Rani Me Honar मालिकेबद्दल बरंच काही!

Rani Me Honar मालिकेबद्दल बरंच काही!

Rani Me Honar series : लवकरच अभिनेता सिद्धांत खिरीद (Siddharth Khirid) यांची सोनी मराठी या वाहिनीवर “राणी मी होणार” ही मालिका 21 ऑक्टोंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता प्रेक्षकांच्या भेटीत येणार आहे.

Telegram Group Join Now

या मालिकेमध्ये अभिनेता सिद्धार्थ हा ‘मल्हार’ नावाची मुख्य भूमिका साकारणार आहे. तसेच या मालिकेमध्ये ‘मीरा’ नावाच्या भूमिकेमध्ये मराठी अभिनेत्री संचिता कुलकर्णी (Sanchita Kulkarni) यांची भूमिका असणार आहे. याआधी संचीता कुलकर्णी यांनी ‘सुंदर आमचे घर, जाडूबाई जोरात, श्रावणबाळ रॉकस्टार’ या मालिकेमध्ये अभिनय केला होता.

तसेच या मालिकेमध्ये अभिनेत्री ‘स्वाती देवल’ यांची देखील भूमिका असणार आहे.

या मालिकेत मल्हार आणि मिरची प्रेम कहानी बघायला मिळणार आहे. सध्या या मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनामध्ये खूप उत्सुकता आहे. सोनी मराठी नवीन विषयासोबत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ही नवीन सिरीयल घेऊन येत आहे.

आयुष्य बदलवणाऱ्या स्वप्नांची उमेद बाळगणाऱ्या ‘ती’ची कहाणी आता लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ खिरीद आणि संचिता कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘राणी मी होणार’ या मालिकेचा प्रोमो झळकला असून हा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रोमोमध्ये सिद्धार्थ आणि संचिता एका पार्लरमध्ये काम करताना दिसत आहेत.

Leave a Comment