शनि अमावास्या 2022: शुभ मुहूर्त, वेळ

शनि अमावास्या 2022: शुभ मुहूर्त, वेळ (Pithori Amavasya Story 2022 Marathi) #shaniamavasya

शनि अमावास्या 2022: शुभ मुहूर्त, वेळ

27 August 2022

या वर्षीची शनि अमावास्या खूपच दुर्मिळ मनाली गेली आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या विशेष दिनी शनिची आराधना केल्याने शनीची साडेसाती आणि शनी दोष कमी होतो.

हिंदू धर्मात शनि अमावासेला खूप महत्व आहे. जेव्हा अमावास्या शनिवारी येते. तेव्हा ती शनी अमावास्या असते. या दिवशी स्नान करून दान धर्म करून शनीला प्रसन्न केले जाऊ शकते. असे मानले जाते कि शनि अमावास्या दिवशी ज्योतिष शास्त्रामध्ये सांगीतलेले उपाय केल्यास कुंडलीतून शनिची साडेसाती आणि शनि दोषापासून मुक्ती मिळते.

शास्त्रानुसार शनि अमावास्येच्या दिवशी स्नान आणि दान केल्याने शनिची कृपा राहते. यासोबतच पितरांना तर्पण अर्पण केले जाते. याचे फळ देखील या दिवशी प्राप्त होते. पंचांग नुसार या वर्षी भादोमध्ये येणाऱ्या अमावास्येला अत्यतं दुर्मिळ योगायोग घडत आहे.

Amavasya August 2022 Date and Time

शनि अमावास्या शुभ मुहूर्त, वेळ (today amavasya timing)

हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपदाची अमावस्या तिथी २६ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १२. वाजता सुरु होत असून २७ ऑगस्ट शनिवारी दुपारी १:४७ वाजता समाप्त होईल.

Pithori Amavasya 2022

पिठोरी अमावस्या २०२२: भाद्रपद अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या भक्तांद्वारे भूतकाळातील पापांपासून आणि हृदयातील द्वेषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पाळली जाते.

यावर्षी २६ ऑगस्टला पिठोरी अमावस्या हा सण साजरा केला जाणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार हा सण भाद्रपद महिन्यातील आमवसेच्या दिवशी साजरा केला जातो. या कारणास्तव याला भाद्रपद अमावस्या देखील म्हंटले जाते.

पिठोरी अमावस्या च्या पूर्वसंध्येला विवाहित स्त्रिया आणि विशेषतः माता त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी देवी दुर्गा 64 देवांची पूजा करतात. पिठ या शब्दाचा अर्थ पीठ असा होतो आणि म्हणूनच या सणाला पिठोरी अमावस्या असे नाव पडले आहे. राजस्थानमध्ये हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो.

पिठोरी अमावस्या: महत्व

भाद्रपद अमावास्या किंवा पिठोरी अमावस्या भक्तांद्वारे भूतकाळातील पापांपासून आणि हृदयातील द्वेषापासून मुक्त होण्यासाठी पाळली जाते. नातेवाईक आणि पूर्वजांसाठी पूजा आयोजित केली जाते तसेच कुटुंबातील आणि पूर्वजांसाठी शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करण्यासाठी गंगा नदीला देखील भेट दिली जाते असे मानले जाते की पिठोरी अमावस्येला आणि उपवास केल्याने भूतकाळातील पापांमुळे तुमच्या कुंडलीत दिसणारे कालसर्प दोष दूर होण्यास मदत होते.

हिंदू पौराणिक कथेनुसार पिठोरी अमावस्या व्रत कथा देवी पार्वतीने भगवान इंद्राच्या पत्नीला सांगितली होती. या दिवशी उपवास केल्याने शूर आणि निरोगी पुत्राचा जन्म होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. पिंडदान आणि पितृ दर्पण हे पिठोरी अमावस्येला केले जाणारे काही प्रमुख विधी आहेत.

Pithori Amavasya Story in Marathi

पिठोरी अमावस्या कथा मराठी
आटपाट नगर नावाच राज्य होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्याच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे.

दरवर्षी गरीब ब्राह्मण आपल्या घरांमध्ये ब्राह्मणांना जेवणासाठी बोलवत असे पण त्याच दिवशी सुनेच्या पोटामध्ये दुखु लागत असे आणि ती बाळंत होऊन तिचे मूल मारत असे अशाप्रकारे आणि ब्राह्मण उपाशी घरी जात असे असे हे सहा वेळेला झाले सातव्या वर्षी तसं झालं जेव्हा सासरा सुनेवर रागवतो आणि ते मेलेले मुलं तिच्या हातात घेऊन तिला जंगलांमध्ये हाकलून देतो नंतर ती स्त्री पुढे जंगलामध्ये जाते तिथे तिला झोटींगाची बायको भेटते, ती म्हणते बाई तू कोणाची आहे? येथे येण्याचे कारण काय आहे? आणि तशी लवकर नाही तर माझा नवरा झोटींग येईल आणि तुला मारून टाकेल.

तेव्हा ब्राह्मणाची सून त्या बाईला म्हणते! तेवढ्या करतोच मी इथे आले आहे झोटिंगची बायको म्हणाली बाई तू इतकी जीवावर उदार का झाली आहे? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागते ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून आहे. दरवर्षी मी श्रावणी अमावस्याच्या दिवशी बाळंत होते व मूल मरून जाते त्या दिवशी आमच्या घरी माझ्या आजेसासऱ्याचे श्रद्धा असते माझे असं झालं म्हणजे श्रद्ध असलेले ब्राह्मण उपाशी जातात अशी सहा बाळत पण माझे झाली. सातव्या खेपेला सुद्धा असंच झालं तेव्हा मामांजीना माझा राग आला आणि ते मला म्हणाले की माझा बाप तुमच्या बाळंतपणामुळे गेली सात वर्षे उपाशी राहिला आहे. तर तू घरातून चालती हो असं म्हणून हे मेलेला मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला हाकलून दिलं आणि मी इथे आले. आता जगून तरी काय करायचे असं म्हणून ती स्त्री रडू लागली.

तशी झोटिंगची बायको तिला म्हणाली बाई तू भिऊ नकोस घाबरू नकोस अशीच पुढे जा तिथे तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल आणि तुला बेलाचं झाड लागेल तिथे एका झाडावर बसून रहा. रात्री नागकन्या, देवकन्या, सातसती अप्सरा बरोबर घेऊन तेथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे? म्हणून विचारतील असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण! त्या तुला पाहतील कोण म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळ त्यांना खरं सांग. ती स्त्री तिथून उठली पुढे गेली तोच एक बेलाचे झाड पाहिलं तीथे उभे राहिली इकडेतिकडे पाहू लागली जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तसे नागकन्या देवकन्या आणि सात अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं.

ती स्त्री झाडावरून खाली उतरली आणि म्हणाले की मी आहे अतितिथी त्यासोबतच देवकन्या नागकन्या यांनी त्या स्त्रीची विचारपूस केली त्या स्त्रीने आपली खरी हकीकत त्यांना सांगितली. हकीकत ऐकल्यानंतर देवकन्या आणि नागकन्या यांनी त्या स्त्रीच्या मुलाला जिवंत केले आणि तिला 64 योनीची पूजा करण्यास सांगितले. ही पुजा केल्याने काय होते असे स्त्री ने विचारले? अप्सरांनी सांगितले की हे व्रत केल्याने मुले दगावत नाही आणि सुख समाधानामध्ये राहतात.

शनि अमावास्या 2022: शुभ मुहूर्त, वेळ

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा