मी पंतप्रधान झालो तर निबंध मराठी | Mi Pantpradhan Zalo Tar Nibandh

प्रस्तावना
आज आपण मी पंतप्रधान झालो तर” (Mi Pantpradhan Zalo Tar Nibandh) या निबंध विषयी माहिती जाणून घेणार आहोत. हा निबंध ५ ते १० वी विद्याथ्यांसाठी लिहला गेला आहे. हा निबंध तुम्ही तुमच्या सामाहिक आणि वार्षिक परीक्षेसाठी वापरू शकता. हा निबंध पूर्णपणे विचार पूर्वक लिहला गेला आहे.

मी पंतप्रधान झालो तर निबंध मराठी | Mi Pantpradhan Zalo Tar Nibandh

‘मी पंतप्रधान झालो तर’ मी भारतीयांचा सेवक आहे, हे कधीही विसरणार नाही. हे राज्य जनतेचे आहे हे मी स्वतः सन्मान ठेवीन. साधी राहणी उच्च विचारसरणी शास्त्रीजीचे तत्व राज्यकारभारात भाग घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने स्वीकारावे असा मी आग्रह धरीन. त्यांची अंमलबजावणी मी स्वतः पासून करेल. मंत्र्यांनी नेमस्त पगार घ्यावेत असे पूर्वी गांधीजींनी सांगितले होते तेही मी प्रयत्नपूर्वक आम्हाला आणि.

मी पंतप्रधान झालो तर सामान्य माणसाला सुखी करणे व देशाचा उत्तरोत्तर विकास साधने या दोन गोष्टी सतत माझ्या दृष्टीपुढे असतील. या दोन गोष्टी सतत माझ्या  देशाच्या कल्याणासाठी कोणतेही धोरण ठरवताना व ते कार्य वकार्यवार्णित करताना त्या-त्या विषयातील विद्वान व तज्ञ व्यक्तींची मी सल्लामसलत करीन. तसेच मंत्र्यांची निवड करताना त्यांची त्या त्या खाते संबंधीची जानकारी, त्यांचे देश प्रेम व निस्पृहवृत्ती या गोष्टींना प्राधान्य देईल. मी प्रत्येक मंत्र्यांचे ज्ञान व अनुभव लक्षात घेऊन खातेवाटप करीन .

सध्या आपल्या देशात सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे. हा भ्रष्टाचार सामान्य जनतेवर अन्याय करणारा व समाजात वैफल्य पसरवणारा आहे. हा भ्रष्टाचार मी पंतप्रधान झालो की प्रथम ही भ्रष्टाचाराची कडी समूह नाहीशी करिन. सच्चेपणा, स्वाभिमान यावर भर देऊन भ्रष्टाचारी माणसाला कडक शासन करेल.

प्रचंड लोकसंख्या ही आपल्या देशाची एक भयावह समस्या आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे माणसाच्या मूलभूत गरजा  व्यवस्थित भागत नाही. अनारोग्य शाळा कॉलेजातून प्रवेश मिळणे मुश्कील शिक्षणाचा घसरलेला दर्जा, दारिद्र्य आणि बेकारी या सार्‍या समस्यांचा मुळाशी वाढत असलेली लोकसंख्या आहे. त्यातून अनीति, अत्याचार, चोऱ्यामाऱ्या, खून अशा गोष्टी उद्भवतात म्हणून मी प्रथम याबाबत लोकांना जागृत करीन. लोकसंख्या आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले तर दारिद्र्य हटवण्यासाठी मदत होईल.

धर्मनिरपेक्षता व सर्वधर्मसमभाव ही आपल्या देशाची मार्गदर्शक तत्त्वे आहेत. मी पंतप्रधान झालो तर या तत्त्वांना मी  मुळीच बाधा येऊ देणार नाही. राष्ट्रध्वज राष्ट्रगीत यांचा कोणाकडूनही अपमान झाला तर त्याला कडक शासन केले जाईल. पंतप्रधान म्हणून मी आणखी एक गोष्टीचा विचार करेल आपण प्रगती करत असताना आपला जगातील इतर देशांचे संबंध येत राहणार म्हणून मी इतर देशांचे अंतर्गत राजकारण आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करिन. या अभ्यासाचा उपयोग मला माझ्या देशाची धोरणे ठरवताना होईल.

राज्यकारभार म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे. त्याला अनेकांचे हातभार लागणे आवश्यक आहे. मी पंतप्रधान झालो तर मी सर्व स्तरातील निस्वार्थी सेवाभावी कर्तव्यदक्ष अशा कार्यकर्त्यांची संघटना तयार करीन आणि सुराज्य निर्माण करण्याचा निश्चित करण्याचा प्रयत्न करेल. मी पंतप्रधान झालो तर जगात भारताला गौरवाचे व सन्मानाचे स्थान मिळवून देईल. 

मी पंतप्रधान झालो तर निबंध मराठी | Mi Pantpradhan Zalo Tar Nibandh

1 thought on “मी पंतप्रधान झालो तर निबंध मराठी | Mi Pantpradhan Zalo Tar Nibandh”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon