बारावीची परीक्षा संपल्यानंतर सुट्टीत मामाकडे जाणारे विनंती पत्र | Mamas Patra Marathi

बारावीची परीक्षा संपल्यानंतर सुट्टीत मामाकडे जाणारे विनंती पत्र | Mamas Patra Marathi

||श्री||

१३/११००, स्वस्तिक सदन,
ओमकार सोसायटी,
पुणे-४११०२०
दिनांक: 28 जानेवारी 2022

तीर्थस्वरूप मामास,

शिरसाष्टांग नमस्कार.

तुझे पत्र मिळाले. गोड शुभेच्छाही मिळाल्या. माझी परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

माझी अभ्यासाची तयारी चांगली झालेली आहे. मी मुंबई-पुण्याच्या नावाजलेल्या महाविद्यालयातील सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका मिळून सोडवल्या आहेत. त्यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढलेला आहे; पण बारावी झाल्यावर पुढे काय करावे? याबद्दलचा निर्णय मी अद्यापही घेऊ शकत नाही.

आई बाबा म्हणतात, “तुझा निर्णय तू घे. पण चांगला विचार करून घे.” मामा, याबाबतचा निर्णय तुझ्याशी चर्चा करून घ्यावा, असे मला वाटते. म्हणूनच माझी परीक्षा संपल्यावर मी तुझ्याकडे येऊ का?

माझी परीक्षा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपेल. नंतर मी मुंबईला येईल. त्या काळात तुझा काही खास कार्यक्रम नाही ना? ऑफिसच्या कामासाठी तू कुठे बाहेर जाणार नाहीस ना? मामीलाही तिच्या ऑफिसची काही खास जबाबदारी नाही ना?

मामा, मला आमच्या घराची परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे. डॉक्टर वा इंजिनीअरिंगचा अभ्यास निवडून बाबांवर अधिक आर्थिक जबाबदारी टाकावी, असे मला वाटत नाही.

सध्या त्यांना दम्याचा खूप त्रास होतो. त्यामुळे कदाचित ते निवृत्ती ही घेतील. तेव्हा लवकर स्वतःच्या पायावर उभे राहून बाबांना मदत करावी असे मला वाटते.

लवकर संपणारा व नोकरीची निश्चित हमी देणारा असा एखादा ‘कोर्स’ आहे का? व्यवसाय करणे मला आवडेल. तेव्हा तू याबाबत विचार करून ठेव.

मामीला साष्टांग नमस्कार. छोट्या नीतुला अनेक आशीर्वाद.

तुझा भाचा,
XYZ

बारावीची परीक्षा संपल्यानंतर सुट्टीत मामाकडे जाणारे विनंती पत्र | Mamas Patra Marathi

1 thought on “बारावीची परीक्षा संपल्यानंतर सुट्टीत मामाकडे जाणारे विनंती पत्र | Mamas Patra Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group नवीन माहितीसाठी Group Join करा