World Cancer Day 2023: कर्करोगाविषयी नवीन माहिती जाणून घ्या

World Cancer Day 2023: “जागतिक कर्करोग दिन” हा कर्करोग विषयी जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी “4 फेब्रुवारी” रोजी साजरा केला जातो. युनियन फोर इंटरनॅशनल कॅन्सल कंट्रोल (UICC) द्वारे या दिवसाचे आयोजन केले जाते आणि कर्करोग विरोधी जनजागृती करण्यासाठी जागतिक व्यासपीठ उपलब्ध करते.

जागतिक कर्करोग दिन निमित्त जगभरातील व्यक्ती, संस्था आणि सरकार कर्करोग जागृती करण्यासाठी आणि लोकांना कर्करोगाचा प्रभाव कमी करण्यासाठी कृती करण्यासाठी आणि या मोहिमेमध्ये एकत्र येण्याचे आमंत्रण देते.

जागतिक कर्करोग दिन हा कर्करोग विरोधाच्या लढ्यात बदल घडवून आणण्यासाठी व्यक्ती आणि संस्थांना एकत्र येण्याची संधी आहे. या रोगाबद्दल जागृती वाढवून आणि लोकांना कृती करण्यास प्रोत्साहित करून जागतिक कर्करोग दिनाचा उद्देश कर्करोगाचा जागतिक प्रभाव कमी करणे आणि या रोगाने बाधित असलेल्या लोकांचे जीवनमान सुधारणे हे आहे.

जागतिक कर्करोग दिन 2023 थीम

यावर्षी 2023 जागतिक कर्करोग दिन थीम “Close the Care Gap” ही आहे.

जागतिक कर्करोग दिन 2023 चे उद्दिष्ट

जागतिक कर्करोग दिन 2023 चे उद्दिष्ट समविचारी लोकांच्या आवाजाला एक शक्तिशाली आव्हान करण्यासाठी मजबूत युती आणि नवीन संयोग निर्माण करणे यावर लक्ष केंद्रित करणे आहे.

जागतिक कर्करोग दिनाचे महत्त्व

कर्करोग अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीरातील काही पेशी अनियंत्रितपणे विकसित होतात आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतात. जागतिक स्तरावर कर्करोग हे मृत्यूचे मुख्य कारण आहे ज्यामध्ये 2020 मध्ये एक कोटी पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतामध्ये 2022 मध्ये 19 ते 20 लाख अंदाजी प्रकरणे आढळून आणलेली आहे.

जागतिक कर्करोग दिनाचा इतिहास

4 फेब्रुवारी 2000 मध्ये सर्वात प्रथम जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात आला. या दिनाची सुरुवात पॅरिसमध्ये न्यू मिलेनियम साठी कॅन्सर विरुद्ध जागतिक शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. जागतिक कर्करोग दिनाचा परिचय हा पॅरिस चाटचा एक महत्त्वाचा घटक आहे. जो कर्करोग संशोधन, प्रतिबंध, रुग्णांची काळजी, जागरूकता आणि जगभरात एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न करते.

जागतिक कर्करोग दिन का साजरा केला जातो?

जागतिक कर्करोग दिन हा कर्करोग बाधित असलेल्या व्यक्तींसाठी आणि समाजामध्ये कर्करोगा विषयी जनजागृती घडून आणण्यासाठी साजरा केला जातो.

जगभरात मृत्यूच्या कारणांपैकी एक म्हणजे कर्करोग. दरवर्षी कर्करोगाने पीडित लोक मृत्यूस कारणीभूत ठरतात.

सर्वप्रथम जागतिक कर्करोग दिन केव्हा साजरा केला गेला होता?

सर्वप्रथम जागतिक कर्करोग दिन 2000 मध्ये साजरा केला गेला होता. समाजामध्ये कर्करोगाविषयी जागता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला होता.

मानव प्रजातीला शंभर पेक्षा जास्त कर्करोग होऊ शकतात आणि या गोष्टीला प्रतिबंध आणि उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात येतो.

भारतामध्ये कर्करोग मृत्यूचा दर किती आहे?

एका सर्वेनुसार भारतामध्ये दरवर्षी १९ लाख लोकांचा कर्करोग मुळे मृत्यू होतो.

वर्ष 2022 मध्ये भारतातील कर्करोगाचे प्रमाण 19 ते 20 असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

कर्करोग कसा होतो?

  • तंबाखूचा अति वापर
  • दीर्घकाळापर्यंत मद्यपान
  • अस्वस्थ अन्न सवयी
  • शारीरिक व्यायामाचा अभाव
  • वायु प्रदूषणाच्या संपर्कात येणे

यासारखे अनेक कारणे आहेत जे कर्करोगाला प्रोत्साहन देते.

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा