आंतरराष्ट्रीय शांतता दिवस मराठी भाषण: International Peace Day Speech in Marathi

International Peace Day Speech in Marathi

आंतरराष्ट्रीय शांतता दिवस मराठी भाषण: International Peace Day Speech in Marathi (Antarrashtriy Shantata Diwas Marathi Bhashan) #marathibhashan

Telegram Group Join Now

International Peace Day Speech in Marathi

आदरणीय प्राचार्य, शिक्षक आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो

आज आपण 21 सप्टेंबर 2022 रोजी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस साजरा करण्यासाठी जमलो आहोत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 21 सप्टेंबर रोजी आपण शांतता दिवस साजरा करतो. शांतता दिवस का साजरा केला जातो याविषयी आज मी तुम्हाला छोटीशी माहिती देणार आहोत ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावी.

आपले जग शांततामय व्हावे यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली. आंतरराष्ट्रीय शांतता दिवस दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय शांतता दिवस अधिकृतपणे जागतिक शांतता दिवस म्हणून ओळखला जातो. जगण्यासाठी आणि आनंदासाठी शांतता आवश्यक आहे.

हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश लोकांमध्ये शांतते बद्दल जागृती निर्माण करणे हा आहे. शांतता ही लोकांची सामान्य इच्छा आहे. शांतता म्हणजे स्वातंत्र्य आराम आणि आनंद!

संयुक्त राष्ट्रांनी संपूर्ण जगाला एकमेकांचा आदर करण्याचा संदेश दिला आहे. जेव्हा लोक एकमेकांचा आदर करतात तेव्हा शांतता विकसित होते. राष्ट्राच्या वाढीसाठी आणि विकासासाठी ते खूपच आवश्यक आहे.

सर्व देशातील लोकांना शांततेची गरज आणि महत्त्व याविषयी माहिती देण्यासाठी अनेक कार्यक्रम, बैठका आणि परिषद आयोजित केल्या जातात.

जगाच्या शांततेसाठी आपण सर्व तरी प्रयत्न केले पाहिजे. शांततेची सुरुवात आनंदाने होते.

“शांतता ही चांगल्या जगाची गुरुकिल्ली आहे.”

एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.

तुम्हाला जागतिक शांतता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जागतिक शांतता दिवस कधी साजरा केला जातो?

जागतिक शांतता दिवस दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.

जागतिक शांतता दिन भाषणाची सुरुवात कशी करावी?

जागतिक शांतता दिन भाषणाची सुरुवात ‘आदरणीय प्राचार्य, गुरुजन आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो’ या वाक्याने करावी.

International Peace Day Speech in Marathi

Leave a Comment