ब्लॅक फ्रायडे का साजरा केला जातो या मागची एक कथा | Black Friday Information In Marathi

Black Friday Information In Marathi: आजच्या आर्टिकलमध्ये आपण “ब्लॅक फ्रायडे” याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या दिवसाची सुरुवात कधी झाली?, या दिवसाचा इतिहास काय आहे? आणि हा दिवस सर्व प्रथम कोठे साजरा केला गेला होता? याबद्दल आपण डिटेल्समध्ये माहिती जाणून घेणार आहोत.

Black Friday Information In Marathi

दरवर्षी जगामध्ये ब्लॅक फ्रायडे ची वाट संपूर्ण लोक पाहत असतात कारण की या दिवशी सर्व वस्तू खूपच कमी किमतीमध्ये मिळविल्या जातात. तर हा दिवस एवढा का महत्वाचा आहे? चला तर जाणून घेऊया ब्लॅक फ्रायडे या दिवसाची सुरुवात कशी झाली.

दरवर्षी नोव्हेंबरच्या चौथ्या आठवड्याच्या फ्रायडे ला ब्लॅक फ्रायडे असे म्हटले जाते. दरवर्षी लाखो लोक या दिवसाची वाट पाहताना आपल्याला दिसतात.

ब्लॅक फ्रायडे ची सुरुवात 1869 मध्ये अमेरिकेमध्ये झाली असे मानले जाते. अमेरिकेच्या सोन्याचा बाजारांमध्ये फेरफार करण्याच्या योजनेचे परिणाम संपूर्ण अमेरिका दिवाळखोर झाली होती.

थँक्सगिविंग नंतर हा शुक्रवार म्हणजेच ब्लॅक फ्रायडे सर्वात मोठा फ्रायडे म्हणून ओळखला जातो. या दिवशी सर्वच बाजारपेठेमध्ये वस्तू खूपच कमी किमतीमध्ये मिळतात, त्यामुळे या दिवशी ग्राहक भरभरून खरेदी करताना आपल्याला दिसतात.

हा दिवस ख्रिसमसच्या खरेदीसाठी म्हणून चिन्हांकित केला जातो.

ब्लॅक फ्रायडे म्हणजे काय?

आपल्या भारतीयांना भारतातील सण बद्दल माहिती आहे, पण बाहेरचे सण आता आपल्या भारतीय संस्कृती मध्ये हस्तक्षेप करायला लागले आहेत. त्यामधला एक आहे ब्लॅक फ्रायडे भारतीयांना गुड फ्रायडे बद्दल माहिती आहे परंतु ब्लॅक फ्रायडे हा दिवस का साजरा केला जातो हे क्वचित जणांना माहिती आहे.

नोव्हेंबरच्या चौथ्या आठवड्यातील शुक्रवारी ब्लॅक फ्रायडे हा दिवस साजरा केला जातो हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये ब्लॅक फ्रायडे 26 नोव्हेंबर 2021 रोजी येत आहे.

हा दिवस संपूर्ण जगामध्ये आनंददायक दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी खूपच कमी किमतीमध्ये वस्तू बाजारामध्ये उपलब्ध होतात. आजच्या काळात ऑनलाईन आणि डिजिटल युगामध्ये ऑनलाइन वस्तूंवर खूपच कमी किमती लावल्या जातात. ब्लॅक फ्रायडे यासारख्या दिवसांमध्ये त्या वस्तू अधिकच स्वस्त होतात त्यामुळे भारतामध्ये सुद्धा या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते.

Black Friday History in Marathi

ब्लॅक फ्रायडे या गोष्टीची सुरुवात होते अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे.

पूर्वी हा सण फक्त अमेरिका आणि कॅनडा या सारख्या देशात साजरा केला जात होता. परंतु तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रवाहामुळे आता जगातील इतर देशातही तो साजरा केला जातो. या दिवशी जगातील मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या ख्रिसमसच्या खरेदी वस्तूवर मोठ्या प्रमाणात सूट देतात.

ब्लॅक फ्रायडे का साजरा केला जातो या मागची एक कथा – Black Friday Story in Marathi

ही गोष्ट सुमारे अकरा वर्षे जुनी आहे 2008 मध्ये न्यूयॉर्कमधील सिटी मॉल मध्ये मोठ्या सवलतीत वस्तू मिळत होत्या, त्यासाठी दोन हजारहून अधिक लोकांची गर्दी जमली होती. लोकांनी बराच वेळ आत जाण्याची वाट पाहिली आणि गेट उघडल्यावर गर्दी बेकाबू झाली. दरम्यान जमावाने एका 34 वर्षीय महिलेला चिरडून टाकले. पुढे सुरक्षारक्षकांनी महिला गर्दीतून बाहेर काढले तोपर्यंत त्या महिलेचा मृत्यू झाला होता.

एका मॉल मध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा झाला होता

मीडिया रिपोर्टनुसार, खरेदीच्या दिवशी घडलेली ही एकमेव दुःखद घटना नाही. 2006 मध्ये बेस्ट बायसाठी खरेदी करत असताना दोन लोकांमध्ये हाणामारी झाली ही घटना तेथील व्हिडिओ कॅमेरा रेकॉर्ड झाली आणि बराच वेळ हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यादिवशी कॅलिफोर्नियातील एका मॉलमध्ये भेटवस्तू साठी प्रमाणपत्राचे वाटप सुरू असताना त्यावर जमाव भडकला आणि नऊ जण जखमी झाले. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला.

ब्लॅक फ्रायडे या शब्दाचा अर्थ काय होतो? – Black Friday Meaning in Marathi

सुरुवातीला ब्राईट फ्रायडे हा शब्द आर्थिक संकटासाठी वापरला जात होता त्याची विक्री किंवा खरेदीशी काहीही संबंध नव्हता. ती कथा अशी आहे की वॉल स्ट्रीटचे दोन सर्वात मोठे फायनान्सर होते.

“जिम फिक्स आणि जे गोल्ड” या दोघांनी मिळून मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी केले त्यांना अशी अपेक्षा होती की येणार या वर्षामध्ये सोन्याच्या किमती वाढतील त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळेल पण घडले उलटेच 24 सप्टेंबर 1869 रोजी शुक्रवारी सोन्याचा बाजार कोसळला फिक्स आणि जे गोल्डन दोघेही दिवाळखोर झाले.

पोलिस अधिकाऱ्यांनी हा शब्द का वापरला

ब्लॅक फ्रायडे हा शब्द पहिल्यांदा 1950 मध्ये फिलाडेल्फिया पोलिस अधिकाऱ्यांनी वापरला होता. आज थँक्सगिविंग डे नंतर खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली होती, त्यामुळे रस्त्यावर गोंधळ चालु होता. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती काही वेळा दुकाने लुटण्याचे प्रकार देखील घडले होते त्या दिवशी पोलीस अधिकारी सुट्टी घेऊन शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी या दिवसाला ब्लॅक फ्रायडे म्हणायला सुरुवात केली.

कोणत्या जाहिरातीने ब्लॅक फ्रायडे हा शब्द सर्वात जास्त लोकप्रिय झाला?

1966 मध्ये अमेरिकेतील एका मासिकात एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ज्यामध्ये ब्लॅक फ्रायडे हा शब्द वापरण्यात आला होता नंतर 80 च्या दशकात हा शब्द जगभर पसरला आणि किरकोळ विक्रेत्यांनी लगेच थँक्सगिव्हिंग नंतरच्या विक्रीत ते जोडले.

ब्लॅक फ्रायडे चित्रपट?

ब्लॅक फ्रायडे हा भारतीय चित्रपट आहे जो मुंबई बॉम्ब लास्ट वर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केलेले आहे. ज्या दिवशी हा बोमस्पोट घडला त्यादिवशी फ्रायडे होता त्यामुळे या चित्रपटाचे नाव ब्लॅक फ्रायडे असे ठेवण्यात आले.

भारतात काळा शुक्रवार?

वर्ष 1993 मध्ये मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते, त्या दिवशी शुक्रवार होता म्हणून भारतामध्ये काळा शुक्रवार म्हणून साजरा करण्यात येतो.

ब्लॅक फ्रायडे 2021?

या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये ब्लॅक फ्रायडे हा 26 तारखेला येत आहे त्यामुळे भारतामध्ये प्रचंड उत्साह या दिवसाबद्दल दिसत आहे.

Black Friday ला काळा शुक्रवार का म्हणतात?

अमेरिकेत या देशातून ब्लॅक फ्रायडे नावाची संकल्पना उदयास आली. त्यानंतर ही संकल्पना संपूर्ण देशामध्ये पसरली आहे त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या आठवड्याच्या शुक्रवार हा ब्लॅक फ्रायडे म्हणून ओळखले जाते. या दिवशी ग्राहक मनसोक्त खरेदी करताना आपल्याला दिसतात.

काळा शुक्रवार वाईट का आहे?

जगामध्ये आज पर्यंत जेवढे काही वाईट घटना घडल्या आहेत, त्या दिवशी शुक्रवार होता असे काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे शुक्रवार हा दिवस वाईट आहे आणि या वाईट शुक्रवाराला ‘ब्लॅक फ्रायडे’ म्हणून नाव देण्यात आले.

Final Word:-
Black Friday Information In Marathi
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Black Friday Information In Marathi

2 thoughts on “ब्लॅक फ्रायडे का साजरा केला जातो या मागची एक कथा | Black Friday Information In Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा