जागतिक शाकाहारी दिन मराठी भाषण | World Vegan Day Speech in Marathi

“जागतिक शाकाहारी दिन मराठी भाषण” (World Vegan Day Speech in Marathi) [jagtik shakahari din marathi bhashan]

नमस्कार मित्रांनो,

आज आपण येथे “जागतिक शाकाहारी दिन” साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. दरवर्षी एक नोव्हेंबर हा दिवस जागतिक शाकाहारी दिन (world vegan day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करणार मागचे मुख्य कारण म्हणजे प्राणिमात्रांवर दया करणे हे आहे.

संपूर्ण जगामध्ये प्राण्यांना फक्त उपभोगाचे साधन म्हणून पाहिले जाते. पण त्यांच्यामध्येही जीव आहे हे कोणालाच कळत नाही.

आपण कळत नकळत प्राण्यांपासून बनवलेल्या वस्तूंचा वापर करत असतो? तसेच प्राण्यांचा वापर मास खाण्यासाठी देखील केला जातो.

जागतिक शाकाहारी दिन साजरा करण्यामागचे कारण म्हणजे प्राण्यांवर केले जाणारे अत्याचार थांबवणे आहे.

जागतिक शाकाहारी संघटना हे कार्य करण्यामध्ये अग्रेसर आहे.

जागतिक शाकाहारी दिन साजरा करण्याचे आणखी एक उद्दिष्ट म्हणजे! आजपासून प्राण्यापासून बनवलेल्या गोष्टीचा त्याग करणे, मासरख्या गोष्टींचा त्याग करणे आणि स्वतःला संपूर्णपणे शाकाहारी बनवणे हे आहे.

असे केल्याने जगत होणाऱ्या प्राणी अत्याचाराला लगाम लागेल.

जागतिक शाकाहारी दिन साजरे करणारे अनेक भारतीय क्रिकेटर आणि चित्रपट ऍक्टर आहे ज्यांनी स्वतःला पूर्णपणे शाकाहारी बनवून घेतले आहे.

त्यामध्ये आघाडीचा क्रिकेटर “विराट कोहली” यांचे नाव आवर्जून घेतले जाते. विराट कोहली यांनी स्वतः त्यांच्या फिटनेसचे रहस्य सांगितले आहे ते म्हणजे ते पूर्णपणे शाकाहारी आहेत.

जागतिक शाकाहारी दिन साजरा करण्याचे अनेक मार्ग आहेत.

शाकाहार हा पूर्णपणे आरोग्यासाठी चांगला आहार आहे.

जागतिक शाकाहारी ते निमित्त भाषण करण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे.

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon