International Red Panda Day Marathi Bhashan (आंतरराष्ट्रीय लाल पांडा दिवस मराठी भाषण) #marathibhashan
आंतरराष्ट्रीय लाल पांडा दिवस मराठी भाषण: International Red Panda Day Marathi Bhashan
आदरणीय प्राध्यापक गुरुजन आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो…
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आज आपण येथे आंतरराष्ट्रीय लाल पांडा दिवस साजरा करण्यासाठी जमलो आहोत. दरवर्षी 18, सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय लाल पांडा दिवस म्हणून साजरा केला जातो.
लाल पांडा ही प्रजाती सध्या देशातून लुप्तप्राय होण्याच्या मार्गावर आहे. या प्राण्याची होत असलेली शिकार जंगलतोड आणि हवामान बदलामुळे या प्राण्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.
त्यामुळे रेड पांडा नेटवर्कने वर्ष 2010 यावर्षी पहिला आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिवस साजरा केला. हा दिवस आपल्याला रेड पांडा या प्राण्याबद्दल जनजागृती करण्यास मदत करतो.
रेड पांडा हा भारताच्या हिमालय पर्वताच्या प्रदेशांमध्ये आढळणारा प्राणी आहे. भारतासोबतच हा प्राणी चीन, नेपाळ आणि भूतान यासारख्या देशांमध्ये आढळतो.
सध्या भारतामध्ये या प्राण्यांची संख्या वीस हजार इतकी आहे. लाल पांडा ही प्रजाती लुप्तप्राय होत चाललेली आहे, त्यामुळे लाल पांडा या प्राण्याच्या संवर्धनाविषयी माणसांमध्ये जनजागृती घडवण्यासाठी दरवर्षी 18, सप्टेंबर हा दिवस जागतिक लाल पांडा दिन म्हणून साजरा केला जातो.