Nisargachya Sahavasat Nibandh Marathi निसर्गाच्या सहवासात

निसर्गाच्या सहवासात निबंध | Nisargachya Sahavasat Nibandh Marathi

प्रस्तावना
निसर्गाच्या सहवासात निबंध Nisargachya Sahavasat Nibandh Marathi: माणसाचे निसर्गाशी असलेले नाते जुने आणि अतूट आहे. लहानग्या रडणाऱ्या मुलाला आई काऊ चिऊ दाखवून गप्प करते. प्रत्यक्ष भगवान रामचंद्रांना ते बाळरूपात असताना, चंद्रच हवासा वाटला होता. बाळपणातून कुमारवयात जातानाही आपला बराच काळ निसर्गाच्या सहवासातच जातो. जसे, नदीत डुंबणे, झाडावर माकडासारखे चढून कैन्याचिंचा खाणे, वडाच्या पारंब्यांना पकडून सूरपारंब्यांचा खेळ खेळणे इत्यादी.

निसर्गाच्या सहवासात निबंध | Nisargachya Sahavasat Nibandh Marathi

सुट्टीत खेडेगावात आजोळी वा काकांकडे जाणारी मुले वाड्याच्या सावलीत बसण्याऐवजी टोळकी करून मळ्यातून, शेतातून, रानातून का भटकतात? असा प्रश्न मोठ्यांना पडतो.

हे आहे निसर्गाचे आकर्षण. दर सुट्टीत पदभ्रमणाला, गिर्यारोहणाला आणि व्यवस्थित योजना आखून देशोदेशीची माणसे हिमालयावर चढाईसाठी का जातात? ही आहे रक्तातील निसर्गाची ओढ! निसर्गाच्या सहवासात माणसाच्या वृत्ती फुलून येतात. प्रपंचातील चिंता, व्यथा यांची अभ्रे निवळून जातात. लेखक, कवी यांना तर निसर्गाची किती ओढ असते!

कवी बा. भ. बोरकर म्हणतात,

हिरवळ आणिक पाणी।
तेथे स्फुरती मजला गाणी।

‘कुसुमाग्रजांनी चंद्राचे वर्णन, ‘ स्वप्नांचा सौदागर’ असे केले आहे.

निसर्गाच्या सहवासातच आपल्या पूर्वसुरींना वेद स्फुरले. संत तुकाराम महाराजांना तर वृक्षवल्ली, वनचरे आपले ‘सोयरे’ वाटतात; त्यांच्याशी ते संवाद साधतात. हिमालय किती भव्य की त्याला पाहून कालिदासाला’ पृथ्वीच्या मापदंडा’ची कल्पना सुचली.

निसर्ग हा केवळ स्वप्नेच पुरवतो असे नाही, तर तो माणसाला सहस्र करांनी सतत काही ना काही पुरवत असतो. पण या करंट्या माणसाचीच झोळी फाटकी ठरते. निसर्गातील प्रत्येक गोष्ट माणसाच्या हितासाठीच झटत असते. सूर्यापासून माणसाला प्रकाश मिळतो, उष्णता मिळते. सूर्यप्रकाशात झाडे वाढतात. चंद्र, त्याचे चांदणे, ग्रह, उपग्रह यांच्या सहवासात माणूस उत्साहित होतो. नदीच्या सहवासात विविध संस्कृती विकसित झाल्या आहेत.

समुद्राने माणसाला जलप्रवासाचा आनंद दिला. मीठ देऊन त्याचे भोजन रुचकर केले. त्याला विविध रत्नांनी समृद्ध केले आणि आता ‘काळे सोने’ म्हणजे इंधन पुरवून माणसाच्या जीवनाची गती वाढवली.

निसर्ग मानवाचा सच्चा मित्र आहे. त्याने माणसाला भव्यता, उदात्तता, रौद्रता आणि शीतलता या गुणांची ओळख करून दिली.

पशुपक्ष्यांतील विविधता माणसाला अचंबित करून टाकते. आज घाईगर्दीत गुरफटलेल्या माणसाला या निसर्गाकडे पाहायलाही फुरसत मिळत नाही. कधी कधी माणसाला स्वत:च्या कर्तृत्वाचा अतोनात गर्व होता. तेव्हा भूकंप, महापूर, व दुष्काळ असे दणके ही निसर्गाने माणसाला दिले आहेत.

माणसाला आपल्या निर्मितीचा, कलाकृतीचा सर्वात मोठा गर्व आहे. व निसर्ग रुपी कलावंतांच्या कलाकृती सौंदर्य माणसाच्या यान अहंपणालाही छेदून जाते. एकूण काय निसर्गानं विना मानव असंभव असंभव आहे.

निसर्गाच्या सहवासात निबंध | Nisargachya Sahavasat Nibandh Marathi

Spread the love

Related Posts

One thought on “निसर्गाच्या सहवासात निबंध | Nisargachya Sahavasat Nibandh Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!