मी पाहिलेली जत्रा निबंध मराठी । Mi Pahileli Jatra in Marathi

मी पाहिलेली जत्रा निबंध मराठी Mi Pahileli Jatra in Marathi: मी पाहिलेली जत्रा या निबंधामध्ये आपण जत्रे विषयी माहिती जाणून घेणार आहोत. जत्रेमध्ये काय काय धम्माल येते. जत्रेमध्ये जत्रेचे स्वरूप कसे असते या सर्वांबद्दल आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत जत्रा ही दरवर्षी एकदा येणारी गावाचा उत्सव आहे.

मी पाहिलेली जत्रा निबंध मराठी । Mi Pahileli Jatra in Marathi

मी पाहिलेली जत्रा
माझा गावात भैरवी या ग्रामदेवतेची एक देऊळ आहे आमच्या ग्रामदेवतेची जत्रा दरवर्षी चैत्री पौर्णिमेला भरते भैरवी देवीचा उत्सव म्हणजे संपूर्ण गावाचा सामुदायिक सोहळा असतो.

चैत्रातील पुनवेच्या मागेपुढे पाच-दहा दिवस देवळाचा परिसर नसतो फुलून गेलेला असतो. यंदाच्या चैत्र पुनवेला गावाच्या जत्रेला जायची संधी मला मिळाली. मी खुश झालो चैत्रीपूर्वी चार दिवस आधीच मी गावात जाऊन थडकलो. गावाच्या सगळीकडेच सगळीकडेच आधीपासून उत्सवाचे वातावरण होते. नोकरीधंद्याच्या निमित्ताने गावभाग गेलेली माणसे जत्रेसाठी आवर्जून आली होती त्यामुळे घरोघरी माणसांची वर्दळ होती.

अखेर चित्र पुनवेचा दिवस उजाडला पहाटे दूरवरून सनईचे मंगळ सूर कानी येत होते त्यात नगार्यांच्या मंद ठेका घुमत होता मंजूळ घंटानाद वातावरणामध्ये गुंजत होता वाऱ्यालाही दरवळ सुटलेला होता सारे वातावरण मंगलमय झाले होते अशा पवित्र वातावरणात मी व माझा आतेभाऊ जत्रेमध्ये फेरफटका मारायला निघालो.

रंगरंगोटी करून सजवलेले देवालय आपल्या भक्तजनांच्या स्वागतासाठी तयार होते. दिपमाळेतील झगमगत्या दिव्यांचा प्रकाश प्रभातीच्या धूसर वातावरणात दूरवर पसरला होता. गावातील युवकांनी देवालये आणि त्याचा परिसर रंगीबिरंगी फुग्यांनी व पताक्यांनी आणि फुलांच्या माळांनी सुशोभित केला होता. दिवस जसजसा पुढे सरकू लागला तसतशी जत्रा चहुअंगांनी उत्साहाने फुलत होती.

देवळाच्या परिसरात विविध दुकानांचा राहुट्या पडल्या होत्या. देवीच्या ओटीसाठी खण, नारळ, फुले, हळदी-कुंकू विकणारी दुकाने व प्रसादाचे विविध पदार्थ असणारी मिठाईची दुकाने देवालयाच्या परिसरात उभी केली होती. स्वयंपाक घरात लागणाऱ्या वस्तू, बांगड्या, शोभेच्या वस्तू, तयार कपडे इत्यादी अनेक दुकाने रांगेत मांडली होती काही दुकानातून विविध प्रकारची खेळणी आकर्षक पणे मांडून ठेवली होती. कुटुंबकल्याण, हिवतापनिर्मूलन यांची माहिती देणारी सरकारी दालनेही जत्रेत दिसत होती.

देवालयाच्या डाव्या बाजूला गुरांचा बाजार भरला होता त्याला लागूनच शेतीची अवजारे, कांबळी, खते, कोंबड्या व त्यांच्या आहार याची काही दुकाने मांडली होती. देवीचे दर्शन घेऊन येणारे गावकरी या साऱ्या दुकानात डोकावत होते. आवश्यक वस्तू खरेदी करत होते. काही कुडमुडे ज्योतिषी सही आपले भविष्य आजमावत बसले होते.

बालकांच्या आनंदात भर घालणारे फिरते पाळणे, गोल फिरणारी चक्रे व हॉटेलही जत्रेत होती. एका बाजूला लाल मातीच्या कुस्त्यांचे फड रंगले होते. देवीच्या साक्षीने गावकरी हा सारा आनंद मनमुरादपणे लुटत होते. साऱ्या जत्रेतून संध्याकाळ होईपर्यंत आम्ही मनमुराद भटकलो. भूक-तहान साफ विसरून गेलो होतो पुढच्या वर्षी जत्रेला यायचं संकल्पकरून मी घराकडे परतू लागलो.

तर अशी होती आमच्या गावाची जत्रा! तुम्हाला या जत्रा विषयी काय वाटते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरु नका आणि तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

मी पाहिलेली जत्रा निबंध मराठी । Mi Pahileli Jatra in Marathi

1 thought on “मी पाहिलेली जत्रा निबंध मराठी । Mi Pahileli Jatra in Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon