राष्ट्रीय विज्ञान दिवस 2023 मराठी भाषण “National Science Day 2023 Speech in Marathi” #marathibhashan
National Science Day 2023 in India: आजच्या आर्टिकल मध्ये आपण “राष्ट्रीय विज्ञान दिवस 2023 मराठी भाषण” विषयी माहिती जाणून घेत आहोत. ‘दरवर्षी भारतामध्ये 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात येतो.’ हा दिवस कसा साजरा करण्यात येतो याविषयी थोडीशी माहिती.
मित्रांनो विज्ञानाच्या मदतीने आपण जगाची ओळख करून घेतलेली आहे तसेच विज्ञानामुळे असे काही रहस्य आहेत ज्याच्यावरून पडदा उघडलेला आहे. विज्ञानाच्या मदतीने माणसाने आपले आयुष्य एकदम सोपे केले आहे. आज आपण घरामध्ये टीव्ही मोबाईल फ्रीज यासारख्या वस्तू वापरतो त्या विज्ञानाचाच किमया आहेत. आज आपण 21व्या शतकात राहतो आज ‘स्पेस एक्स’ कंपन्या मंगळ ग्रहावर मानव वस्ती करू पाहतात हे सर्व विज्ञानामुळे शक्य झाले आहे. विज्ञानाचा आपल्या मनुष्य जीवनामध्ये किती प्रभाव आहे आणि विज्ञानाच्या मदतीने आपण काय काय शक्य करू शकतो हे विज्ञानामुळे शक्य झालेले आहे. विज्ञानाचे महत्त्व आपल्या जीवनात किती आहे याविषयी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये दरवर्षी चर्चासत्र आयोजित केली जातात यामध्ये विज्ञानाचे महत्त्व आणि योगदान याविषयी वकृत्व स्पर्धा देखील घेतल्या जातात. आज आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस विषयी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भाषण कसे करावे याविषयी माहिती जाणून घेत आहोत.
राष्ट्रीय विज्ञान दिवस 2023 मराठी भाषण: National Science Day 2023 Speech in Marathi
Rashtriy Vigyan Divas Marathi Bhashan: राष्ट्रीय विज्ञान दिवस भाषणाची सुरुवात कशी करावी?
आदरणीय
महोदय, गुरुजन, शिक्षक आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो…
“आज आपण येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस भारताचे महान भौतिक शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या रमण इफेक्ट (Raman Effect) शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.”
“सर चंद्रशेखर वेंकट रमण” यांना रामन इफेक्ट या शोधासाठी ‘नोबल पारितोषिक’ मिळाले होते आणि तसेच त्यांना भारतातील सर्वोच्च नागरिक सम्मान ‘भारतरत्न’ देखील मिळाले होते.
विज्ञान क्षेत्रात दिलेल्या या बहुमोल योगदानासाठी भारत सरकारने 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याची मंजुरी दिली.
हा प्रस्ताव सर्वात प्रथम राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संप्रेषण परिषदेने 1986 मध्ये मांडला होता नंतर भारत सरकारने 1987 रोजी मान्यता दिली आणि तेव्हापासून आपण दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो.
राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्याचा मूळ उद्देश म्हणजे लोकांमध्ये विज्ञानाविषयी जागरूकता निर्माण करणे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी विज्ञान या क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्यासाठी प्रोत्साहित केला जातो. ज्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये तरुण पिढी ही विज्ञान क्षेत्रांमध्ये आणखी योगदान देतील.
विज्ञानाच्या मदतीमुळे आज आपण यूएसए मध्ये असलेल्या व्यक्तीशी थेट संपर्क साधू शकतो. विज्ञानाच्या मदतीने आपले जीवन एकदम सोपे झालेले आहे. विज्ञानाच्या मदतीने आपण हे सर्व विश्व आपल्या मुठीत घेतलेले आहे.
“राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि डॉक्टर सी. व्ही. रमण” यांच्या बद्दल बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे.
एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.
जय हिंद जय भारत
निष्कर्ष
‘राष्ट्रीय विज्ञान दिवस 2023 मराठी भाषण’ हे भाषण तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये वकृत्व स्पर्धेसाठी उपयोगी ठरेल असा आमचा विश्वास आहे.