Pushpa 2: लवकर सिनेमागृहात येणार

Pushpa 2: अल्लू अर्जुन यांची मोस्ट अवेटेड ॲक्शन पेन इंडिया फिल्म (Pushpa: The Rise) या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. हा चित्रपट तेलुगु मध्ये नव्हे तर संपूर्ण भाषेमध्ये सर्वात चांगली कामगिरी करणारा चित्रपट ठरला होता.

आता लवकरच पुष्पा 2 या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा टिझर 8 एप्रिल रोजी लॉन्च करण्यात येणार आहे.

Pushpa 2 Teaser Release Date: 8 एप्रिल हा दिवस दक्षिणेत्य अभिनेता अल्लू अर्जुन यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पा 2 चा टिझर लॉन्च करण्याची इच्छा दिग्दर्शकांनी व्यक्त केलेली आहे.

Pushpa 2 Story

पुष्पा 2 ची कथा आणि त्यातल्या थरारक ट्विस्टमुळे चाहत्यांच्या आनंदाला थारा नाही. चित्रपटातील मुख्य पात्र पुष्पा तिरुपती तुरुंगातून फरार झाल्याचे टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. त्याला 8 गोळ्या लागल्या आहेत. पुष्पा जिवंत आहे की मृत, याबाबत सस्पेंस आहे. जंगलात फक्त पुष्पाचे कपडे सापडतात. महिनाभर त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. अशा स्थितीत त्याचे चाहते संतापले आणि शहरात दंगल पसरली.

प्रत्येकजण टेन्शनमध्ये आहे की त्यांचा हिरो पुष्पराज कुठे आहे? त्याचाही पोलिसांना संशय आहे. ते त्याच्या परतीची वाट पाहत आहेत. टीझरच्या शेवटी, एका व्यक्तीची एक अंधुक झलक दिसते, जो एका चादरीत गुंडाळलेला आहे. समोर वाघ येतो, त्यानंतर एक डायलॉग ऐकायला मिळतो की जंगलात एखादा प्राणी दोन पावले मागे गेला तर समजा सिंह आला, पण सिंह दोन पावले मागे गेला तर समजा पुष्पा आला. यानंतर जेव्हा पुष्पा दिसली तेव्हा तिचे चाहते पुष्पा जिवंत असल्याची ओरड करतात.

Leave a Comment