National Youth Day Speech in Marathi (Rashtriya Yuva Diwas Marathi Bhashan, Buy Book Swami Vivekananda in Marathi, Swami Vivekananda Speech in Marathi Download PDF) [राष्ट्रीय युवा दिन मराठीत भाषण 2023, राष्ट्रीय युवा दिवस मराठी भाषा, स्वामी विवेकानंद मराठी पुस्तक, स्वामी विवेकानंदांचे मराठीत भाषण PDF डाउनलोड] #nationalyouthday2023
National Youth Day Speech in Marathi
भारतात, राष्ट्रीय युवा दिन दरवर्षी 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो, जे एक तत्त्वज्ञ, भिक्षू आणि भारतातील महान आध्यात्मिक नेत्यांपैकी एक होते. हा दिवस विविध उपक्रम आणि कार्यक्रमांसह साजरा केला जातो, जसे की चर्चासत्रे, वादविवाद आणि कार्यशाळा, जे तरुणांना समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रेरित करते.
Buy Book Swami Vivekananda in Marathi
“Buy Book Swami Vivekananda in Marathi” जर तुम्हाला स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा त्यांच्या विचारांमधून माहिती जाणून घ्यायची असेल तर “Amazon.in” या वेबसाईटवर तुम्हाला त्यांची पुस्तके खूपच कमी किमतीमध्ये मिळू शकतात.
- ध्यान आणि त्याची पद्धती
- व्यक्तिमत्व विकास
- श्रीरामकृष्णांचे दिव्य जीवन
- भक्ती योग
- भगवान श्रीकृष्ण आणि भगवद्गीता
- ज्ञानयोग
- स्वामी विवेकानंद जीवन चरित्र
- मन आणि त्याची शक्ती
- सत्य व आभास
- पुनर्जन्म आणि आत्म्याचे अमरत्व
- पूर्व आणि पश्चिम
- हिंदू धर्म
- राजयोग
- माझा भारत अमर भारत
- विश्वगुरू भारत
- भगवान बुद्ध आणि त्यांची शिकवण
Rashtriya Yuva Diwas Marathi Bhashan
राष्ट्रीय युवा दिन 2023 भाषणाची सुरुवात कशी करावी?
आदरणीय
महोदय, शिक्षक आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो…
आज आपण येथे “राष्ट्रीय युवा दिवस” साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. राष्ट्रीय युवा दिवस दरवर्षी 12 जानेवारी रोजी साजरा केला जातो हा दिवस भारतातील महान संन्यासी “स्वामी विवेकानंद” यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो.
1984 साली भारत सरकारने स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. 1985 पासून भारतात 12 जानेवारी रोजी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो.
स्वामी विवेकानंद हे त्यांच्या विचारांसाठी आणि आदर्शासाठी जगभर ओळखले जातात.
अगदी लहान वयातच त्यांनी आपल्या विचारांमुळे स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. आपला भारत देश हा तरुणांचा देश आहे आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार तरुणांना योग्य दिशा देतील. म्हणूनच भारत सरकारने 12 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित केला.
यावर्षी आपण स्वामी विवेकानंद यांची 160 वी जयंती साजरी करणार आहोत. स्वामी विवेकानंद यांचा जन्म पश्चिम बंगालच्या कोलकत्ता शहरात झाला. त्यांचे संपूर्ण नाव “नरेंद्र दत्त” होते. वडिलांचे नाव “विश्वनाथ” आणि आईचे नाव “भुनेश्वरी देवी” होते.
विवेकानंद हे नाव त्यांचे गुरु “श्रीरामकृष्ण परमहंस” यांनी दिले होते.
स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या गुरूकडून अध्यात्मिक शिक्षण घेतले आणि हिंदुत्व आणि त्यांच्या गुरुचा विचारांचा जगभर प्रसार केला.
1893 साली अमेरिकेत आयोजित जागतिक संसदेत त्यांनी दिलेले भाषण आजही लोकांना आठवते आपल्या भाषणात त्यांनी भारत हिंदू धर्म आणि त्यांचे गुरु श्रीराम कृष्ण यांचे विचार जगासमोर मांडले.
आज या भाषणाला 130 वर्षे झाली आहे पण तरीही आज स्वामींच्या या ऐतिहासिक भाषणाची चर्चा होते. एवढेच नाही तर स्वामीजींच्या भाषणानंतर उपस्थितन कडून स्टॅंडिंग ओवेषण देखील मिळाले आणि संपूर्ण दोन मिनिटे टाळ्यांचा कडकडाट झाला.
इतकेच नाही तर पाश्चिमात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृती यांच्यातील अंतर कमी करण्यातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. विवेकानंदांनी आपले जीवन सामाजिक कार्यासाठी समर्पित केले ते एक संन्यासी जीवन जगले.
1902 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांनी स्थापन केलेली “रामकृष्ण मिशन” आज जगभरामध्ये ओळखली जाते. भारतीय सामाजिक, धार्मिक संस्थेच्या माध्यमातून कर्मयोगाची तत्वे, धार्मिक अभ्यास आणि अध्यात्म यासारख्या गोष्टीचे ज्ञान लोकांपर्यंत पोचवले जाते. ही संस्था त्यांनी 1897 साली भारतातील कोलकत्ता शहरात स्थापन केली.
आज आपल्या भारताला स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची गरज आहे ज्यामुळे आपला भारत अधिक विकसनशील होईल! स्वामी विवेकानंद हे फक्त धार्मिक नेते नव्हते तर ते एक उत्कृष्ट वक्ते देखील होते त्यांनी केलेले काम आणि युवकांसाठी प्रेरणादायी आहे.
स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रीय युवा दिन निमित्त भाषण करण्याची संधी दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे.
एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.
जय हिंद जय भारत
Swami Vivekananda Speech in Marathi Download PDF
स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रीय युवा दिवस 2023 विषयी भाषण “PDF Download” करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Swami Vivekananda Speech in Marathi Download PDF: Click Here