Momos Meaning in Marathi

मोमोज ही चायनीज रेसिपी नाही – Momos Meaning in Marathi (History, Varieties, Story) #momos

Momos Meaning in Marathi

Momos Meaning in Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण मोमोज म्हणजे काय? याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मोमोज हा एक पाककृती तिबेटियन पदार्थ आहे हा पदार्थ सिक्कीम, दार्जलिंग, नेपाळ आणि आसाम यासारख्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बनवला जातो. देशाच्या इतर भागांमध्ये देखील हा पदार्थ बनवला जातो आणि आवडीने खाल्ला जातो. मोमोज हा शब्द चिनी भाषेच्या शब्दकोशातून आलेला शब्द आहे आणि चायनीज रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ खूप आवडीने खाल्ला जातो. सर्वांना वाटते की मोमोज हा एक चायनीज पाककृती पदार्थ आहे परंतु याचे मूळ स्थान तिबेट आहे.

मोमोज काय आहे?

मोमोज हा उकडीचा मोदक असतो ज्याच्या मध्ये तिखट भाज्यांचे सारण भरलेले असते आणि शेजवान चटणी सोबत खाल्ले जाते. मैद्या पासून बनवलेला हा पदार्थ खाण्यास खूपच स्वादिष्ट असतो.

मोमोज मध्ये काय असते?

मोमोस मध्ये प्रामुख्याने कोबी, गाजर, सिमला मिरची, टमाटे, आलं, हिरवी मिरचीची पेस्ट, सोयासॉस, काळीमिरी पावडर, मीठ आणि तेल यांचे मिश्रण असते.

मोमोज चे प्रकार (Varieties of Momos)

  • Steam-momo
  • Kothey momo
  • Jhol momo
  • C-momo
  • Fry-momo
  • Open-momo
  • fried momo
  • chicken-momo
  • veg-momo
  • buff-momo

मोमोज बद्दल रंजक कथा (Interesting story about Momos)

मोमोज बद्दल असे म्हटले जाते की ते भारतामध्ये 1960 च्या दशकात आलेत जेव्हा मोठ्या संख्येने तिबेटियन भारताच्या धर्मशाळा येथे येथे आले. लडाख, दार्जिलिंग, धरमशाला, सिक्कीम आणि दिल्लीसह देशाच्या विविध भागांमध्ये स्थायिक झाले. मोमोज हि एक तिबेटिन पाककृती पदार्थ आहे जी मैद्यापासून बनवला जाते. मोमोज ची लोकप्रियता नंतर देशाच्या इतर भागांमध्ये झाली. पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि आसाम या सर्व प्रदेशांमध्ये विविध प्रकार बनवण्यास सुरुवात झाली आता ते सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या स्थानिक खाद्यपदार्थांमध्ये समाविष्ट झालेले आहे.

Momos Meaning in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा