Women’s Day Special: बीजेपी (BJP) सरकारनेच म्हणजेच (मोदी सरकारने) आता महिलांसाठी १०० रुपये ने एलपीजी गॅस स्वस्त केलेला आहे अशी बातमी ऐकण्यास मिळत आहे.
लवकरच भारतामध्ये इलेक्शन सुरू होणार आहेत आणि त्यानिमित्तने मोदी सरकारने स्त्रियांसाठी एलपीजी गॅस १०० रुपयांनी स्वस्त केले आहे असे सांगितले जात आहे.
महिला दिवसासाठी ही मोदी सरकारकडून एक भेटवस्तू आहे असे सांगण्यात येत आहे.
8 मार्चपासून एलपीजी गॅस शंभर रुपयांनी स्वस्त केले जाणार आहे. मोदी सरकारने हे ट्विटर पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. या आधी मोदी सरकारने कॅबिनेट “उज्वला योजना” अंतर्गत एलपीजी सिलेंडर मध्ये सबसिडी दिली होती. ट्विटर व पोस्ट करताना (@BJP4India) मोदी म्हणाले की महिला दिवसानिमित्त महिलांसाठी दिलेली ही खास भेटवस्तू आहे यामुळे नारी शक्तीचे जीवन थोडेसे सोपे होणार आहे आणि करोडो कुटुंबावर असलेला आर्थिक तणाव कमी होणार आहे. तसेच हे एक पाऊल पर्यावरणाच्या संरक्षणासाठी देखील मदतगार असेल असे मोदींनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.