Patrakar Din 6 January 2023 Marathi: History Significance Important & Celebrate

Patrakar Din 6 January 2023 Marathi: History Significance Important & Celebrate #patrakardin2023

Highlights

  • बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील पहिले कवी होते त्यांनी “6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले.”
  • बाळशास्त्री जांभेकर पत्रकारितेतील दिलेल्या योगदानासाठी महाराष्ट्र शासनाने “6 जानेवारी पत्रकार दिन” जाहीर केलेला आहे.
  • हा दिवस महाराष्ट्र राज्य साजरा केला जातो.

Patrakar Din 6 January 2023 Marathi

Patrakar Din Maharashtra: आजच्या आर्टिकल मध्ये आपण “पत्रकार दिन महाराष्ट्र 2023” बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. दरवर्षी 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन महाराष्ट्र मध्ये साजरा केला जातो. चला तर जाणून घेऊया पत्रकार दिन का साजरा केला जातो याविषयी थोडीशी माहिती.

Patrakar Din 2023: History

दरवर्षी 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा “बाळशास्त्री जांभेकर” यांनी मराठी वृत्तपत्रासाठी केलेल्या कामगिरीसाठी साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर (Balshastri Jambhekar) हे मराठीमधील आद्य पत्रकार होते त्यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र “दर्पण 6 जानेवारी 1832 मध्ये सुरू केले”. जुलै १८४० मध्ये दर्पण चा शेवटचा अंक प्रकाशित झाला.

बाळशास्त्री जांभेकर यांचे पत्रकारितेतील योगदान

बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील पहिले कवी होते त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. दर्पण चा शेवटचा अंक जुलै 1840 मध्ये प्रकाशित झाला.

गोविंद कुठे (भाऊ महाजन) यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. जनसामान्य पर्यंत पोहोचण्यासाठी दर्पण हे वृत्तपत्र मराठी भाषेमध्ये सुरू करण्यात आले.

वृत्तपत्र ही संकल्पना त्याकाळी नवीन असल्यामुळे सर्वसामान्यांच्या मनामध्ये ती रुजली नाही त्यामुळे दर्पणला फारसे यश मिळाले नाही. पण ही संकल्पना जशी जशी समाजात रुजली तसे तसे त्यात विचार रुजत गेले आणि प्रतिसाद वाढत गेला. ब्रिटिशांच्या काळात वृत्तपत्र चालवणे आणि वाचक वर्ग मिळणे हे फार कठीण काम होते पण या काळातही सुधारकांनी नफ्याचे कोणतेही तत्त्व न स्वीकारतात आपली वृत्तपत्रे चालवली बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे अशाच प्रकारचे वृत्तपत्र होते.

Patrakar Din 2023: Significance

बाळशास्त्री जांभेकर यांनी दिलेल्या वृत्तपत्राच्या बहुमूल्य योगदानासाठी हा दिवस साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर यांनी सर्वात प्रथम मराठीमधील वृत्तपत्र दर्पण प्रकाशित केले होते. तेव्हा लोक फक्त इंग्रजी वृत्तपत्र वाचत असे मराठी जनसामान्यपर्यंत वृत्तपत्र पोहोचावे या उद्देशाने बाळशास्त्री जांभेकर यांनी भाऊ महाजन यांच्या सोबत मिळून मराठीतील पहिले वृत्तपत्र प्रकाशित केले. त्यांनी केलेल्या या कार्यामुळे आज मराठीमध्ये अनेक वृत्तपत्र आपल्याला पाहायला मिळतात. मराठी भाषा आणि मराठी वृत्तपत्र साठी दिलेल्या योगदानासाठी महाराष्ट्र सरकार दरवर्षी “6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पत्रकार दिन” म्हणून साजरा करतो.

Patrakar Din 2023: UPSC & MPSC

स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या मुलांसाठी पत्रकार दिन विषयी नेहमी विचारण्यात येते जसे की मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते होते आणि ते कोणी सुरू केले असे प्रश्न बऱ्याचदा यूपीएससी आणि एमपीएससी सारख्या परीक्षांमध्ये विचारले जातात. हा आर्टिकल अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत.

महाराष्ट्रात पत्रकार दिन का साजरा केला जातो?
6 जानेवारी 1832 मध्ये दर्पण हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले.
दर्पण हे मराठी मधील पहिले वृत्तपत्र होते. म्हणूनच दरवर्षी महाराष्ट्र शासन 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन म्हणून साजरा करते.

Patrakar Din 6 January 2023 Marathi: History Significance Important & Celebrate

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon