India vs Japan: GDP Fight भारत चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून मागे जाण्याच्या तयारीत असल्याने जपानी नाराज.
सध्या जपान भारतावर नाराज असल्याचे दिसत आहे?
भारताची सर्वात मोठी आणि चौथी अर्थव्यवस्था म्हणून भारत या देशाचे नाव उज्वल होत आहे त्यामुळे बऱ्याच देशांना याचे वाईट वाटत आहे त्यामध्ये जपान या देशाला आणखी वाईट वाटत आहे कारण की जगातील सर्वात मोठी आणि चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ही जपानची होती त्यामुळे जपान आता भारतावर काहीसा नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे.
2025 मध्ये भारत डॉलरच्या बाबतीत सकल देशांतर्गत उत्पादनात जपानला मागे टाकेल या घोषणेने टोकियोला धक्का बसलेला आहे 2010 पर्यंत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती आता ती पाचवा क्रमांक वर येणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये जारी केलेल्या अंदाजामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने सुचित केले आहे की भारताच्या जीडीपी 2025 मध्ये $4.34 ट्रिलियन पर्यंत पोहोचेल जपानचा दर हा भारताला मागे टाकू शकत नाही. जपानचा येन करन्सी भारतासमोर थोडीशी कुमकुवत होत आहे त्यामुळे जपान सरकारला याचा चांगला धक्का बसलेला आहे.
सध्या पाचव्या क्रमांकावर येणे जपानला चिंतेची बाब दर्शवत आहे. कारण की सातत्याने आपला क्रमांक जपान देशाने नेहमी कायम राखला होता पण आता भारत हा जपानला आर्थिक व्यवस्थेमध्ये मागे टाकणार आहे.
सध्या जपान सरकार याविषयी काय भूमिका घेणार याविषयी सर्व देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे तसेच भारताचा देखील आर्थिक विकास कसा वाढेल याच्यावर देखील लक्ष केंद्रित आहे.
2025 हे येणाऱ्या प्रत्येक देशासाठी एक महत्त्वाचा आर्थिक सक्षमता साठी महत्त्वाचा असणार आहे.
सध्या भारत हा देश जपान कडून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तूचा उपभोक्ता आहे तसेच जपानने देखील भारताच्या काही राज्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. (जसे की महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्प देखील जपानच्या आर्थिक सहाय्यतेने निर्माण झालेले आहे)
प्रत्येक देशाचा आर्थिक विकास हा त्याच्या तरुण लोकसंख्येच्या आधारावर ठरत असतो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जपान हा आता म्हाताऱ्या लोकांचा देश बनत चाललेला आहे येथील तरुण एकटे पडत चाललेले आहेत आणि त्यांची मानसिक दृष्टीही देखील बदलत चाललेली आहे कुटुंब पद्धत इथल्या लोकांना आता मान्य नाही त्यामुळे ते लग्न करणे आणि संसार करणे यासारख्या गोष्टींवर लक्ष देत नाही त्यामुळे जपानमध्ये आता वयस्कर लोकांचे प्रमाण वाढत आहे आणि तरुण लोकांची संख्या कमी होत चाललेली आहे हे देखील एक कारण असू शकते जपान पाचव्या नंबर वर जाण्याचे.
आय होप याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर निगेटिव्ह होणार नाही तसेच भारत 2025 मध्ये आपले आर्थिक लक्ष पूर्ण करेल याची मला खात्री वाटते मित्रांनो तुम्हाला जपान या देशाबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.