतो की निसर्गचक्र कशा प्रकारे काम करते. ढग आणि सदू यांच्या मधील संभाषण खूपच छान प्रकारे या धड्यामध्ये मांडले गेले आहेत. निसर्गाचे जलचक्र व कशाप्रकारे काम करते. पावसाची वाफ आणि वाफेतून पुन्हा पाण्याचे रूपांतर कसे होते याबद्दल सविस्तर पणे या धड्या मध्ये माहिती दिली होती.

जेव्हा मुले शाळेत जायला लागतात  तेव्हा त्यांना पावसाच्या कविता शिकवल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने “येरे येरे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा” यासारख्या कविता आज सुद्धा शाळेतील मुलांना शिकवल्या जातात.

आमच्या लहानपणी पावसाळा सुरू होताच आम्ही भवरे, फुटबॉल ई. खेळ खेळायचो. पावसाळ्यात हे खेळ खेळण्याची मजा काही औरच असते.

पाऊस मराठी माहिती (पावसावरील निबंध)

निसर्गाच्या जलचक्रातील पाऊस अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पाऊस सुरू होता शेतकरी आपल्या शेतामध्ये “बियांची पेरणी” करण्यास सुरुवात करतात. पाऊस हा शेतीसाठी खूप महत्त्वाचा घटक आहे. पावसाच्या पाण्यामुळे आपल्याला अन्न आणि पाणी मिळते. नदीवर धरण बांधून आपण पावसाच्या पाण्याने विद्युत ऊर्जा निर्माण करतो. आपल्या हिंदू संस्कृती मध्ये पावसाला इंद्र देवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. प्राचीन मान्यतेनुसार इंद्रदेव पावसाचा वर्षाव स्वर्गातून आपल्या पृथ्वीवर करत असतो. आपल्या हिंदू शास्त्रांमध्ये कोळी बांधव श्रावण महिन्यामध्ये मासेमारी बंद करतात करतात. मान्सून सुरू होताच समुद्रामध्ये आणि नद्यांमध्ये वादळे निर्माण होतात त्यामुळे मासेमारी करता येत नाही आणि दुसरे कारण असे की मान्सून मध्ये मासे मोठ्या प्रमाणामध्ये प्रजनन करत असतात त्यामुळे मान्सून मध्ये म्हणजेच पावसाळ्यामध्ये दोन-तीन महिने मासेमारी बंद ठेवली जाते. या कालावधीमध्ये आपले कोळी बांधव समुद्राला सोन्याचा नारळ वाहतात; आणि ही परंपरा बघण्यासारखी असते.

आपला भारत हा संस्कृती आणि सणांचा देश आहे पावसाळ्यामध्ये आपल्या भारतामध्ये खूप सारे सण साजरे केले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने: नागपंचमी, 15 ऑगस्ट, रक्षाबंधन आणि गोपालकला यासारखे सण पावसाळा ऋतु मध्ये येतात. हिंदू धर्मा मधील सर्वात महत्त्वाचा महिना “श्रावण” हा सुद्धा पावसाळ्यामध्ये येतो.

भारतामध्ये आणखी एक विशेषण म्हणजे “गणेश चतुर्थी” सप्टेंबर किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये येणारा हा सण भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो. या दिवशी भगवान गणेश यांची पूजा केली जाते आणि हा उत्सव दहा दिवस चालतो. हे दहा दिवस संपूर्णपणे सुख: शांतीचे असतात कारण की भगवान गणेशाच हे एकमेव हिंदू धर्मातील असे दैवत आहे ज्यांना “सुखकर्ता दुखहर्ता” असे म्हटले जाते. खासकरून महाराष्ट्रामधील पुणे या जिल्ह्यामध्ये “मानाचे पाच गणपती” आहेत.

1. कसबा पेठ
2. श्री तांबडी जोगेश्वरी
3. श्री गुरुजी तालीम
4. तुळशीबाग
5. श्री केसरी

जर पाऊस पडला नाही तर काय होईल?

जर पाऊस पडला नाही तर याची कल्पनाच आपण करू शकत नाही? असे म्हणतात की सर्व सजीवांची निर्मिती हि पाण्यापासूनच झालेली आहे. सर्व सजीव पाण्यापासून उत्पन्न झालेले आहे. पावसाच्या पाण्यावरच आपले निसर्गाचे जलचक्र अवलंबून आहे. असे म्हणतात की अन्नावाचून माणूस 70 दिवसपर्यंत जगू शकतो; मात्र पाण्याशिवाय तो 3 दिवसही जगू शकत नाही. म्हणजेच पाणी हा किती महत्त्वाचा घटक आहे हे आपल्याला यावरूनच कळले असेल.

जर पाऊस पडलाच नसता तर संपूर्ण पृथ्वीवर मोठमोठे खडक असते आणि पृथ्वीचे वातावरण खूप तप्त असते. त्यामुळे पृथ्वीचा काही भाग हा वाळवंटी प्रदेशाने व्यापला असता. पाऊस पडला नसता तर आपल्या पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण होणार नाही.

पावसाचे रौद्र रूप (पावसाळा मराठी निबंध)

कधीकधी पाऊस हा रौद्ररूप सुद्धा घेऊ शकतो. सध्या निसर्गामध्ये होत असलेले बदल त्यामध्ये मानव हा खूपच मोठ्या प्रमाणात या गोष्टीला जबाबदार आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्या निसर्गाला हानी पोहोचत आहे आणि या वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे दरवर्षी आपल्याला कुठे ना कुठे तरी पूरजन्य परिस्थिती पाहायला मिळते. पृथ्वीचे वातावरण तप्त होऊन युरोप सारख्या देशांमध्ये हिट वेव्ह सारख्या समस्या निर्माण होत आहेत. या हिट वेव्ह सारख्या समस्येमुळे युरोपमधील काही देशांमध्ये पूर सारखी समस्या निर्माण होते आणि ही समस्या अलीकडेच खूप मोठ्या प्रमाणावर दिसत आहे; तसेच ग्लोबल वॉर्मिंग मुळे अंटार्टिकमध्ये मोठ्या प्रमाणात असलेले बर्फाचे पर्वत वितळू लागले आहे त्यामुळे पृथ्वीवर पाण्याची पातळी वाढत आहेत. (उदाहरणार्थ बँकॉक सारखी महानगर किंवा सिटी पाण्याखाली मोठ्या प्रमाणात जात आहे) जर गलोबल वॉर्मिंग चे प्रमाण असेच चालू राहिले तर लवकरच आपले सुष्टी जलमग्न होईल असा अंदाज काही रिसर्च सेंटरने दिलेला आहे. ग्लोबल वॉर्निंग कमी करण्यासाठी “पॅरिस करार” संपूर्ण जगाने मान्य केलेला आहे.

सध्या भारतामध्ये सुध्दा पावसाचे रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या तीन वर्षापासून भारत आणि भारतामध्ये काही राज्यांमध्ये पाऊस हा खूपच भयावह रूपाने पडत आहे. याचे कारण म्हणजे पृथ्वीच्या निसर्गचक्र मध्ये झालेला फार मोठा बदल सध्या जगामध्ये हिवाळा आणि उन्हाळ्यात सारखे ऋतू कमी कमी होत चाललेले आहे आणि पाऊस हा अवेळी सुरू झालेला आहे. पावसाचे वातावरण युरोप आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये कधीही पाहायला मिळते. आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षांपासून पावसामुळे पूरजन्य स्थिती निर्माण झालेली आहे यामध्ये लाखो शेतकऱ्यांचे आणि सामान्य माणसांचे नुकसान झालेले आहे.

Final Word:-
पावसाला निबंध मराठी Pavsala Nibandh Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

पावसाला निबंध मराठी Pavsala Nibandh Marathi

 

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा