शिक्षक दिन मराठी भाषण: Shikshak Din Marathi Bhashan

शिक्षक दिन मराठी भाषण: Shikshak Din Marathi Bhashan (Teacher’s Day Marathi Speech 2022) #marathibhashan

नमस्कार मित्रांनो, आज आपण “Shikshak Din Marathi Bhashan” शेअर करत आहोत हे भाषांतर महागात तुमच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये उपयोगी येईल!

यासोबतच आज आम्ही तुम्हाला शिक्षक शिक्षक दिना बद्दल माहिती, टीचर्स डे का साजरा केला जातो? शिक्षक दिनाचे महत्त्व, शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो? आणि टीचर्स डे वर भाषण कसे द्यावे याविषयी माहिती सांगत आहोत. टीचर्स डे वर भाषण देऊन तुम्ही तुमच्या गुरुजींचा सन्मान करून त्यांना धन्यवाद करू शकता.

शिक्षक दिन मराठी भाषण: Shikshak Din Marathi Bhashan

शिक्षक दिनाचा इतिहास
भारतातील पूर्व उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबरला झाला.
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे शिक्षा मंत्री होते त्यांनी भारताच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये खूप मोठे योगदान दिलेले आहे त्यामुळे दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस भारतामध्ये “शिक्षण दिन” म्हणून साजरा केला जातो. सर्वात पहिला सर्वप्रथम शिक्षक दिन (Teacher’s Day) हा 1962 मध्ये साजरा केला गेला होता.

शिक्षक दिन हा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. पण शिक्षक दिन हा प्रत्येक देशांमध्ये वेगवेगळ्या तारखेला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय शिक्षक दिवस 5 ऑक्‍टोबरला साजरा केला जातो तर भारतामध्ये भारताचे पूर्व उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मान स्वरूप 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो.

शिक्षकांचे महत्त्व आणि त्यांचे योगदान याबद्दल समाजामध्ये जागरुकता पसरवण्यासाठी दरवर्षी 5 सप्टेंबर हा भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

टीचर्स डे दिवशी शाळांमध्ये कॉलेजांमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात ज्या मध्ये नृत्य संगीत आणि भाषण सारखे कार्यक्रम आयोजित केले जातात.

Treading Post: शिक्षक दिन बेस्ट कविता

शिक्षक दिन भाषण मराठी (Teacher’s Day speech in Marathi 2022)

कोणत्याही भाषणाची सुरुवात करण्याआधी ते आकर्षक असले पाहिजे ज्यामुळे तुमचे भाषण खूपच सुंदर वाटेल. सर्वात पहिले अतिथी यांचे स्वागत करणे त्यांना अभिवादन करून भाषणाची सुरुवात करावी. भाषणाची सुरुवात प्रसिद्ध व्यक्तींच्या विचारांनी करावी ज्यामुळे तुमचे भाषण आणखीनच आकर्षक होईल.

आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझे प्रिय वर्ग मित्र या सर्वांना माझा नमस्कार!

आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज आपण “शिक्षक दिन” साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. आज मी तुम्हाला शिक्षण दिनी भाषण सांगणार आहे. तुम्हा सर्वांना शिक्षण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या शिक्षकांना आदर देण्यासाठी आपण दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करतो याची सुरुवात 1962 मध्ये झालेले कारण की या दिवशी आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला. एक सक्षम एक शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती हा दिवस सर्व शिक्षक शिक्षकांसाठी शिक्षक दिन म्हणुन साजरा करून सन्मान दिला जातो.

शिक्षक हा देशाचा आणि समाजाचा अभिमान मानला जातो विकसित आणि प्रगतीशील देशासाठी येणाऱ्या पिढीला योग्य शिक्षण देऊन योग्य पिढी तयार करणारा एकमेव व्यक्ती शिक्षक असतो शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला उच्च शिखरावर नेण्यासाटी आपले ज्ञान वाढवत असतो. मुलांसाठी तो चांगला मार्गदर्शक ठरू शकेल असा त्याचा नेहमी प्रयत्न असतो.

प्रत्येक मोठा राजकारणी, कलाकार, डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनीयर, शेतकरी, सैनिक इत्यादी व्यक्तीच्या मागे शिक्षकांच्या मेहनतीचे फळ असते. बलाढ्य आणि विकसनशील देशाचा शिक्षक महत्त्वाचा भाग असतो. सर्व देशांमध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो. सर्व देशांमध्ये शिक्षक दिन साजरा करण्याचा उद्देश शिक्षकांचा योग्य सन्मान करणे आणि शैक्षणिक क्षेत्रात मिळालेल्या सर्व कामगिरीची प्रसंशा करणे आहे.

प्रत्येक मुलाच्या शिस्त आणि चारित्र्य घडवण्यात शिक्षकांचा हात असतो आणि केवळ शिस्त आणि चरित्र हेच राष्ट्राचे बलस्थानं बनते. शिक्षक दिन निमित्त विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकाची भूमिका साकारण्याची संधी मिळते. जी विद्यार्थी मोठे प्रेमाने पूर्ण करतात.

माझ्या आणि माझ्या सर्व सहकारी विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
धन्यवाद.

https://youtu.be/v9o0uOiT9G4
https://www.youtube.com/watch?v=7iGgWi7WuEc

शिक्षक दिन भाषणाची सुरुवात कशी करावी?

शिक्षक दिन भाषणाची सुरुवात आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझे प्रिय वर्ग मित्र या सर्वांना माझा नमस्कार या वाक्याने करावी

शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो?

शिक्षक दिन दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.

शिक्षक दिन मराठी भाषण: Shikshak Din Marathi Bhashan

1 thought on “शिक्षक दिन मराठी भाषण: Shikshak Din Marathi Bhashan”

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा