Gudi Padwa Speech in Marathi

Gudi Padwa Speech in Marathi: गुढीपाडवा मराठी भाषण (Gudi Padwa Marathi Bhashan)

आजच्या आर्टिकल मध्ये आपण गुढीपाडवा 2023 मराठी भाषण कसे करावे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

नमस्कार मित्रांनो!
गुढीपाडवा हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात सुंदर उत्सवांपैकी एक आहे. आज आम्ही गुढीपाडवा का साजरा केला जातो आणि त्यामागील कारणे काय आहेत याबद्दल माहिती देणार आहोत. तसेच शाळा-कॉलेजमध्ये गुढीपाडव्याला तुम्ही कसे भाषण करू शकता, याबद्दलही माहिती जाणून घेणार आहोत.

मराठी महिन्यातील चैत्र महिन्यापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. जसे इंग्रजी कॅलेंडरनुसार जानेवारी हा वर्षाचा पहिला महिना असतो तसेच मराठीमध्ये चैत्र महिना हा मराठी वर्षाचा पहिला महिना असतो.

Gudi Padwa Speech in Marathi

आज आपण गुढीपाडवा निमित्त शाळा कॉलेजमध्ये भाषण कसे करावे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

गुढीपाडवा मराठी भाषणाची सुरुवात कशी करावी?
.
आदरणीय
महोदय, प्राध्यापक आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो…

गुढीपाडवा हा संपूर्ण भारतभर साजरा केला जाणारा प्रमुख सण आहे. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. मराठी नववर्षाची सुरुवातही याच दिवशी होते. कारण गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. चैत्र महिना हा मराठी महिन्याचा पहिला महिना आहे, या दिवशी नवीन मराठी वर्ष सुरू होते.

ज्याप्रमाणे हा उत्सव महाराष्ट्रामध्ये प्रमुख उत्सव आहे त्याचप्रमाणे भारतातील अनेक राज्यांमध्ये हे पर्व वेगवेगळ्या प्रकारे साजरे केले जाते. हा उत्सव “चैत्रशुद्ध प्रतिपदा” नावाने देखील साजरा केला जातो.

या दिवशी वसंत ऋतूचे आगमन होते. झाडावर नवीन फुले सुंदर फुल उमलतात. निसर्गही चित्तथरारक दिसतो. संपूर्ण पृथ्वी हिरवीगार दिसते, परिसर अतिशय आल्हाददायक असतो, गुढीपाडव्याच्या अशा प्रत्येक वातावरणात माणसांना जीवनात आनंद आणि समाधान मिळते.

गुढीपाडवा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय शुभ मानला जातो. हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे. या सणाशी प्रत्येकाची श्रद्धा जोडलेली आहे. लोकांचा असा विश्वास आहे की या दिवशी केलेले कार्य नेहमीच यशस्वी होते. म्हणूनच या दिवशी लोक नवीन कामाला सुरुवात करतात. स्वतःचा नवीन व्यापार सुरू करतात.

यासोबतच गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. अनेक जण या दिवशी नवीन वाहने, वस्तू, सोने चांदी खरेदी करतात. या सणाची लोकांची श्रद्धा जोडलेली आहे.

गुढीपाडव्या साजरा करण्यामागे अनेक कथा आहेत. गुढीपाडव्याच्या वेगवेगळ्या कथा वेगवेगळ्या भागात सांगितल्या जातात. या दिवशी देवाने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते.

हा दिवस तो दिवस आहे जेव्हा देवाने विश्वाची निर्मिती केली त्यामुळे या सणाला खूप महत्त्व आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी घर अंगण स्वच्छ केले जाते. घरातील महिला घर अंगण स्वच्छ करतात. या दिवशी घरातील सर्व सदस्य लवकर उठतात आंघोळ करतात आणि नवीन कपडे परिधान करतात. काही राज्यांमध्ये पारंपारिक पोषक घालण्याची परंपरा आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्यासाठी बांबूची लांब काठी वापरली जाते. आंब्याच्या पानांचे तोरण घराच्या सर्व दारे खिडक्यांना लावली जातात. गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्ये पुरणपोळी बनवली जाते.

या दिवशी प्रसाद म्हणून कडुलिंबाची पाने आणि गूळ घेण्याची पद्धत आहे. तसेच काही प्रदेशात कडूलिंबाची पाने, ओवा, हिंग, गुळाचे मिश्रण खाल्ले जाते.

कडूलिंबाची पाने आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. कडुलिंबाची पाने खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि ताप, उलट्या, पोटाचे आजार आणि त्वचारोग ही बरे होतात. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने गुळासोबत खाल्ली जातात. आंघोळ करतानाही कडुनिंबाची पाने पाण्यात टाकली जातात.

गुढीपाडवा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. हा सण महाराष्ट्रातील मुख्य सणापैकी एक आहे. या सणाला नैसर्गिक, धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. या सणाला दान देण्याची प्रथा आहे. तसेच सर्व लोक एकत्र येऊन एकमेकांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देऊन हा सण साजरा करतात त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपण्यास मदत होते.

गुढीपाडव्याच्या दिनानिमित्त भाषण करण्याची संधी दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.

जय हिंद जय महाराष्ट्र

निष्कर्ष:
आशा आहे मित्रांनो तुम्हाला “Gudi Padwa Speech in Marathi” विषयी माहिती मिळाली असेल जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा