सीए म्हणजे काय? – CA Full Form in Marathi

CA full form in Marathi: आजच्या आर्टिकलमध्ये आपण CA म्हणजे काय? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. CA हा शब्द तुम्ही कधी ना कधी तरी ऐकला असेल पण कधी तुम्ही विचार केला आहे का CA  म्हणजे नक्की काय याचा अर्थ काय होतो? CA बनण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते चला तर जाणून घेऊया सीए फुलफॉर्म मराठी विषयी थोडीशी रंजक माहिती. 

दर वर्षी भारतामध्ये हजारो किंवा लाखोच्या संख्येने मध्ये विद्यार्थी CA या परीक्षेची तयारी करताना आपल्याला दिसतात. चला तर जाणून घेऊया CA हि परीक्षा नक्की आहे तरी काय? CA बनल्यानंतर कोणत्या जबाबदाऱ्या व्यक्तीच्या अंगावर पडतात आणि गोवरमेंट मध्ये CA  ची काय भूमिका असते या विषयी थोडीशी माहिती. 

CA full form in Marathi

या आर्टिकल मध्ये आपण CA full form in Marath विषयी माहिती जाणून घेणार आहोत. तसेच सीए चे कार्य काय असते त्यांचा पगार काय असतो आणि  तसेच सीए हा कोर्स पण कोणत्या कॉलेजमधून किंवा क्लासेसमधून पूर्ण करू शकतो. 

सीए चा फुल फॉर्म मराठी मध्ये CA full form in Marath चार्टर अकाउंटंट (Chartered Accountant) असा होतो मराठीमध्ये यांना सनदी लेखाकार असे सुद्धा म्हटले जाते.  इंग्लिशमध्ये यांना चार्टर्ड अकाउंटंट असे म्हटले जाते चार्टर अकाउंटंट सरकारी वित्तीय विभागाचे मूल्यमापन करणारा अधिकारी असतो. 

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जुन्याकाळी दुकानांमध्ये किंवा व्यापार करणाऱ्या छोट्या उद्योग संस्थांमध्ये मुनीम किंवा लेखापाल असे जे या कंपन्यांचे हिशोब पत्र तपासत असे किंवा त्याचे व्यवस्थापन करत असे तसेच आजच्या वर्तमानकाळामध्ये मोठमोठ्या कंपन्यांचे सरकारी तिजोरीचे मूल्यमापन करणारे जे व्यक्ती असतात त्यांना चार्टर अकाउंटंट असे म्हटले जाते. 

सीएचे कार्य

कंपनी किंवा व्यापारी यांच्या आर्थिक व्यवहारांचा मुगाव ठेवणे, आर्थिक कायद्यानुसार सल्ला देणे, करांचे मूल्यमापन करणे आणि भरणे, आर्थिक नोंदी, ऑडिट करणे, कर आकारणी, आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थापनासह वित्तीय संबंधित सर्व कामे करणे हे चार्टर्ड अकाउंटंटची जबाबदारी असते. 

या कारणास्तव सनदी लेखापाल यांना मोठ्या कंपन्या व्यावसायिक किंवा उद्योगपतीकडून आर्थिक व्यवस्थापनाचा कर प्रक्रिया चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आर्थिक संधी जाणून घेण्यासाठी नियुक्त केले जातात. 

CA साठी आर्थिक व्यवस्थापन करणे अवघड नाही. त्याला सर्व प्रकारचे आर्थिक कायदे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष करण्याचे ज्ञान या कारणास्तव कोणतेही आर्थिक व्यवस्थापनाची जबाबदारी चार्टर्ड अकाउंटवर सोपवली जाते. 

ICAI म्हणजे काय?

The Institute of Chartered Accountants of India, ज्याला  मराठी मध्ये ICAI  म्हणून ओळखले जाते. हि एक संसदेच्या कायद्यानुसार स्थापित केलेली वैधानिक संस्था आहे. या संस्थेची स्थापना चार्टर्ड अकाउंटंट 1949 कायद्याअंतर्गत करण्यात आलेली आहे. ICAI ची स्थापना 1 जुलै 1949 रोजी संसदेत पारित झालेल्या कायद्यानुसार करण्यात आली असल्याने दरवर्षी एक जुलै रोजी राष्ट्रीय चार्टर्ड अकाउंटंट डे साजरा केला जातो. 

ही संस्था भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यकर्ते भारतातील सर्व चार्टर्ड अकाउंटंट या ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया’ अंतर्गत नोंदणीकृत आहेत आणि ते या संस्थेचे संस्थेचे सदस्य आहेत. ICAI  ही चार्टर्ड अकाउंटंट ची जगातील दुसरी सर्वात मोठी व्यवसायिक संस्था आहे. ICAI  वारे चार्टर्ड अकाउंटंट कोर्स देखील चालवला जातो भारतात सीए होण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट कोर्समध्ये प्रवेश निश्‍चित करणे आवश्‍यक आहे.

सीए (चार्टर अकाउंटंट) कसे व्हावे

सीए चा फुल फॉर्म जाणून घेतल्यानंतर आता जाणून घेऊया सीए कशा प्रकारे बनले जाते? सीए होण्यासाठी काय काय गोष्टींची आवश्यकता असते सीए होण्यासाठी कोणत्या गोष्टींची पात्रता हवी असते या विषयी थोडीशी माहिती. 

  1. फाउंडेशन कोर्स
  2. इंटरमिजिएट कोर्स
  3. अंतिम अभ्यास प्रक्रिया

कोणताही विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर फाउंडेशन कोर्स साठी नोंदणी करू शकतो. नोंदणी केल्यानंतर चार महिन्यांच्या आत फाउंडेशन परीक्षा घेतली जाते. या परीक्षा वर्षातून दोनदा अनुक्रमे नोव्हेंबर आणि मे महिन्यात घेतल्या जातात या परीक्षेत यश मिळाल्यानंतर इंटरमिजिएट परीक्षेत प्रवेश मिळतो. 

वाणिज्य विषयात 55 टक्के गुणांसह पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी थेट फाउंडेशन कोर्स करण्याऐवजी इंटरमिजिएट कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. इंटरमिजिएट कोर्सला प्रवेश घेण्यासाठी नोंदणी करावी लागते यानंतर इंटरमिजिएट परीक्षा आहेत ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अंतिम अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. अंतिम अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाल्यानंतर त्यांची परीक्षा घेतली जाते. अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट होऊ शकतो. 

चार्टर अकाउंटंट सी कोर्स मध्ये प्रत्येक स्थराचा अभ्यासक्रम वेगळा असतो. अभ्यासक्रमातील बहुतांश या विषय वाणिज्य विषयाशी संबंधित आहे. या कारणास्तव ज्या विद्यार्थ्यांनी बारावी आणि कॉमर्समध्ये पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्यांना हा अभ्यासक्रम अधिक चांगल्या प्रकारे समजणे सोपे आहे. 

अकाउंटन्सी कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कॉलेज वगैरे मध्ये प्रवेश घेण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त आयसीएआय वेबसाईटला भेट देऊन नोंदणी करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला अनुक्रमे फाउंडेशन कोर्स इंटरमीडिएट कोर्स फायनल परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. हो तुम्ही तयारीसाठी खाजगी कोचिंग सेंटर मध्ये जाऊन सामील होऊ शकता. अंतिम अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर अव्वल गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची श्रेणी निश्चित केली जाते.

सीए फायनल पोस्टच्या परीक्षेत जे विद्यार्थी चांगले गुण मिळवतात त्यांना खाजगी कंपनीकडून प्लेसमेंटच्या स्वरुपात नोकऱ्या मिळतात. नोकरी मिळाल्यानंतर पगाराच्या स्वरूपात सुरुवातीला किमान 40 ते 80 हजार रुपये महिन्याला मिळतात. 

सीए फुल फॉर्म म्हणजे काय?

आम्हाला आशा आहे की CA Full Form in Marathi  सीए फुल फॉर्म इन मराठी ही पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडले असेल जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

सीए म्हणजे काय? – CA Full Form in Marathi

2 thoughts on “सीए म्हणजे काय? – CA Full Form in Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा