Puneet Superstar News: अलीकडेच Bigg Boss OTT 2 मधुन प्रसिद्धीझोतात आलेला पुनित सुपरस्टारची त्याच्या फॅन्समध्ये प्रचंड क्रेझ आहे. पुनित सुपरस्टारचे व्हिडीओ, त्याची भाषा अशा अनेकांची सोशल मिडीयावर चर्चा असते.
पुनितच्या फॅन्सने आता सोशल मिडीयावर आता एकच गदारोळ केलाय. पुनितच्या इंन्स्टाग्राम अकांऊंट रिमूव्ह झालं असल्याची चर्चा सुरु झालीय.
पुनीत सुपरस्टार सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. त्याचे जवळपास 3.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. पुनित त्याच्या विचित्र व्हिडिओंनी हसवतो, तर काही लोकांना त्याचे व्हिडिओ खूपच भयंकर वाटतात.
आता अलीकडे, पुनीत सुपरस्टारचे अकाऊंट इंस्टाग्रामवर दिसत नाही, ज्याचे अनेक स्क्रीनशॉट त्याच्या चाहत्यांनी ट्विटरवर देखील शेअर केले आहेत.
पुनितचे अकाऊंट बंद झाल्याने त्याचे अनेक चाहते संतापले असून पुनीतचे अकाऊंट परत आणावं म्हणु मागणी करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर पुनीतचे अनेक चाहते असेही म्हणतात की, पुनीतच्या खात्यावर रॅपर एमसी स्टेनच्या आर्मीच्या म्हणजेच फॅन्सनी रिपोर्ट करुन अनेक वेळा तक्रार केलीय. ज्यामुळे पुनितचे खाते इन्स्टाग्रामवरुन काढून टाकण्यात आले आहे.
पुनीत सुपरस्टारचे इन्स्टाग्राम अकाऊंट गायब झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांना राग अनावर झालाय. अनेक फॅन्सनी इन्स्टाग्रामला दोष दिलाय. एका युजरने ट्विट केले की, “पुनीत सुपरस्टारच्या खात्याची mc stan’s Army ने अनेक वेळा तक्रार केली आहे. त्यामुळे त्याचे खाते लॉक झाले आहे”.