नारळी पौर्णिमा 2022 मराठी माहिती – Narali Purnima 2022 Marathi

नारळी पौर्णिमा 2022 मराठी माहिती – Narali Purnima 2022 Marathi का साजरी केली जाते नारळीपौर्णिमा जाणून घ्या संपूर्ण माहिती. #naralipurnima2022

नारळी पौर्णिमा 2022 मराठी माहिती – Narali Purnima 2022 Marathi

श्रावण पौर्णिमा 2022 सामान्यतः महाराष्ट्राच्या काही भागात विशेषतः किनारपट्टीवरील महाराष्ट्र आणि कोकण प्रदेशात नारळ पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. नारळी पौर्णिमेच्या दिवशी भक्त समुद्राची समुद्र देवताची, वरून देवता यांची पूजा करतात आणि त्यांना नारळ अर्पण करतात असे मानले जाते की श्रावण पौर्णिमेच्या शुभ दिवशी समुद्र देवतेची पूजा केल्याने परमेश्वर प्रसन्न होतो आणि तो समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांचे आणि मासेमारी करणाऱ्या लोकांचे संरक्षण करतो.

नारळी पौर्णिमेच्या दिवशी लोक उपवास ठेवतात उपवासाला फक्त नारळ खातात त्यामुळे महाराष्ट्रात आणि कोकण भागात श्रावण पौर्णिमेचा दिवस नारळी पौर्णिमा म्हणून ओळखला जातो.

नारळी पौर्णिमेच्या दिवशी लोक निसर्गाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात, झाडे लावतात. नारळी पौर्णिमा हा नारळ दिवस (Coconut Day) म्हणून देखील ओळखला जातो. हा दिवस समुद्र देवता आणि वरून देवताला समर्पित आहे नारळी पौर्णिमा हा सण भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील मासेमारी समुदायात द्वारे मोठ्या उत्सवात आणि आनंदाने साजरा केला जाणारा सण आहे.

हिंदू कॅलेंडर मधील श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी नारळी पौर्णिमा साजरी केली जाते म्हणून तिला ‘श्रावण पौर्णिमा’ म्हणतात या वर्षी नारळीपौर्णिमा 12 ऑगस्ट 2022 रोजी येत आहे. या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देऊन हा सण साजरा करतात.

नारळी पौर्णिमा का साजरी केली जाते?

प्रामुख्याने मासेमारी करणार्‍या कोळी लोकांचा ‘नारळी पौर्णिमा’ हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. जहाज, बोटी यांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अर्पण करतात म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात.

नारळी पौर्णिमा 2022 च्या शुभेच्छा: Narali Purnima 2022 Wishes in Marathi

“रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हा सण तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येवो हीच आमची शुभकामना.”

Narali Purnima 2022 Wishes in Marathi

“समस्त कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.”

Narali Purnima 2022 Wishes in Marathi

सण आयलाय गो, आयलाय गो
नारळी पुनवेचा…
मनी आनंद मावेना,
कोळ्यांच्या दुनियेचा…

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

हे पण वाचा…

रक्षाबंधन का साजरा केला जातो?
रक्षाबंधन मराठी निबंध

नारळी पौर्णिमा 2022 मराठी माहिती – Narali Purnima 2022 Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा