जर मी फुलपाखरू झालो तर! Butterfly Essay Marathi

जर मी फुलपाखरू झालो तर! फुलपाखरू निबंध मराठी (Jar Mi Phulpakharu Zalo Tar, Butterfly Essay Marathi) #मराठीनिबंध

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

जर मी फुलपाखरू झालो तर! Butterfly Essay Marathi

Butterfly Essay Marathi: आपण नेहमी फुलपाखराला फुलांच्या भवती उडताना पाहतो. फुलपाखराला पाहून नेहमीच आपले मन प्रसन्न होत असते कारण की फुलपाखराचा रंग हा मनाला मोहित करणारा असतो. फुलपाखरू हा एक कीटक आहे जो फुलातील रस पिऊन आपले जीवन जगत असतो. मनाला आनंद देणाऱ्या या छोट्या कीटकांचे आयुष्य खूप लहान असते.

आपल्या संपूर्ण विश्वामध्ये असे खूपच सुंदर जीव-जंतू आहे त्यामध्ये फुलपाखराचा देखील समावेश होतो. फुलपाखरू हे मनाला प्रसन्न करणारे कीटक आहे त्याचा रंग हा मानवी मनाला आकर्षित करून घेतो. फुलपाखराला इंग्लिशमध्ये Butterfly असे म्हणतात. फुलपाखरू हे फुलातील रस पिऊन आपले जीवन जगतो. फुलपाखरू हे नेहमी फुलांच्या भोवती आढळतो म्हणून त्याला फुलपाखरू असे म्हटले जाते. फुलपाखरू हे वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळले जातात फुलपाखरावर आत्तापर्यंत कविता, काव्य आणि भरपूर लेखन केले गेले आहे. शाळेतील लहान मुले तर फुलपाखराच्या मागे धावताना आपल्याला नेहमी दिसतात.

फुलपाखराचा जीवन काळ

  • फुलपाखराचा जीवनक्रम मध्ये अंडी सर्वात प्रथम येतात. मादी फुलपाखरू पानांच्या खालच्या बाजूला अंडी घालते.
  • अंड्यातून अळी बाहेर येते.
  • काही दिवसांनी अंड्यातून सुरवंटा सारखी अळी बाहेर पडतात आणि झाडाची पाने खाऊन जीवन जगतात.
  • काही काळानंतर सुरवंटाचे आळी भोवती एक कठीण कवच तयार होते ज्याला प्यूपा असे म्हटले जाते.
  • फुलपाखरे ताशी १२ मैल ते २४ मैल वेगाने उडू शकतात.
  • फुलपाखरांना त्यांच्या पायाने अन्न चाखता येते.
  • फुलपाखरांना बहुतेक उबदार भागात राहायला आवडते, म्हणून ते अंटार्क्टिका वगळता सर्व खंडांवर आढळतात.
  • फुलपाखरांची अंडीतुन बाहेर येण्याची वेळ क्षेत्राच्या तापमानावर अवलंबून असते. कधी कधी ही अंडी काही आठवडे लागतात तर कधी काही वर्षे.

फुलपाखरू एक लहान आणि सुंदर प्राणी आहे. फुलपाखरे शाकाहारी असतात. फुलाचा रस पिऊन फुलपाखरे आपले आयुष्य जगतात. फुलपाखराला इंग्लिश मध्ये बटरफ्लाय असे म्हणतात. फुलपाखरू इकडे तिकडे उडत राहतात. फुलपाखराची पिसे अतिशय मऊ आणि रंगीबिरंगी असतात. फुलपाखराला सहा पाय असतात.

फुलपाखरे अनेकदा बागेमध्ये उडताना दिसतात. जेव्हा फुलपाखरे आपली अंडी घालतात तेव्हा त्यांच्या अंड्याला एक चिकट पदार्थ चिकटलेला असतो ज्यामुळे अंडी झाडाच्या पानांना चिटकतात. फुलपाखरे बहुतेकदा उबदार भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अटलांटिक वगळता फुलपाखरे इतरत्र सर्वत्र बेटांवर आढळतात.

फुलपाखरं मध्ये लाल, पिवळा, निळा, हिरवा, पांढरा असे अनेक रंग असतात फुलपाखराच्या शरीराचे तीन भाग असतात डोके, छाती आणि उदर ते सर्व रंगीबिरंगी आणि सुंदर रंगाने रंगलेले असतात.

फुलपाखरांच्या सर्वात विशिष्ट वैशिष्ट्य पैकी एक म्हणजे त्यांचे चमकदार आणि रंगीबिरंगी पंख फुलपाखरे हे थंड रक्ताचे प्राणी आहेत फुलपाखरे आपल्या पाण्याच्या साह्याने चव घेतात.

जर मी फुलपाखरू झालो तर! Jar Mi Phulpakharu Zalo Tar

मित्रांनो, हा लेख एक काल्पनिक लेख आहे ज्यामध्ये फुलपाखराचे जीवन कसे आहे याबद्दल माहिती दिलेली आहे जर आपण फुलपाखरू झालो तर आपले आयुष्य कसे असेल या बद्दल एक वैचारिक निबंध आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत.

मी जर फुलपाखरू झालो तर किती बरे होईल! मी आकाशात खूप उंच उंच उडेल माझे रंगीबिरंगी पंखांनी मी सर्वांनाच आकर्षित करेल. माणसे माझ्याकडे बघतच राहतील कारण की मला आता नवीन कपडे घालण्याची गरज नाही कारण की निसर्गाने आधीच मला सौंदर्य दिले आहे. मी फुलपाखरू झालो तर एका झाडावरून दुसऱ्या झाडावर फिरलो असतो. लातील रस पिलो असतो आणि इतरांना आनंद वाटत जीवन जगलो असतो.

मी फुलपाखरू झालो असतो तर मला फुलांवर बसायला आवडलं असतं. माणसं भोवती फिरायला आवडलं असतं. मी फुलपाखरू झालो असतो तर मी मोठ्या शहरात फिरून नेहमी आनंदी आणि इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला असता. मी फुलपाखरू झालो असतो तर मला पाहून मुलांना खूपच आनंद झाला असता कधीकधी ते माझ्याशी खेळताना आम्हाला पकडण्याचा प्रयत्न करतात त्यांना घाबरून त्यांच्यापासून लांब गेलो असतो.

जर मी फुलपाखरू झालो तर! Butterfly Essay Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group