15 ऑगस्ट 2022 मराठी भाषण: 15 August Speech in Marathi

15 August Speech in Marathi 2022 for School 10 line (bhashan) #15august2022

15 August: Speech in Marathi

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण:
स्वातंत्र्य दिन कोणते भाषण द्यायचे याची तयारी करण्यासाठी लोक खुप वेळ घेतात येथे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की स्वातंत्र्यदिनी तुम्ही कोणत्या प्रकारे भाषण करू शकता तसेच आपल्या मुलांसाठी शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनी कोणते भाषण द्यावे यासाठी विषय ठरू शकतात. चला तर जाणून घेऊया ज्यावेळी 2022 रोजी स्वातंत्र्य दिनी कोणते भाषण करायला हवे या बद्दल थोडीशी माहिती.

15 August: Speech in Marathi 2022

15 August 2022: यावर्षी भारत 15 ऑगस्ट रोजी आपला 75 व स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झालेली आहे. हा राष्ट्रीय सण आपण मोठ्या उत्साहाने आणि देशभक्तीने साजरा करतो. या दिवशी आपण भारताला स्वतंत्र राष्ट्र बनवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या महान योद्धा आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. स्वातंत्र्य दिना पर्यंतच्या आठवड्यात प्रत्येक मोठ्या संस्थेचे भाषणे दिली जातात. शाळा, महाविद्यालय कार्यालय इत्यादी ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात जिथे देशभक्तीपर गीते वाजवली जातात आणि लोक भाषण देतात. अशा परिस्थितीत स्वातंत्र्य दिनी कोणते भाषण द्यायचे याची तयारी करण्यासाठी लोक बराच वेळ घेतात. चला तर जाणून घेऊ स्वातंत्र्यदिनी भाषण कसे द्यावे याविषयी माहिती.

How to start 15th August Independence Day speech in Marathi for School

15 ऑगस्ट स्वतंत्र दिनाच्या भाषणाची सुरुवात कशी करावी?

आदरणीय प्राचार्य महोदय, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो,
आज आपण आपला 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. या शुभदिनी आपण शेकडो वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झालो त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त सर्व शाळा, कार्यालय, कारखाने आणि संस्थांना सुट्टी आहे. देशाच्या प्रत्येक भागात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात असला तरी भारत सरकारचा भव्य आणि मोठा कार्यक्रम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. या दिवशी सुंदर तिरंगा मस्तक उंच करून हवेत अभिमानाने फडकताना दिसतो.

या दिवशी पंतप्रधान ऐतिहासिक लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतात. राष्ट्रध्वजाला 21 तोफांची सलामी दिली जाते. राष्ट्रगीत वाजवले जाते आणि लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून प्रंतप्रधान तिथे बसलेल्या लोकांसह संपूर्ण देशाला संबोधित करतात, त्यांच्या देशाला दिलेला संदेश प्रत्येक टीव्ही चॅनेलवर दाखवला जातो. सरकारी इमारती रात्री दिव्यांनी न्हाऊन निघतात.

दिल्लीचे संसद भवन, राष्ट्रपती भवन, इंडिया गेट्स हा संपूर्ण लुटियन झोनमध्ये दिव्यांचा नजारा पाहण्यासारखा असतो.

मित्रांनो, हा दिवस आपल्याला त्या महान स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग आणि बलिदानाची आठवण करून देतो ज्यांनी प्रचंड बलिदान देऊन भारत मातेच्या बेड्या तोडल्या. आज मी त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना नमन करतो ज्यांनी भारताला स्वतंत्र करण्याचे स्वप्न पाहिले आणि आपण स्वतंत्र भारताचा श्वास घेऊ शकणा-या साठी आपले प्राण अर्पण केले.

यानिमित्ताने ठिकाणी वाद-विवाद व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. देशाची प्रगती, स्वातंत्र्यानंतर काय हरवले, काय सापडले, देशापुढील समस्या, भविष्यातील आव्हाने यावर चर्चा केली जाते.

मित्रांनो, या दिवशी राष्ट्रउभारणी विकास आणि देशाच्या संरक्षणाची प्रतिज्ञा घेतली पाहिजेल. गांधीजींचे सत्य आणि अहिंसेचे तत्त्व आपण जीवनात अमलात आणले पाहिजेल. भारतीय संविधानात लिहिलेल्या गोष्टीचे पालन करा हीच देशाची शान आहे. स्वातंत्र्यदिनाच्या या शुभमुहूर्तावर तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा

जय हिंद, जय भारत

15 ऑगस्ट 2022 मराठी भाषण कसे करावे?

15 ऑगस्ट 2022 रोजी स्वतंत्र दिन भाषण कसे करावे या विषयी संपूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये आहे.

15 ऑगस्ट 2022 स्वतंत्र दिनी भाषणाची सुरुवात कशी करावी?

15 ऑगस्ट 2022 स्वातंत्र्यदिनी भाषणाची सुरुवात आदरणीय प्राचार्य महोदय, शिक्षक आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो या वाक्याने करावी.

15 ऑगस्ट 2022 मराठी भाषण: 15 August Speech in Marathi

1 thought on “15 ऑगस्ट 2022 मराठी भाषण: 15 August Speech in Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon