Ajit Doval Birthday: पाकिस्तानमध्ये 7 वर्ष अंडरकव्हर एजंट म्हणून राहिले ऑपरेशन ब्लॅक थंडर मध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका आहे

Ajit Doval Birthday: पाकिस्तानमध्ये 7 वर्ष अंडरकव्हर एजंट म्हणून राहिले ऑपरेशन ब्लॅक थंडर मध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका आहे

हायलाइट्स
1. भारतातील जेम्स बॉण्ड म्हणून प्रसिद्ध
2. अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जातात
3. किंग जॉर्जच्या रॉयल इंडियन मिलिटरी स्कूल मध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले

20 जानेवारी 2022
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा आज वाढदिवस आहे. आज लोक डोवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अजित डोवाल भारताचे जेम्स बॉण्ड म्हणून खूपच प्रसिद्ध आहेत. अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास मानले जातात. अजित डोवाल यांच्या नावावर सर्जिकल स्ट्राइक पासून ते नागा पीस एकॉर्ड, ऑपरेशन ब्लॅक थंडर ते भारतीय नाकरिकाना ISIS तावडीतून सुरक्षित बाहेर काढण्यापर्यंत अनेक कामगारी केलेले आहेत.

अजित डोवाल यांचा जन्म 20 जानेवारी 1945 रोजी उत्तराखंड मधील पौडी गडवाल येथे झाला त्यांचे वडील हे देखील भारतीय लष्करात अधिकारी होते त्यांचे पारंभिक शिक्षण राजस्थानमधील अजमेर येथील किंग जॉर्ज रॉयल इंडियन मिलिटरी स्कूल (आता अजमेर मिलिटरी स्कूल) येथे झालेले. 1967 मध्ये त्यांनी आग्रा विद्यापीठांमधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. केरळचे केडरचे 1968 बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले डोवाल 1972 मध्ये RAW या गुप्तचर संस्थेमध्ये रुजू झाले त्यांनी सात वर्षे पाकिस्तान मध्ये अंडरकव्हर एजंट म्हणून काम केले.

कंदहार विमान अपहरणाच्या वेळी तालिबानशी चर्चा

1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करण्यात आले होते नंतर ते कंदहार हलवण्यात आले त्यावेळी अजित डोवाल यांनी तालिबानशी चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. RAW चे माजी प्रमुख दुलित यांच्या म्हणण्यानुसार त्या काळात अजित डोवाल कंदहार मधून सतत त्यांच्याशी संपर्क करत होते डोवाल यांनीच अपहरणकर्त्यांना प्रवाशांना सोडण्यासाठी राजी केले होते.

Ajit Doval Birthday: पाकिस्तानमध्ये 7 वर्ष अंडरकव्हर एजंट म्हणून राहिले ऑपरेशन ब्लॅक थंडर मध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका आहे

Spread the love
Shrikant

Shrikant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *