Vande Bharat Express: Marathi

Vande Bharat Express: Marathi (Route, Ticket Price, Route List, Speed, Pune Mumbai to Delhi, Booking) #vandebharatexpress

Vande Bharat Express: Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण भारताचे नवीन एक्सप्रेस “Vande Bharat Express” विषयी माहिती जाणून घेत आहोत. भारत सरकारने “वंदे भारत एक्सप्रेस” ची निर्मिती केलेली आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक अर्ध द्रुतगती रेल्वे सेवा आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची ही रेल्वेगाडी चेन्नई येथील इंट्रिगल कोच कारखान्यामध्ये उत्पादित करण्यात आलेले आहे.

30 सप्टेंबर 2022 रोजी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुप्रतिक्षित आणि नव्याने बनवलेली सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेस याचे उद्घाटन केले आहे. या ट्रेनची सेवा 1 ऑक्टोंबर 2022 पासून मुंबई सेंट्रल पासून सुरू होणार आहे.

वंदे भारत सुपरफास्ट ट्रेन एक्सप्रेस मध्ये प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यात येणार आहे. ही ट्रेन पूर्णपणे एसी असणार आहे, त्यासोबतच या ट्रेनला स्लाइडिंग दरवाजे आणि वाचनासाठी दिवे असणार आहे तसेच मोबाईल चार्जिंग पॉईंट, बायो टॉयलेट, स्वयंचलित द्वार, सीसीटीव्ही कॅमेरे या सर्व गोष्टी या ट्रेन मध्ये उपलब्ध केल्या जाणार आहे.

Vande Bharat Express: Route

वंदे भारत एक्सप्रेस ही मुंबई ते अहमदाबाद या मार्गावरून धावणार आहे.

Vande Bharat Express: Timetable

वंदे भारत एक्सप्रेस वेळापत्रक
मुंबई भारत एक्सप्रेस ही मुंबई सेंट्रल येथून सकाळी 6.20 मिनिटांनी सुटेल आणि दुपारी 12.15 वाजता गांधीनगरला पोहोचेल. गांधी नगर येथून दुपारी 14.05 वाजता सुटेल रात्री 19.05 वाजता पोहोचेल ही सेवा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी या दिवशी प्रवाशांना दिली जाणार आहे.

Vande Bharat Express: Ticket Price

वंदे भारत एक्सप्रेस या रेल्वेचा तिकीट दर

  • मुंबई सेंट्रल ते सुरत 690 रुपये असणार आहे
  • मुंबई सेंट्रल ते वडोदरा 900 रुपये
  • मुंबई सेंटर ते अहमदाबाद 1060 रुपये
  • मुंबई सेंटर ते गांधीनगर 1115 रुपये असणार आहे

Vande Bharat Express: Speed

भारतासाठी अभिमानाच्या क्षणी, सेमी हायस्पीड ट्रेन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ने केवळ 52 सेकंदात 100 किमी/ताशी वेग गाठून बुलेट ट्रेनचा विक्रम मोडला आहे, तर जपान निर्मित बुलेट ट्रेन 100 किमी/तास ५५ सेकंदात वेग पूर्ण करते.

Vande Bharat Express Speed: 100 km/hr in just 52 seconds

Vande Bharat Express: Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon