Silicon Valley Bank News: सिलिकॉन व्हॅली बँकेचे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम कसे होणार?

Today Share Market News Marathi 13 March 2023: सिलिकॉन व्हॅली बँकेचे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम कसे होणार? “Silicon Valley Bank News” काही दिवसापासून शेअर मार्केटमध्ये एक बातमी सध्या जोराने पसरत आहे ती म्हणजे सिलिकॉन व्हॅली बँक करप्ट झालेली आहे. अमेरिकेतील सर्वात नामांकित बँक सिलिकॉन व्हॅली सध्या बुडीत चाललेली दिसत आहे. या सर्वांचा परिणाम युरोप, अशिया आणि भारतावर देखील होणार आहे. चला तर जाणून घेऊया “सिलिकॉन व्हॅली बँकेचे परिणाम भारतावर कशाप्रकारे होतील याविषयी थोडीशी माहिती.”

Silicon Valley Bank News: सिलिकॉन व्हॅली बँकेचे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम कसे होणार?

सिलिकॉन व्हॅली बँकेचा परिणाम केवळ भारतावरच नव्हे तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होईल असा अंदाज तज्ञांनी वर्तवलेला आहे. सिलिकॉन व्हॅली बँक पूर्णपणे करप्ट झाल्याने याचा परिणाम भारतीय रुपयावर देखील होईल. त्यामुळे संपूर्ण शेअर मार्केटमध्ये तणावपूर्ण वातावरण राहील. सध्या आर्थिक मंदीचे वातावरण अमेरिकेमध्ये दिसत आहे आणि याचे परिणाम सध्या युरोप आणि आशिया सारख्या देशांना देखील जाणवू लागलेले आहे. युकेमध्ये आर्थिक मंदीची सुरुवात काही महिन्यांपासूनच सुरू झालेले आहे त्याचे परिणाम आता हळूहळू युरोप सारख्या छोट्या देशांमध्ये देखील होऊ लागलेले आहे, तसेच रशिया आणि युक्रेन युद्ध एक वर्षापासून सुरू आहे ते थांबायचे नाव घेत नाही यामध्येच पाकिस्तान सारख्या देशांमध्ये गृहयुद्ध सारखी स्थिती निर्माण झालेली आहे. या सर्वाचाच परिणाम कुठे ना कुठेतरी भारतासारख्या विकसनशील देशावर देखील होणार आहे.

सिलिकॉन व्हॅली बँकेचे परिणाम आता भारताच्या आयटी सेक्टरवर आणि स्टार्टअप वर देखील पडू शकतो असा अंदाज तज्ञांनी वर्तवलेला आहे. वर्ष 2023 च्या सुरुवातीलाच ॲमेझॉन गुगल आणि फेसबुक सारख्या मोठ्या कंपनीने आपल्या कंपनीतून कर्मचाऱ्यांची कपात केली होती. आता अमेरिकेमध्ये झालेल्या सिलिकॉन व्हॅली बँक मुळे सध्या शेअर मार्केटमध्ये देखील तणावाचे वातावरण आहे. गुंतवणूकदार लवकरात लवकर आपले पैसे बँकेतून काढून घेत आहे आणि याचा परिणाम देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होत आहे. शेअर मार्केट दिवसेंदिवस पडत आहे त्यामुळे अमेरिकन सरकारने लवकरात लवकर याविषयी पाऊल उचलणे महत्त्वाचे आहे.

सिलिकॉन व्हॅली बँकेचे शेअर का पडले?

गेला काही वर्षापासून युएसए फेडराल रिझव्हने 1980 च्या दशकात सुरुवातीपासून सर्वात आक्रमक व्याजदर वाढीचे चक्र सुरू केले आणि नंतर मध्यवर्ती बँक त्यात सामील झाल्या, ज्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांना परिणामाचा सामना करावा लागला.

सिलिकॉन व्हॅली बँकेचा भारतीय शेअर मार्केट वर असा परिणाम होईल?

सिलिकॉन व्हॅली बँकेचे संकट आणि त्याचा भारतीय शेअर बाजारावर होणारा परिणाम यावर बोलताना तज्ञांनी सांगितले की मूलभूत दृष्टिकोनातून भारतीय बँकांचा सिलिकॉन व्हॅली बँकेची कोणताही संबंध नाही किंवा अमेरिकन बँकेचा भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रात कोणताही प्रवेश नाही त्यामुळे शुक्रवारी शेअर बाजारातील क्रॅश केवळ भावनिक होता कारण वॉल स्ट्रीटवर नकारात्मक वातावरण असल्यामुळे याचा परिणाम भारतावर देखील झाला. भारतीय बँका चांगल्या आर्थिक स्थितीत आहेत आणि कॉर्पोरेट आघाडीच्या मागणीत आहे. सध्या अमेरिकेच्या डॉलरचे दर देखील घसरत आहेत त्यामुळे मार्केटमध्ये थोडेसे निराशा जनक वातावरण राहणार आहे.

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा